या गोष्टी वाचून समजेल, मुंबई ही गुजरात आणि राजस्थानच्या किती पुढे आहे…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई संदर्भात केलेल्या वक्त्यव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. विरोधकांबरोबर सर्वसामान्य नागरिकांकडून राज्यपालांना विरोध करण्यात येत आहे. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विचार केला तर अनेक गोष्ट समोर येतात.

राज्यपालांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईतील गुजराती, राजस्थानी लोकांचा टक्का वाढला आहे. हे आकडेवारीवरून सिद्ध होते. याच बरोबर इतर राज्यातील नागरिकांचा महाराष्ट्र्रात आणि मुंबईत टक्का वाढण्याची कारणे सुद्धा लक्षात घ्यायला हवीत.

मुंबईत गुजराती, राजस्थानी लोकांची संख्या वाढण्याची कारणे पाहुयात.

मुंबई ही स्वप्ननगरी आहे. इथे काम करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला आणि विशेष प्राविण्य असणाऱ्यांना अमर्याद संधी उपलब्ध आहेत. मुंबईत कोणी उपाशी राहत नाही असं म्हटलं जात. त्याच कारणं म्हणजे फॅक्टरी एम्प्लॉयमेंटचा विचार केला तर देशातील एकूण रोजगारापैकी १० टक्के रोजगार मुंबईत उपलब्ध होतात. 

तसेच मुंबईतून एकूण इंडस्ट्रियल आऊट पुट पैकी २५ टक्के आउटपुट मुंबईतूनच मिळत. तर देशातील  इन्कम टॅक्स कलेक्शनचा विचार केला तर एकट्या मुंबईतून ३३ टक्के होत. तसेच ६० टक्के कस्टम ड्युटी मुंबईतून मधून येतात. देशातील एकूण समुद्र व्यापाऱ्याचा विचार केला तर ७० टक्के मुंबई होतो.  तसेच टोटल कॅपिटल ट्रांजेक्शन ७० टक्के मुंबईतुन होतो. 

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याचे आणि तिथंच स्थानिक होण्याचं कारण आर्थिक आणि सामाजिक असे दोन्ही कारणं असल्याचे सांगितलं जात.  

एकट्या मुंबईची तुलना गुजरात आणि राजस्थान सोबत केली तर

मुंबईची लोकसंख्या कोटीच्या जवळपास आहे तर गुजरातची लोकसंख्या ६ कोटी ४० लाख आहे. राजस्थानची ७ कोटी ८० लाख आहे. जर नॉमिनल जीडीपीचा विचार केला तर मुंबईचा जीडीपी २७८ बिलियन डॉलरचा आहे.  गुजरातचा २४० बिलियन डॉलर आणि राजस्थानचा १७० बिलियन डॉलर आहे. ही आकडेवारी लक्षात घेतली तर मुंबई दोन्ही राज्याच्या खूप पुढे असल्याचे दिसून येते.

तसेच पर कॅपिटा इन्कम (दरडोई उत्त्पन्न) विचार केला तर मुंबईचं ३ लाख ४४ हजार १४१ रुपये आहे. गुजरातचा विचार  २ लाख ४१ हजार ५०७ रुपये आहे. तर राजस्थानचा १ लाख २९ हजार ४६० रुपये आहे. तर दारिद्र रेषेखालील कुटुंबाचा विचार केला तर मुंबईत १ लाख कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहेत. गुजरात मध्ये जवळपास ३२ लाख आणि राजस्थान मध्ये २५ लाख कुटुंब दारिद्ररेषेखाली आहेत.

दारिद्र्य जितकं कमी इतकं ते ठिकाण पुढे समजलं जात. यात सुद्धा मुंबईने बाजी मारल्याचे पाहायला मिळते. 

यानंतर या तिन्ही ठिकाणच्या पायाभूत सुविधाबद्दल पाहुयात

लोक स्थलांतरित होण्यामागे पायाभूत सुविधा किती प्रमाणात उपलब्ध आहेत हे सुद्धा पाहिल जात. मुंबईच क्षेत्रफळ ६०३ स्वेअर मीटर, गुजरातचे १ लाख ९६ हजार स्वेअर मीटर तर राजस्थानच आहे ३ लाख ४२ हजार २३९ स्वेअर मीटर आहे. याची तुलना मुंबई सोबत केली तर मुंबईत अडीच हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. गुजरात मध्ये ७ लाख ४५० हजार किलोमीटर आणि राजस्थानमध्ये २ लाख ७२ हजार किलोमीटर रस्ते आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येईल की मुंबईत रोडची डेन्सिटी जास्त आहे.

क्षेत्रफळाच्या चौपट रोड मुंबईत आहेत. गुजरात आणि राजस्थान मध्ये त्यांच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत खूप कमी रस्ते आहेत.  

रेल्वेच्या बाबतीत पाहायला गेलं तर मुंबईत ४२७.५ किलोमीटर रेल्वे लाईन आहे. गुजरात मध्ये ५ हजार ३०१ एक किलोमीटर आणि राजस्थानमध्ये ९ हजार १९० किलोमीटर रेल्वे लाईन आहे. मुंबई सोबत क्षेत्रफळाशी तुलना केली तर इथं सुद्धा मुंबई पुढे आहे. 

यानंतर आरोग्य सेवेबाबत बोलायचं झालं तर

मुंबई एक लाख लोकामागे ५४ डॉक्टर आहेत. म्हणजेच जवळपास २ हजार लोकांमागे एक डॉक्टर उपलब्ध आहे.  गुजरात मध्ये २५ हजार १६८ लोकांना मागे एक डॉक्टर आहे. यात सुद्धा मुंबई पुढे आहे. यानंतर तीनही ठिकाणचा लिटरसी रेट बद्दल जाऊन घेऊ. मुंबईत ८९.२ टक्के,  गुजरात मध्ये ७८.३ टक्के आणि राजस्थान मध्ये ६६.११ टक्के आहे. महिलांच्या लिटरसी रेट मध्ये मुंबईच पुढे आहे. 

लिंग गुणोत्तराचा विचार केला तर मुंबई मागे पडल्याचे दिसून येत. याच कारण म्हणजे मुंबईत पुरुषांचे होणारे स्थलांतर. मुंबईत १ हजार पुरुषामागे ८३२ महिला आहे. गुजरात मध्ये ९१९ तर राजस्थान मध्ये १ हजार पुरुषामागे ९२८ महिला आहेत.

मुंबईत १ हजार ८६२ सीबीएससी शाळा आहेत. मुंबईत जास्त लोक येण्याचे कारण या शाळा देखील असल्याचे सांगितलं जात. 

महिला सुरक्षा या बाबत मुंबई अव्वल आहे. इथं रात्री बेरात्री बिनधास्त फिरता येत. गुजरात आणि राजस्थान या मोठ्या राज्यांची तुलना केली मुंबईत जरी केली तरी मुंबई पुढे आहे. आज जे मुंबईचे रूप दिसतात ते घडवण्यात मराठी माणसाचं मोठा योगदान आहे. त्यानंतर स्थलांतरित झालेल्यांचा वाटा आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.