विराटला २० कोटी, रोनाल्डोला ४५ कोटी.. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारे १५ टॉप खिलाडी

आमची एक भिडू आहे. तिला इंस्टाग्रामवर २३ हजारांच्या आसपास फॉलोवर्स आहेत. एखादा फोटो टाकला कि, मॅडम आरामात २/३ हजार लाईक्स घेतात. एवढे लाईक्स म्हणजे आमच्यासाठी एखादं दिव्यस्वप्नच !!!

असणारच ना… इथं आम्हाला १०० जरी लाईक्स मिळाले तरी माईलस्टोन गाठल्यासारखं वाटतं. आमचं सोडा आपल्या विराट कोहलीने २०० मिलियन फॉलोवर्स कमावलेत. ही काय साधारण बातमी नाहीये, २०० मिलियन म्हणजे किती?? तर तब्बल २० कोटी. 

म्हणजेच २० कोटी जनता विराट कोहलीला फॉलो करतेय. आणि त्याने एक नावाचं विक्रम स्वतःच्या नावे केलाय…

एखादा माणूस भारतात राहतो आणि त्याने क्रिकेट पहिले नाही ही गोष्ट पटत नाही तसंच विराट कोहलीचा फॅन आहे तो विराटला सोशल मीडियावर फॉलो करत नाही हे असं जर मी म्हणले तर तुम्हाला पटेल का ? नाही ना..

भलेही विराटची अलीकडील कामगिरी जास्त इम्प्रेसिव्ह राहिली नाहीय. त्याने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये ६९ शतकं मारलीत. २०१९ मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट मॅचमध्ये विराट कोहलीने शतक मारलं ते शेवटचं शतक पाहायला लागेल कारण त्यानंतर अडीच वर्ष उलटली तरी कोहलीच्या बॅटमधून शतक आलेलं नाहीये. 

विराट क्रिकेटच्या मैदानात भले जादू दाखवत नसेल तरी इंस्टाग्रामच्या दुनियेतलं मैदान मारतोय.  क्रिकेटच्या मैदानातून विराटनं सद्या ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावरच्या फॉलोवर्स त्याचा काय परिणाम झालेला दिसत नाही.

जगभरातले जितकेही क्रिकेटपटू आहेत त्या सर्वांना मागे टाकत, २० कोटी इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला जगातला पहिला क्रिकेटपटू ठरलाय.

विराटचे २० कोटी फॉलोअर्स असले तरी तो इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो करण्यात येणार्‍या लिस्ट मध्ये १४ व्या क्रमांकावर येतो.

इंस्टाग्रामवर असे १५ खिलाडी आहेत, ज्यांना सर्वाधिक पसंती दिली जाते, म्हणजेच इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेले व्यक्ती म्हणजे,

१) क्रिस्टियानो रोनाल्डो – 

१५ व्यक्तींमध्ये टॉप ला आहे, पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो.  रोनाल्डो हा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला व्यक्ती आहे. फुटबॉल म्हणलं कि तुमच्या डोळ्यासमोर कोण येतंय? तर उत्तर आहे रोनाल्डो ! गेल्या दीड दशकापासून फुटबॉल च्या जगात आपले नाव कमवणाऱ्या रोनाल्डोने फुटबॉल विश्वातले अनेक रेकॉर्ड्स मोडले असले तरीही  त्याने जगातला सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोवर्स असलेला व्यक्ती म्हणून नवाच रेकॉर्ड केलाय. त्याचे ४५१ मिलियन्स म्हणजेच ४५.१ कोटी इतके फॉलोवर्स आहेत. 

२) कायली जेनर –

रिऍलिटी शोची स्टार असलेल्या कायली जेनरला ३४५ मिलियन म्हणजेच ३४.५ कोटी फॉलोवर्स आहेत. सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या व्यक्तींमध्ये दुसरं स्थान असण्याशिवाय काइलीची आणखी एक ओळख म्हणजे, फक्त २४ वय वर्षे असलेल्या बिझनेस वूमन काइलीचा जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिलांच्या यादीत समावेश आहे. काइली कॉस्मेटिक्स कंपनीची संस्थापक आहे. जगभरातील श्रीमंत आणि हॉलीवूड स्टार्स काइलीच्या कंपनीचे प्रॉडक्टस वापरतात.

