बजेट बघून मिडल क्लास लोक म्हणतायेत, ‘क्या करू मै मर जाऊ’

दापयित्वाकरंधर्म्यंराष्ट्रंनित्यंयथाविधि।

अशेषान्कल्पयेद्राजायोगक्षेमानतन्द्रितः

 महाभारताच्या शांतीपर्वाच्या ७२ व्या अध्यायातील हा ११ वा श्लोक. ज्याचा अर्थ समजणं तर सोडा ते वाचणं सुद्धा महाकठीण काम आहे. पण आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर करताना हा श्लोक आपल्या मिडल क्लास लोकांना ऐकून दाखवलाय. 

आता याचा अर्थ असा कि,  ‘राजाने कुठलाही हलगर्जीपणा न करता धर्मानुसार कर वसूल करण्याबरोबरच राजधर्मानुसार शासन करून प्रजेच्या कल्याणासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी.’   एकून काय तर टॅक्स स्लॅब मध्ये आम आदमीसाठी कुठल्याही  प्रकारचा बदल नाही. 

आता फक्त अर्थमंत्र्यांनी ते श्लोकाच्या भाषेत सांगितलं म्ह्णून ते कानाला जरा ऐकायला बरं वाटलं. पण यातून एकच गोष्ट सामोरे आली कि, यंदाच्या बजेटमध्ये सुद्धा सर्वसामान्यांच्या हातात पुन्हा काहीच लागलं नाही. मिडल क्लास लोकांना जवळपास ८ वर्षांपासून टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे. पण सरकार त्या अपेक्षा नेहमीप्रमाणं टांगणीला लावतं. 

आताच्या बजेटमध्ये सुद्धा असचं काहीस पाहायला मिळालं. म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कुठला बदल तर केलाच नाही पण इनकम टॅक्स रेटमध्ये सुद्धा कुठलाही बदल पाहायला मिळाला नाही. बरीच वाट बघितल्यानंतर सरकारने क्रिप्टोकरन्सीची पण उघडली, पण भक्कम असा कर लादून अनेकांच्या स्वप्नांवर पाणी टाकलं. याशिवाय नॉन-ब्‍लेंडेड फ्यूलवर सुद्धा ड्युटी लावण्यात आली.

आता तसं पाहिलं तर कोरोना विषाणूच्या साथीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, बऱ्याच जणांना वेतन कपातीला सामोरे जावे लागले, छोटे उद्योग – धंदे सुद्धा अडचणीत आले, लोकांना आपलं घरं चालवणं सुद्धा कठीण होऊन बसलयं.  अश्यात सगळ्यांची आशा होती कि, बजेटमधून तरी सरकार आम्हाला दिलासा देईल. पण हाती काहीच लागलं नाही.

कोविड महामारीच्या काळात सॅन्डर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली जाईल, असं मत होत,पण  सीतारामन यांनीही स्टँडर्ड डिडक्शन आधीसारखंच ठेवलं. सध्या, सॅन्डर्ड डिडक्शनची मर्यादा ५०,००० रुपये आहे. म्हणजे एकूणच काय तर मिडल क्लास लोकांच्या हातात निराशाच आली.

हा.. काही गोष्टी स्वस्त केल्या, ज्यात चामडं, कापड, कृषी माल, पॅकेजिंग बॉक्स, मोबाईल फोन, चार्जर, दागिने आणि कॅमेरे स्वस्त होतील. पण याचा फार काही फायदा मिडल लोकांना होणार नाहीये.  

त्यामुळे एकीकडे जिथे अर्थमंत्री सभागृहात बजेट सादर करत होत्या, दुसरीकडे सोशल मीडियावर ‘मिडल क्लास’, ‘सॅलरीड’, ‘क्रिप्टोकरन्सी’, ‘३०% टॅक्स’ असे कीवर्ड ट्रेंड व्हायला लागले. अर्थमंत्र्यांच्या या बेजटवर मिडलक्लास लोक नाराज असून आमच्यासाठी बजेटमध्ये काहीच नसल्याची ओरड त्यांनी सुरु केलीये.  

म्हणजे तुम्ही आतासुद्धा सोशल मीडियावर जर गेलात तर हे हॅशटॅग आणि मिम्स व्हायरल होताना दिसतील. आता एक नजर या मिम्सवर टाकूयातच.

navbharat times

navbharat times

navbharat times

navbharat times

navbharat times

navbharat times

navbharat times

navbharat times

आता या मिम्सवरून तुम्हाला आयडिया आली असेल कि, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेटवर मिडल क्लास मंडळी किती नाराज असतील. दुसरा कुठला ऑप्शन नसल्यामुळं सोशल मीडियावर मिम्स व्हायरल करण्याशिवाय मिडल क्लास मंडळी काहीच करू शकत नाही.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.