लोणार सरोवरच्या पाण्याचा रंग का बदलला, भेट देवून घेतलेला विस्तृत आढावा वाचा.

दोन चार दिवसांपूर्वी माध्यमांमधून एक बातमी आली. जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाले.

आत्ता झालंय अस की २०२० या वर्षात ओळीनं लागायला लागली आहे. कोरोनामुळे जग थांबलच आहे त्यात मध्ये टोळधाडीच्या बातम्या येवू लागल्या. नंतर निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि आत्ता हे पाणी अचानक गुलाबी झालं.

हजारों वर्षांच्या इतिहासात हे पाणी गुलाबी झाल्याची माहिती नाही आणि हे अचानक झाल्यानं सर्वसामान्य लोकांच्या बत्यागुल झाल्या. आत्ता हळुहळु करून सगळ जगच संपतय का काय अस वाटू लागलं.

480D8F04 CC8D 4CFE 9B62 3C397DC3ADF9 scaled

काही लोकं तर म्हणायला लागले की,

आत्तापर्यन्त माणसाने निसर्गाची वाजवली आत्ता निसर्ग माणसाची वाजवू लागला आहे. सातत्याने एकामागून एक येणारी ही संकटे त्याच गोष्टीचा सिग्नल देत आहेत.

आत्ता नक्की निसर्ग सिग्नल देतोय का? ही गोष्ट देवालाच माहित. आमचं काम आहे एखाद्या ठिकाणी कांड झालं तर त्याची विस्तृत माहिती तुमच्यापर्यन्त पोहचवणं.

त्यासाठी बोलभिडूचे कार्यकर्ते राजपालसिंह राजपूत यांनी प्रत्यक्ष लोणार सरोवरास भेट दिली.

त्यांनी सरोवराचे फोटो तर काढलेच पण तज्ञांशी संवाद साधून नेमकं काय घडल याचा आढावा घेतला. तो खालीलप्रमाणे.

85407A4D 3492 41D5 AE32 13AE0A737283 scaled

सर्वात पहिली गोष्ट लोणार सरोवरात इतकं महत्व का आहे?

लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे. अशाप्रकारची जगात फक्त चारच सरोवरे आहेत. पैकी तीन सरोवरे ही ब्राझीलमध्ये तर एक सरोवर आपल्या महाराष्ट्रात आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार गावी असलेले हे सरोवर बेसाल्ट खडकावर बनलेले खाऱ्या पाण्याचे जगातील एकमेव सरोवर आहे.

सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी अवकाशातून एक उल्का आपल्या पृथ्वीवर प्रचंड वेगात आदळली आणि या आघातातून हे सरोवर तयार झाले आहे अस सांगण्यात येतं.

२०१० साली झालेल्या एका संशोधनात सरोवराचे वय हे जवळपास साडे पाच लाख वर्षांपेक्षा जास्त असल्याचं देखील आढळून आलेलं आहे.

8742BF6F B7BE 4976 A147 55D12C5FFE7E scaled

ह्या सरोवराचा व्यास १.२ किमी आणि परीघ ४.८ किमी असून याची खोली १५० मीटरपर्यंत आहे.

स्कंदपुराण, पद्मपुराण आणि ऐन-ए-अकबरी या ग्रंथात लोणार सरोवराचे संदर्भ आहेत. विविध राजवटीत बांधलेली अनेक मंदिरे सरोवराच्या परिसरात इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहेत.

सरोवर परिसरातील मातीत चुंबकीय गुणधर्म आहेत. सरोवरातील पाणी खारट असून अत्याधीक क्षारयुक्त आहे मात्र सरोवराच्या किनाऱ्यावरच आश्चर्यकारकरीत्या एक गोड्या पाण्याची विहीर आहे.

आयआयटी मुंबईद्वारे २०१९ मध्ये झालेल्या संशोधनात सरोवरातील मातीत असलेले खनिजे आणि अपोलो चांद्रयान मोहिमेत पृथ्वीवर आणलेले चंद्रावरील दगड यांच्यातील खनिजे यांच्या कमालीचे साधर्म्य आढळून आल्याचं सांगण्यात येत.

अशा या रहस्यमय सरोवराच्या गुढतेत नुकतीच अजून एक भर पडली आहे.

सरोवरातील पाणी अचानक गुलाबी लाल रंगाचे कसे झालेले आहे याबाबत तज्ञांसोबत संवाद साधला असता ते सांगतात,

85407A4D 3492 41D5 AE32 13AE0A737283 scaled

पावसाच्या पाण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच पाण्याचा स्रोत नसलेल्या या सरोवरात उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानाने आणि सूर्यप्रकाशाने जलपातळी खूप खालावली आहे.

याचा परिणाम म्हणजे सरोवराच्या पाण्यातील क्षारांचे प्रमाण प्रचंड वाढले त्यासोबतच पाण्यात असलेल्या हेलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवकाची देखील प्रचंड वाढ झाली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात स्त्रावलेल्या कॅरोटेनॉईड रंगद्रव्यामुळे पाण्याला गुलाबी लाल रंग प्राप्त झाल्याचा अंदाज प्राथमिक अभ्यासावर आहे.

अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.

तर थोडक्यात सांगायचं म्हणजे,

पाण्याला गुलाबी लाल रंग जैविक प्रक्रियेमुळे आलाय.

याही आधी सरोवरातील पाण्याचा रंग बदलल्याचे अनेकांचे मत आहे मात्र अचानक अत्यल्प कालावधीत एवढा गर्द गुलाबी लाल रंग पहिल्यांदाच दिसून आल्याने हा बातमीचा विषय ठरला.

– राजपालसिंग राजपूत

1 Comment
  1. vinu says

    कोरोनामुळे हवेतील वाताावरणााााातील प्रदुषकांची घनता कमी झााल्याामुळे.. सरोवराातील घटकांना काही विशिष्टप्रमााणाात रासाायनिक क्रियाााााा तयार झााली आणि परीणामी पाण्याचा रंग गुलाबी झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.