 ३) लिओनेल मेस्सी –

क्रिस्टियानो रोनाल्डो नंतर जगातला महान फुटबॉलपटू म्हणून अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचं नाव घेतलं जातं. सर्वाधिक फॉलोवर्स असण्याच्या यादीत मेस्सी हा ३ नंबर वर आहे त्याला ३३४ मिलियन म्हणजेच ३३.४ कोटी फॉलोअर्स आहेत.

४) सेलेना गोमेझ –

जगभरात धुमाकूळ घालणारे गुड फॉर यू’, ‘सेम ओल्ड लव’ आणि ‘बॅक टू यू’ यांसारखी हिट गाणी देणारी पॉप सिंगर सेलेना गोमेझ कुणाला माहिती नसणार असं होणं शक्य नाही. सेलेनाने एखादा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आणि तो व्हायरल झाला नाही असं होऊच शकत नाही. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत. सर्वाधिक फॉलोवर्स असण्याच्या यादीत तिचा ४ था नंबर असून  तिला ३२५ मिलियन फॉलोवर्स आहेत.

५) ड्वेन जॉन्सन – 

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारा हॉलिवूड अभिनेता म्हणजे ड्वेन जॉनसन. अलीकडेच त्याने अमेरिकेचा राष्ट्रपती होण्याची इच्छा व्यक्त केली होती.  ड्वेनचा जगभरात बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यानं आता पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यात ‘द स्कोर्पियन किंग’, ‘द रनडाउन’, ‘फास्ट अँड फ्यूरियस’ या चित्रपटांचा समावेश आहे. हॉलिवूडमध्ये यायच्या आधी ड्वेन WWE चा एक आघाडीचा रेसलर होता म्हणूनच तो ‘द रॉक’ या नावाने फेमस आहे. सर्वाधिक फॉलोवर्स असण्याच्या यादीत त्याचा पाचवा नंबर लागतो त्याला ३२० मिलियन फॉलोवर्स आहेत. 

६) किम कार्दशियन –

किम कर्दाशियां फेमस रिअलिटी टीव्ही स्टार आहे. ती कायमच काही ना काही कारणांमुळे चर्चेत येणारी नटी आहे. २००७ मध्ये ती तिच्या लीक झालेल्या सेक्स टेपमुळे चर्चेत आली होती. तेंव्हापासून ती चर्चेत येतच असते.आत्तापर्यंत तिचे ३ लग्न झाले आणि तिन्ही लग्न मोडले, थोडक्यात खाजगी आयुष्यातल्या घडामोडींमुळे ती कायमच बातम्यांमध्ये झळकत असते. सर्वाधिक फॉलोवर्स असण्याच्या यादीत ती सहाव्या क्रमांकावर आहे. तिला ३१६ मिलियन फॉलोवर्स आहेत.

७) एरियाना ग्रँड –

सर्वाधिक फॉलोवर्स असण्याच्या यादीत एरियाना ७ व्या क्रमांकावर आहे. तिला ३१५ मिलियन फॉलोवर्स आहेत.

एरियाना ग्रँड ही अमेरिकन पॉप स्टार आहे. २०१७ मध्ये ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली, इंग्लंडमधील मँचेस्टर शहराला हादरवून सोडणारे दोन बॉम्बस्फोट हे अरियाना ग्रँडच्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये झाले होते. तिने आपल्या म्युझिकल करिअरची सुरुवात ‘ब्रॉडवे म्युझिकल 13’ या पॉप अल्बमने केली.  ती कायमच समलिंगी संबंधांचं समर्थन करत असते त्यामुळे देखील तिची खूप क्रेझ आहे.

८) बियॉन्से –

बियॉन्से नोएल्स कार्टरला २६१ मिलियन फॉलोवर्स असून ती यादीत ८ व्या क्रमांकावर आहे. तुम्ही म्हणाल आता ही बियॉन्से कोण आहे? बियॉन्से ही अमेरिकन फेमस पॉप स्टार आहे. बियॉन्से नोएल्स कार्टरला तिच्या फॅन्सने बियॉन्से, क्वीन बे असे नावं ठेवलीत. तिचे गाणे म्हणजे लोकांना वेड लावणारे असतात असं म्हणलं जातं. 

