ब्रिटनचं पंतप्रधानपद हुकलंय पण लंडनमध्ये ब्रिटिशांपेक्षा जास्त घरं भारतीयांचीच आहेत

मागच्या आठवड्यात एक बातमी आली. त्यामुळे नाही म्हणलं तरी जरा उर भरून आलं होत. दोनशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडला मागे टाकत भारता जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. तर भारतीयांना दिलासा अजून एक बातमी आली आहे.

इंग्लडंच हार्ट समजल्या जाणाऱ्या लंडन शहरात ब्रिटनच्या नागरिकांपेक्षा भारतीय लोकांच्या घरांची संख्या जास्त झाली आहे. 

इंलंड सारख्या देशात घर असणे म्हणजे लग्झरिस गोष्ट समजली जात होती. कधी काळी इंग्लंड सारख्या देशात फक्त मोठे बिझनेसमन, नेते, सेलिब्रेटी यांचे घर असायचे. लंडनमधील घराचे स्वप्न आता फक्त अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासाठी नाहीत. सर्व सामान्य भारतीयांनाही पडू लागले आहे.

मागच्या काही वर्षांत अनेक सर्वसामान्य भारतीयांनी लंडन मध्ये घर घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच लंडन मध्ये घरे आणि प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी अनेक भारतीय नागरिक लाईन मध्ये असल्याचे सांगितलं जात आहे. 

नेमकं कुठल्या करणामामुळे भारतीय नागरिक लंडन सारख्या शहरात घरे, प्रॉपर्टी घेत आहेत.

लंडन शहर हे तसे जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक समजले जाते. अनेक भारतीय आपले लंडन दुसरे घर असावे म्हणून विकत घेत आहे. इंग्लंड मध्ये राहायला जाण्याऐवजी गुंतवणूक म्हणून अनेक भारतीय लंडन मध्ये घर घेत आहेत. यात नवउद्योजकांचे प्रमाण जास्त आहे. तिथं राहण्यासाठी ही घरे घेतली जात नाही तर गुंतवणूक म्हणून घेतली जात आहेत. 

भारतातील लोक इंग्लंड मध्ये घरे घेत असल्याने तिथल्याने अनेक कंपन्यांनी भारतात दिल्ली, मुंबई सारख्या शहरात एक्सिबिशन सुद्धा भरवत आहेत. इंग्लंड मधील बॅरेट लंडन ही रियल इस्टेट मधील कंपनी दरवर्षी भारतात एक्सिबिशन भरवत आहे. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार भारतीयांकडून लंडन मध्ये घेतली जाणारी ही घरे लग्झरियस प्रकारातील नाही. ती सगळी घरे हे सेमी लग्झरियस प्रकारातील सोसायटीतील घरे आहेत. भारतात ज्या प्रकारे इथले बिल्डर घरे देतात अशाच प्रकारची ही घरे असल्याचे सांगितले जात.

यावरून ही घरे कुठल्या कॅटेगिरीतील लोक खरेदी करत आहेत हे लक्षात येते. ही सगळे घरे लंडनच्या झोन ३,४ आणि ५ मध्ये येतात. शहरातील मुख्य भागापासून फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर ही घरे असल्याचे बॅरेट लंडन कंपनीचे म्हणणे आहे. 

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा घर घेणाऱ्यांचे प्रमाण ७ ते ८ टक्क्यांनी वाढले आहे. 

तसेच लंडन आणि मुंबईमधील जमिनीची पर स्वेअर फूट किंमती जवळपास सारखीच आहेत. जागा खरेदी बाबतीतील लंडन मधील कायदे सुद्धा जास्त त्रासदायक नाहीत. यामुळे भारतीयांना दुसरे घर लंडन सारख्या शहरात असावे अशी इच्छा आहे.

लंडन मध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परतावा मिळतो. इंग्लंड मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या अनुभवरून हे सांगितलं जातं. भारतात आणि अरब देशांपेक्षा लंडन मध्ये गुंतवून केल्यास त्याचा परतावा असल्याचे अर्थतज्ञ् व्यक्त करतात.   

भारतातून दुसऱ्या मोठ्या शहरात जायला लागणाऱ्या वेळेपेक्षा लंडनचा प्रवास जवळचा समजलो जातो. लंडन मधील वातावरण हे राहण्यासाठी योग्य असल्याने तिथे भारतीय नागरिक गुंतवणुकीसाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते.

लंडन हे एज्युकेशनल आणि इकॉनॉमिकल हब म्हणून ओळखलं जात. 

स्वातंत्र्यपूर्वी काळापासून लंडन मध्ये शिकायला जायचा ट्रेंड आहे. गेल्या काही वर्षामंध्ये इंग्लंड मध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी इंग्लंड मध्ये शिफ्ट झालेली कटुंबांची संख्या सुद्धा मोठी आहे. मागच्या एका वर्षात इंग्लंड मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये १२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चांगला शैक्षणिक संस्था, उद्योजकांसाठी गुंतवणुकीची वाढती संधी अशा अनेक कारणामुळे भारतीयांना लंडन मध्ये गुंतवणूक करावी वाटत आहे.  कोरोना नंतरच याचे प्रमाण अधिक वाढले आहे. हॉटेल मध्ये भारतीयांना प्रवेश नाकारणाऱ्या ब्रिटिश लोकांपेक्षा लंडन मध्ये भारतीयांकडे जास्त घरी असणे हे अभिमानास्पद समजले जात आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.