प्रेयसीला घेवून लॉजवर गेला आणि पोलीस आले तर काय करावं ?

महाबळेश्वर, लोणावळ्या पासून ते आपल्या आसपासच्या अनेक ठिकाणी मुले आपल्या प्रेयसीला घेवून जातात. थोडासा एकांत मिळावा हा उद्देश पण अनेकदा बाहेरच्या माणसांचा त्रास आणि त्यातून लुटालुटीचे प्रकार यातून बरेचजण लॉजवर जातात. काहीना प्रेयसीसोबत “तसा” एकांत हवा असतो म्हणून लॉजवर जातात. आत्ता हे चूक की बरोबर ही गोष्ट वेगळी. त्यावर दिर्घ चर्चा देखील होवू शकते. 

पण तुम्ही लॉजवर असाल आणि पोलीस आले तर काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातून अनेकजण आत्महत्येसारखी पर्याय देखील निवडतात. म्हणूनच आम्ही सांगत आहोत पोलीस आल्यानंतर किंवा पोलीस कारवाईतून वाचण्याचे उपाय. 

मध्यंतरी मुंबई जवळच्या अक्सा बीचवर पोलीसांनी अशी धाड टाकून लॉजिंगमधून जोडप्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यातील अनेक मुलेमुली उच्चभ्रू असल्याने त्यांच्या पालकांना आपल्या मुलाच्या एकांतपणाबद्दल काहीच वावग वाटलं नाही. उलट पोलीसांविरोधात अशी कारवाई कोणत्या आधारावर करण्यात आली याची विचारणा झाली. तेव्हा मोरल पोलिसींगचा मुद्दा पुढे आला. कोर्टाने पोलीसांना सक्त आदेश दिले की कोणत्याही प्रकारे तुम्ही मोरल पोलीसांग करु शकत नाही. अर्थात,

“कायद्यानुसार दोन सज्ञान व्यक्ती एकत्र येवू शकतात असा नियम असताना पोलीस स्वत: तो व्यभिचार आहे अस म्हणून कारवाई करु शकत नाहीत”. 

सांगण्याचा मुद्दा इतकाच की पोलीस तुमच्यावर अशी कारवाई करुन शकत नाहीत पण इतर गोष्टींची तपासणी करुन शकतात. त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 

लॉजवर गेल्यानंतर आपले खरे नाव, संपुर्ण खरा पत्ता, मोबाईल नंबर अवश्य द्यावा. त्याच सोबत मुलीचे खरे नाव, तिचा पत्ता, मोबाईल नंबर व इतर आवश्यक कागदपत्रे द्यावीत. 

मुलगा व मुलगी दोघेही सज्ञान अर्थात १८ वर्ष पुर्ण झाले असतील तर ते एकत्र लॉजमघ्ये राहू शकतात. 

पोलीस सर्वात प्रथम हॉटेलचे रजिस्टर बघून ओरीजनल कागदपत्र मागतात. तिथे आपणा दोघांची खरे आणि व्यवस्थित कागदपत्र असतील. दोघांचे वय १८ हून अधिक असेल तर पोलीस कारवाई करु शकत नाहीत. 

तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकत नाही मात्र अशा वेळी काही एखादा दूसरा  पोलीस येवून  ब्लॅकमेलिंगची करण्याची शक्यता असते. तुमच्याकडे ओरिजनल कागदपत्र असतील तर अशा वेळी थेट तुम्ही पोलिस हेल्पलाईना संपर्क करुन सांगू शकता. 

3 Comments
  1. Ganpatrao Y. Chavan says

    mast 👍

  2. Sandeep says

    रेड लाईट एरिया मध्ये , वेश्या कडे गेल्यास पोलीस रेड पडली तर काय करावे?

  3. Henry Almeda says

    NICE AND USEFUL ARTICLE.

Leave A Reply

Your email address will not be published.