९) क्लोई कार्दशियन –

क्लोई कार्दशियन ही अमेरिकन मॉडेल असून, जगभरात ती तिच्या फिगर स्टाइलसाठी ओळखली जाते. ती अमेरिकेत एक फॅशन ब्रँड चालवते. याशिवाय ती अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स आणि फॅशन कंपनीची ब्रँड अँबेसेडर आहे. तसेच ती अनेक रिऍलिटी शो मध्ये काम करते. २४९ मिलियन फॉलोवर्स असून ती या यादीत नववं स्थानावर आहे.

१०) केंडल जेनर – 

केंडल जेनर, कायली जेनर आणि किम कर्दाशियां या तिघी बहिणी आहेत.  सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या २ क्रमांकावर असलेली कायली जेनर हि सर्वात श्रीमंत बहीण आहे. केंडल जेनर तिच्या सुपर ग्लॅमरस फोटोंमुळे दररोजच सोशल मीडियावर चर्चेत असते. अलीकडेच ती तिच्या ब्रालेस सेल्फीमुळे चर्चेत आलेली. केंडल जेनरला इंस्टाग्रामवर २४१ मिलियन फॉलोवर्स असून ती १० व्या स्थानावर आहे.

११) जस्टिन बिबर- 

जस्टिन बिबर कुणाला माहिती नाही ? जस्टिन केवळ परदेशातच नाही तर भारतात देखील फेमस आहे. अगदी लहान वयातच जस्टीन एवढा फेमस झालेला की हॉलिवूड अन बॉलिवूड स्टार्ससुद्धा त्याच्यासमोर फिके पडलेत. १२ व्या वर्षांपासून जस्टिन गाणं म्हणतो. इतकंच नाही तर जस्टीन यूट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राईबर मिळवणारा पहिला पुरूष गायक देखील ठरला. आणि इंस्टाग्रामवर तो सर्वाधिक फॉलोवर्स कमावणारा ११ वा व्यक्ती ठरला असून त्याला २३९ मिलियन फॉलोवर्स आहेत.

१२) टेलर स्विफ्ट –

अमेरिकन सिंगर टेलर स्विफ्ट जरी या यादीत १२ व्या क्रमांकावर येत असली तरी तिची ट्विटरवरची सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. ती ट्विटरवरच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये टॉपला आहे तर आपले पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ती सद्या लाईमलाईटपासून लांब आहे मात्र तिने इंस्टाग्रामवर २१३ मिलियन फॅन्सला नेहेमीच इंटरटेन करत असते. तसेच तीच्या संपत्तीची देखील चर्चा होत असते ती जवळपास २ हजार कोटींपेक्षा जास्त संपत्तीची मालकीण आहे.

१३) जेनिफर लोपेझ –

हॉलिवूड अभिनेत्री आणि पॉप सिंगर जेनिफर लोपोज कायमच लक्षात राहणारी एक्टरेस आहे. खासकरून तिने ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये घातलेल्या हिरव्या ड्रेसमध्ये जेनिफरचा तो फोटो २००० मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेला फोटो ठरला होता. आणि त्याचमुळे गुगलने चक्क ‘गुगल इमेजेस’ हे नवं फिचर तयार केलं होतं.

आज वयाच्या ५२ व्या वर्षी देखील आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी जेनिफर आपल्या खाजगी आयुष्यामुळे देखील बातम्यांमध्ये येतच असते. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या यादीत जेनिफर लोपेझ ही १२ व्या क्रमांकावर असून तिला २१२ मिलियन फॉलोवर्स आहेत.

१४) विराट कोहली ला २०० मिलियन फॉलोवर्स असून तो या यादीत १४ व्या क्रमांकावर आहे.

१५) निक्की मिनाज –

 १५ व्या स्थानावर निक्की मिनाजला १९२ मिलियन फॉलोवर्स आहेत. निक्की मिनाज ही पॉप सिंगर असून ती तिच्या शानदार गाण्यांनी आणि रॅपने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकत असते. याशिवाय ती मिनाज सध्या वेग- वेगळ्याच कारणाने चर्चेत असते. तसेच ती निकी मिनाज तिच्या हटके आणि अतरंगी लुकसाठी फेमस असते. ती दरवेळी तिचे जे जे फोटो पोस्ट करत असते तेंव्हा तेंव्हा तीच्या केसांचा रंग वेगवेगळा असतो. ही तिची खासियत असल्याचं सांगण्यात येतं.

तर हे आहेत १५ इंस्टाग्रामवरचे सर्वाधिक फॅन फॉलोविंग असलेले खिलाडी…

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.