या महत्वाच्या निवडणूकांनंतर कळेल कॉंग्रेस विरोधी पक्षाचं नेतृत्व करणार का?

एकत्रित काही तरी करावं अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अजूनपर्यंत यासंबंधी काही नियोजन करण्यात आलेलं नाही. नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मतं मांडली आहेत. मात्र अद्याप त्याचं निर्णयात रूपांतर झालेलं नाही. काँग्रेस या मध्ये अडसर ठरत नसल्याचे मत शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केले.

सोलापूर येथे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. तसेच यावेळी म्हणाले की, काँग्रेसला सोबत घेऊ नये असं काहींचं म्हणणं आहे. पण मला वाटतं, कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये.

जरी विरोधी पक्ष एकत्र येण्याची चर्चा करत आहे मात्र काँग्रेस अजूनही या विषावर शांत आहे. त्याच कारण म्हणजे यावर्षी आणि २०२३ मध्ये होणाऱ्या ११ राज्याच्या निवडणुका.

भाजप विरोधात देशातील विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडी सुरु केली होती. मात्र राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष एकत्र येऊ न शकले नव्हते. त्यामुळे ममता बॅनर्जी काहीश्या मागे पडल्या.

तर दुसरीकडे नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली असून विरोधी पक्षाची एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. २५ सप्टेंबर हरियाणा येथे विरोधी पक्ष एकत्र येऊन रॅली करणार आहेत. यासाठी नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्रशेखर राव सारखे विरोधी पक्षातील नेते यात सहभागी होणार असल्याचे समजते. या सगळ्या घटनाक्रमांवर काँग्रेसकडून कुठलीही अधिकृत भूमिका मांडण्यात आली नाही. 

२०२४ पूर्वी होणाऱ्या ११ राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावर काँग्रेसचे लक्ष आहे. त्या निवडणुकीत काँग्रेसला किती यश मिळत यावर विरोधा पक्षासोबत जायचं की स्वबळावर लढायचं याचा निर्णय काँग्रेस घेईल.

यावर्षी गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यातील निवडणुका होणार आहेत.

या दोन्ही राज्यात काँग्रेस विरोधी पक्ष आहे. १९८५ पासून भाजप गुजरातच्या सत्तेत आहेत. सध्या गुजरात मध्ये काँग्रेसचे ६३ आमदार आहे. मागच्या सगळ्या निवडणुका भाजप विरुद्ध काँग्रेस अशाच झाल्या आहेत. मात्र आता आप स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात राज्यात  काँग्रेसला कितपत यश मिळत येवरून बऱ्याच गोष्टी समजणार आहेत.

गुजरात बरोबर हिमाचल प्रदेश मध्ये विधानसभेच्या निवडणुका यंदा होणार आहेत. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला ४७ तर काँग्रेसचे २० आमदार निवडून आले आहेत. १९८५ पासून हिमाचल प्रदेश मध्ये भाजप आणि काँग्रेसला आलटून पालटून सत्ता मिळाली आहे. अजून तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरीही काँग्रेसच्या वतीने सुरु केली आहे.

तर २०२३ मध्ये ९ राज्यात निवडणुका होणार आहेत. त्यात छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, आणि मिझोरम या राज्यांचा समावेश आहे. ९ राज्यांपैकी राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात काँग्रेसची सत्ता आहे.

राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणून आली होती. राजस्तान मध्ये अशोक गहलोत हे मुख्यमंत्री असून काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून  सुद्धा पुढे येत आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला २०० पैकी १०७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपचे ७० आमदार आहेत. 

छत्तीसगड मध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. २०१८ मध्ये ९० पैकी ७१ जागेवर काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. भूपेंद्र सिंह बघेल मुख्यमंत्री आहेत. छत्तीसगड मध्ये काँग्रेसची स्थिती चांगली असल्याचे सांगितलं जातंय. 

तेलंगणाच्या स्थापनेपासून तेलगू देशम पक्षाची एकहाती सत्ता आहे.

 २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त ५ आमदार निवडून आले आहेत. देशपातळीवर चंद्रशेखर राव हे विरोधी पक्षानं सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत असले तरीही काँग्रेस सोबतचे त्यांचे संबंध चांगले नाहीत. सध्या काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रा सुरु असून दक्षिण भारतात त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला तेलंगणा कसा प्रतिसाद मिळतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे. 

कर्नाटक 

२०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सार्वधिक जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत. २२४ जागांपैकी १२१ जागेवर भाजपचे आमदार निवडून आले आहेत. तर काँग्रेचे ६९ आमदार आहेत. २०१८ मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या सहा दिवसात हे सरकार पडले होते. काँग्रेसने जनता दलाला सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. ते सरकार १ वर्ष आणि दोन महिने टिकले. त्यानंतर परत भाजपने परत सत्ता मिळविली.

सध्या भाजपचे बसवराज हे बोम्मई मुख्यमंत्री आहेत. तर दुसरीकडे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे.  

लुक नॉर्थ इस्ट नावाची पॉलीसी तयार करून भाजपने ईशान्य भारतातील सातही राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यात मेघालय, मिझोरम, त्रिपुरा आणि नागालँडचा समावेश आहे. २०१८ मध्ये मेघालय विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक आमदार कॉंग्रेसचे निवडून आले होते. तर भाजपचे केवळ २ आमदार निवडून आले आहेत. सर्व लहान पक्षाला एकत्र करत कॉंग्रेसला मेघालयाच्या सत्तेपासून लांब ठेवले आहे.

त्यामुळे आगामी ११ विधासभा निवडणुका मध्ये काय निकाल लागत त्यानंतर काँग्रेस कुठल्या पक्षासोबत जायचं याचा निर्णय घेईल असे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाच भिडू  

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.