सनी लिओनीची लव्ह स्टोरी ! 

सनी लिओनी, काय फालतुगिरी आहे. विसरलात का आपली संस्कृती. काय करते ती त्याची माहिती नाही का तुम्हाला. अहो भावना भावना. अहो लोकभावना समजून घ्या. संस्कृती समजून घ्या. असल्या बाईबद्दल लिहून तिला प्रसिद्धी देवून काय मिळतं तुम्हाला छे छे !!! 

झाले आपले डॉयलॉग. संस्कृतीरक्षणाच्या गप्पा. आरोप प्रत्यारोप झाले.

हे लिहणं गरजेचं असत कारण सनी लिओनी म्हणल्यानंतर अशाच प्रतिक्रिया वाचायची आपल्याला सवय आहे. तिची लव्ह स्टोरी म्हणल्यानंतर ती बेडवरच फुलली असेल अशा कुचक्या भावभावना येणार हे पण गृहित आहेच. असो विषय सनी लिओनीचा आहे म्हणून नैतिकता शिकवणं हा लेखाचा उद्देश नाही तर उद्देश इतकाच आहे की,

तिचही प्रेम आहे. ती देखील प्रेमात पडू शकते हे मान्य करण्याचा आहे. हि गोष्ट मान्य करुनच लेख वाचावा अस वाटतं. 

सनी लिओनी. विकीपिडीयावरुन शक्य ते तिच्याबद्दल वाचलच असेल. त्यामुळे तिची सुरवात सांगण्याची गरज नाही. ती सध्या तिचा नवरा डेनियल वेबर आणि तिची तिन मुलं अस पंचकोनी कुटूंब. 

डॅनियलला ती पहिल्यांना एका म्युझिक शोच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये भेटली होती. तिथं सनी शो बघायला गेली होती तेव्हा डॅनियल त्या शोमध्ये परफॉर्मन्स करत होता. डॅनियलने तिला पाहिलं तीने डॅनियलाला पाहिले. नजरानजर झाली आणि स्टोरी संपली. 

आज सनीला ती पहिल्या नजरेची गोष्ट विचारली तर ती म्हणते, तेव्हा मला तो कॅसिनोवा टाईप व्यक्ती वाटलेला. फ्लर्ट करणं, मुली पटवणं हे त्याच्याकडं बघून जाणवायचं म्हणून मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. 

पण डॅनियल हार मानणाऱ्यांच्यातला नव्हता. तो तिला रेस्टॉरंटमध्ये भेटलाच. तिच्या जवळ गेला तिला नाव विचारलं आणि पुन्हा आपल्या जागेवर येवून बसला. त्यानंतर ती रेस्टॉरंटमध्ये आली की हा फुलांचा बुके घेवून तिच्या टेबलवर ठेवायचां. 

सनीला देखील तिच्याबद्दल काहीतरी वाटू लागलं होतं. सनी त्याच्या बोलली. ओळख पाळख झाल्यानंतर ते तिथच भेटू लागले. एक दिवशी डॅनियलने तिला डेट साठी विचारलं सनी तयार झाली. 

ते पहिल्यांदा डेटसाठी म्हणून भेटले. त्याबद्दल सनीनं तिच्या मुलाखतीत सांगितल आहे की, तो दिवस माझ्यासाठी काहीतरी ठरवण्याचा होता.मला तेव्हा पोहचायला वेळ झाला तरी तो वाट पाहत तसाच थांबलेला. एखाद्या टिपीकल लव्हस्टोरीसारखं सगळं घडत होतं. 

तेव्हात सनीच्या आईचं निधन झालं. या काळात डॅनियल तिच्यासोबत असायचा. सनी लिओनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत सांगते, त्या काळात तो नसता तर कधीच मी जिवंत देखील राहिले नसते.मी पुर्णपणे तुटलेली त्या काळात त्याने मला आधार देण्याचं काम केलं. 

डॅनियल आणि मी पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्याच ठरवलं. डॅनियलला मी दूसऱ्यांसोबत काम करणं पसंत नव्हतं त्यामुळे मी त्याच्याबरोबरच शूट करायचे. नंतरच्या काळात त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं आणि मी आनंदाने होकार दिला. 

जेव्हा सनीला हिंदी बिग बॉसची ऑफर मिळाली तेव्हा ती भारतात येणार होती. डॅनियलने देखील तिला तात्काळ होकार दिला. ती भारतात आली. शो हिट झाल्यानंतर तिला बॉलिवुडच्या ऑफर मिळू लागल्या. तेव्हा तिने भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला. डॅनियल देखील तिच्यामागोमाग भारतात येवून तिला मदत करु लागला. 

नुकतीच त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली तर सिरोगसी तंत्रज्ञानाच्या सह्याय्याने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. पण या सर्व ती प्रत्येक मुलाखतीत डॅनियलचं नाव आग्रहाने घेतच राहते. शेवटी बायकोला पाठिंबा द्यायला कायम खंबीर असण्याची भारतीय संस्कृती तरी डॅनियल फॉलो करतोयचं की. 

हे ही वाचा- 

Leave A Reply

Your email address will not be published.