मेघालायातले जिवंत पूल !!

तुम्ही मेघालय फ़िरायला गेले आणि तेथील झाडांच्या मुळांपासून (पारंब्यापासून) बनविलेले पूल बघितले नाही तर तुम्ही दुर्दैवी ठराल. हे पूल निसर्गाची किमया, जैव-अभियांत्रिकी (bio-engineering), मानवी प्रयत्न, संयम आणि सौंदर्य यांचे एकत्रित उदाहरण आहेत.

मेघालयातील जैतीया टेकड्यांच्या प्रदेशात, west jaintia hills आणि east khasi hills जिल्ह्यात पसरलेल्या शिलॉंग पठाराच्या दक्षिण भागात प्रामुख्याने हे पूल बघायला मिळतात.

वड, अंजीर आणि रबराच्या झाडाच्या साहाय्याने हे पूल खासी आणि जैतीया लोकांनी तयार केलेले आहेत. नदी, ओढा किंवा नाल्याच्या दोन्ही काठावर ही झाडे लावून तो पुरेशी मोठी झाल्यावर त्यांच्या लवचिक पारंब्या (aerial root) मानवी प्रयत्नाने हव्या त्या दिशेला वळवून आणि एकमेकांना जोडून (inosculation) हे पूल तयार केले जातात.

पारंब्याना बांबू, लोखंडी तार यांचा आधार देऊन तसेच पोकळ बांबू किंवा सुपारीच्या झाडांच्या खोडात घुसवून त्यांची वाढ केली जाते.

नदीच्या किंवा ओढयाच्या दुसऱ्या टोकाला पारंब्या पोहचल्यावर त्यांना जमिनीत शिरू दिले जाते.

पूल अपेक्षित मजबूत झाल्यावर त्यावर दगड आणि बांबू टाकून चालण्या योग्य केल्या जाते. अशा रीतीने झाडाच्या जिवंत मुळांपासून तयार केलेले पूल बनवायला 10-15 वर्ष लागतात आणि जो पर्यंत झाड जिवंत आणि निरोगी आहे तो पर्यंत टिकतात. काही वेळा हा कालावधी 200-300 वर्षांपेक्षा अधिक पण असू शकतो.

या भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले आणि ओढ्यांना येणाऱ्या पुरात लाकडी किंवा सिमेंट काँक्रीटचे पूल बांधणे आणि टिकणे शक्य नसते त्या ऐवजी झाडांच्या मुळांपासून बनविलेले पूल हे दीर्घकाळ टिकतात.

नुकताच मेघालय जाऊन आलोय आणि या दरम्यान असे 4 पूल बघायला मिळाले. त्यापैकी Nongriat खेड्याजवळील Umshiang नावाने ओळखला जाणारा दुमजली पूल (double decker living root bridge) हा विशेष आहे. या पुलाच वय 180 वर्षांपेक्षा जास्त आहे.

ह्या पुलाखालून नितळ आणि थंडगार पाण्याचा ओढा वाहत गेलाय. पाणी एवढं नितळ आणि स्वच्छ आहे की पाण्यातील मासे आपण ओढ्याच्या काठावर उभं राहून सहज पाहू शकतो. जवळपास दीड तासापेक्षा जास्त वेळ तिथं घालवला. ओढ्यात बराच वेळ पोहलो आणि पूल बघत तिथंच सोबत आणलेला डबा पण खाल्ला.

पुलाच्या फोटोंसोबतच संपूर्ण पुलाचा विडिओ पण काढलाय त्याची YouTube link खाली देत आहे.

(Video setting मधून resolution 480p पेक्षा जास्त कराल. Mobile shooting असल्याने विडिओ तेवढा सुस्पष्ट आलेला नाहीये तेवढी बाब सांभाळून घ्या.)

माझ्या भटकंतीच्या अनुभवांवर आधारित Roaming Rajput नावाने youtube channel सुरू करतोय. काही सूचना, विशेष करून सुधारणा असल्यास नक्की सांगा आणि कृपया channel subscribe करून channel ची वाढ होण्यास मदत करा.

  • राजपालसिंग आधारसिंग राजपूत

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.