एका घटनेमुळे लालकृष्ण अडवाणी ज्योतिष्यांवर विश्वास ठेऊ लागले..

भारतीय जनता पक्ष म्हटले की, अजूनही अनेकांना  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे चेहरे आठवतात. २ खासादारांपासून सुरुवात करणारा पक्ष आता देशातील मोठा पक्ष बनला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अनेकदा त्यांचे कौतुक करत असतात. आणीबाणीच्या परिस्थितीत निर्भयपणे विरोध करणाऱ्या महान लोकांपैकी ते एक आहेत. अडवाणी आणीबाणीत १९ महिने कारागृहात राहिले होते. मात्र एवढा मोठा नेता असणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनसंघाचा अध्यक्ष होण्यास असमर्थता दाखविली होती.

अटल बिहारी वाजपेयी यांना अडवाणी पक्षाध्यक्ष म्हणून हवे होते

फेब्रुवारी १९६८ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनानंतर अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनसंघाचे अध्यक्ष झाले होते.  मात्र १९७१ सालच्या सार्वत्रिक  निवडणुकीनंतर पक्षाध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. १९७२ पासून अटलबिहारी वाजपेयी हे अडवाणींनी भारतीय जनसंघाचे अध्यक्ष व्हावे म्हणून आग्रही होते.

आता तुम्ही आता तुम्ही पक्षाचे अध्यक्ष व्हावे अशी आग्रहाची भूमिका वाजपेयी मांडत होते. वाजपेयी यांचा अध्य्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला होता. आणि ते पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी तयार नव्हते. वाजपेयी यांनी अडवाणींनी अध्यक्ष व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

तेव्हा अडवाणींने अटलबिहारी वाजपेयी यांना सांगितले की, मी जाहीर सभांमध्ये साध भाषण सुद्धा करू शकत नाही. मग मी कसे काय अध्यक्षपद स्वीकारू शकतो. असं सांगण्यात येते की, त्यावेळी अडवाणी हे सार्वजनिक कार्यक्रमात कमीचं बोलत असत.

मात्र वाजपेयींनी ठणकावून सांगितले की, अगोदर तुम्ही संसदेत बोलतांना अडखळत होता. आता तर तुम्ही संसदेत चांगले बोलायला सुरुवात केली आहे. मग हा संकोच कसला आहे.

त्यावेळी अडवाणींनी बोलणे टाळत सांगितले की, संसदेत बोलणे वेगळे आणि हजारो लोकांसमोर भाषण करणे ही तशी आवघड गोष्ट आहे. तसेच पक्षात अनेक ज्येष्ठ नेते आहेत. अगोदर त्यांना विचारणा करायला हवी. त्यांच्यापैकी कोणाला तरी पक्ष्याध्यक्ष करावे असा विचार अडवाणींनी मांडला.

वाजपेयींनी परत एकदा आपली बाजू भक्कमपणे मांडत सांगितले की, पंडित दिनदयाळ उपाध्याय हे सुद्धा उत्तम वक्ते नव्हते. मात्र ते लोकं काय सांगतात हे अतिशय लक्षपूर्वक ऐकत असत. त्यांच्या साध्या संभाषणातून सखोल विचार समोर येत. पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मोठा वक्ता असण्याची गरज नाही. अशा प्रकारे वाजपेयी हे अडवानींना पक्ष्याध्यक्ष करण्यासाठी पूर्ण जोर लावत होते.

मात्र त्यानंतर चिडून अडवाणींनी म्हणाले, मला पक्षाध्यक्ष व्हायचे नाही मी पक्षाध्यक्ष होऊ शकत नाही. दुसऱ्या योग्य व्यक्तीची निवड पक्षाध्यक्ष म्हणून करावी. तसेच अडवाणींनी अटल बिहारी वाजपेयी यांना सुचविले की, विजया राजे शिंदे म्हणजेच, राजमाता यांना पक्ष्याध्यक्ष करावे.

अटलबिहारी वाजपेयी यांना असे वाटले की, अडवानी हे पक्ष्याध्यक्ष होण्यासाठी तयार नाही. मग वाजपेयी हे अडवानींना ग्वाल्हेरला घेऊन गेले. त्यांनी विजया राजे शिंदे समोर भारतीय जनसंघाच्या अध्यक्षा तुम्ही व्हा असा प्रस्ताव मांडला. यावेळी विजया राजे शिंदे यांना या दोघांना काय उत्तर द्यावे समजले नाही.

वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानंतर विजया राजे शेवटी हो म्हणाल्या. त्यानंतर अडवाणी आणि वाजपेयी यांनी त्यांचे आभार सुद्धा मानले होते. मात्र अंतिम निर्णय कळविण्यासाठी एक दिवसाची मुदत द्यावी अशी अट विजया राजे यांनी घातली होती.

पुढे विजया राजे शिंदे म्हणाल्या की, दतिया या गावी माझे गुरु राहतात. त्यांची परवानगी आणि आशीर्वाद घेतल्याशिवाय मी आयुष्यातील कुठलाही महत्वाचा निर्णय घेत नाही. त्याच दिवशी विजया राजे हा मध्यप्रदेश मधील दतिया या गावी गेल्या. दुसऱ्या दिवशी परत आल्यावर विजया राजे यांनी ‘माझ्या गुरूंनी तू अध्यक्ष होऊ नकोस असे सांगितले असल्याचा निरोप अडवाणी आणि वाजपेयींना दिला.

दोघांसमोर प्रश्न पडला की आता काय करायचं ?

विजया राजे यांनी आपला नकार कळविल्यानंतर संघाचे नानाजी देशमुख, सुंदर सिंह भंडारी, कुशाभाऊ ठाकरे आणि जगन्नाथराव जोशी यांनी मात्र अडवानींकडे आग्रह धरला की, काहीही करून तुम्हीच अध्यक्ष व्हा. अडवानींना संघाच्या या नेत्यांना टाळून पुढे जाने शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपद स्वीकाले.

यानंतर अडवाणींनी सांगितले की, मी अनेक राजकारणी पहिले आहेत. ज्याचा ज्योतिष्यावर खूप विश्वास आहे. तसेच राजकारण्यांचे दरवाजे ठोठविणारे अनेक खरे-खोटे ज्योतिष्य पहिले आहे.त्यामुळे ज्योतिष्यांवर विश्वास बसने नव्हते. मात्र त्यानंतर काही दिवसात असा एक प्रसंग घडला की, अडवाणींच्या ज्योतिष्यांवर असणारा विश्वास दूर झाला.

भारतीय जनसंघाचे मुंबईतील एक कार्यकर्ते होते. त्यांचे नाव होते डॉ. वसंतकुमार पंडित. तसेच ते प्रसिद्ध ज्योतिष्य सुद्धा होते. १२ जून १९७५ रोजी देशात दोन मोठ्या घटना घडल्या. या घटनांनी देशाच्या राजकारणाची दिशा बद्दली.  

पहिली घटना होती गुजरात मधील.  गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते आणि त्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता.

दुसरी घटना होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधातील. समाजवादी नेते राजनारायण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. त्यात न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणूक गैरव्यवहारासाठी दोषी ठरविले होते. या दोन घटनांवरून काँग्रेस पक्षात चिंतेची लाट उसळली होती; तर बिगर काँग्रेस पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

याच पार्श्वभूमीवर जनसंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक माऊंट अबू येथे बोलावण्यात आली होती.

अडवाणी यांना महाराष्ट्रातील जनसंघाच्या कार्यकारिणीचे सदस्य डॉ.पंडित यांच्या बद्दल थोडी माहिती होती. सहज म्हणून अडवाणी यांनी पंडित यांना विचारले की, माझ्या राशीत काय लिहिले आहे. त्यावेळी डॉ. पंडित म्हणाले की, मला तुमच्या राशी बद्दल आता काही स्पष्ट सांगता येणार नाही. मात्र सांगू शकतो की, तुम्ही २ वर्ष कारावास भोगणार असल्याची चिन्हे आहेत.

यावर अडवाणी डॉ. पंडितांना म्हणाले, कॉंग्रेस बद्दलच्या घटना ऐकून तुम्ही माझ्या करावासा बद्दल बोलत आहात का असा प्रती प्रश्न अडवाणींनी डॉ. पंडितांना विचारला. हे मी काही सांगता येणार नाही. मात्र तुमची रास पाहून तरी आता एवढचं सांगू शकतो असे डॉ. पंडित यांनी अडवाणी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

देशात आणीबाणी लागू झाली आणि डॉ. पंडित यांनी अडवाणीं यांच्याबद्दलचे भविष्य खरे ठरले होते. जून संपण्यापूर्वी अडवाणींना एकोणीस महिने कारागृहात राहावे लागले होते. भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होण्यापूर्वी ज्योतिष्यावर विश्वास नसणारे अडवाणी विश्वास ठेऊ लागले होते.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.