लोव्हलीनाला घरी मुलगा नसल्याचं शल्य कायमचं खोडून काढायचं होतं..

आसामच्या गोलघाट जिल्ह्यात टिकेन आणि मामोनी बोर्गोहेन हे जोडपं राहायचं. लीचा व लिमा या दोन मुली झाल्यानंतर तिसरीही मुलगी झाली. ती लोव्हलीना. बारमुखिया गाव तसं छोटं. त्यामुळं गाव एकमेकांच्या अगदी जवळ आहे. मुलगा नाही म्हणून हळूहळू हिणकस शेरेबाजी लोव्हलीनाच्या आई-वडिलांना ऐकावी लागायची.

ती गोष्ट तिच्या जिव्हारी लागायची. लोक कुस्तीतपणे बोलायचे, टोमणे मारायचे लोव्हलीना सतत त्याच गोष्टीचा विचार करीत बसायची.

लिचा व लिमा किक बॉक्सिंग करायचा. राष्ट्रीय स्तरावर त्या पोहोचल्या. लोव्हलीनला मात्र त्यात रस नव्हता. तिला आपल्या आई-वडिलांसाठी काहीतरी करायचे होते. मुलगा नसल्याची उणीव दूर करायची होती. किक बॉक्सिंगचा मार्ग राष्ट्रीय स्पर्धेनंतर खुंटत होता. तिला त्यापेक्षा पुढचा पल्ला गाठायचा होता पण तिला दिसत नव्हतं.

एकदा तिने वर्तमानपत्रात मोहम्मद अलीचा छापून आलेला भलामोठा फोटो पाहिला. आणि तिच्या प्रश्नाचे तिला उत्तर मिळाले, मार्ग सापडला. बॉक्सिंग खेळ तिच्या मनातन दूरवरचा मार्ग दाखवीत होता. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या गावागावांत स्पर्धा सुरू होत्या. बॉक्सिंग कॉच पद्म बोरो यांच्या नजरेत लोव्हलीनाची गुणवत्ता आली.

आई-वडिलांचे पांग फेडण्याचे मार्ग तिला सापडले.

बॉक्सिंग रिंगमध्ये उतरल्यावर तो मार्ग किती खडतर आहे याची जाणीव झाली. बॉक्सिंग रिंगमध्ये ती उतरायला घाबरायची. फियरलेस शब्द तिच्या डिक्शनरीत नव्हता. एवढी बॉक्सिंगला घाबरायची. बहिणीबरोबर किक बॉक्सिंग करायची.

मुआम किंवा मो थाय या थाई बॉक्सिंगचे धडे गिरवायची. लोव्हलीना आज म्हणत होती त्या मोठा मधले एक दोन फटके आजही बॉक्सिंग मध्ये ती वापरते. त्याचा फायदा होतो.

तेव्हाची बॉक्सर मेरी कोमला लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळाल्यानंतर लोव्हलीनाचा बॉक्सिंग मध्ये करियर करण्याचा विचार पक्का झाला. खूप कष्ट करायची, कसून सराव करायची. प्रत्येक लढतीच्या वेळी एकच गोष्ट नजरेसमोर असायची. ती म्हणजे आपल्या आई-वडिलांना मुलगा नाही म्हणून ऐकावे लागणारे टोमणे.

जोशाने त्वेषाने प्रतिस्पर्ध्यावर हल्ला चढवायची. पण बॉक्सिंग हा खेळ केवळ भावनेच्या आहारी जाऊन खेळता येत नाही. हे तिला तिचे सर्व स्तरावरचे प्रशिक्षक मनावर बिंबवायला लागले. सरावाला शिस्त हवी कठोर परिश्रमाची देखील गरज हवी.

हे सगळं होत असतानाच अचानक एक बातमी तिच्या कानावर पडली.

२०१८ च्या गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तिची निवड झाली म्हणून तिने गावभर बातमी सांगितली. पण तिचे निवडीचे पत्र हातात नव्हते. शेवटी गावकऱ्यांनी तोही विषय थट्टेचा बनविला. पण वृत्तपत्रात तिच्या निवडीचे वृत्त आले आणि थट्टा-मस्करी थांबली. उपांत्यपूर्व फेरीनंतर तीचा प्रवास ब्रिटनच्या सँडी रायनने संपुष्टात आणला. पण तिला आंतरराष्ट्रीय लढतीचा अनुभव मिळाला.

त्या अनुभवाला आत्मविश्वासाची जोड मिळत गेली. मोहम्मद अलीचा फोटो पासूनच नाही तर त्याच्या लढतीचे व्हिडिओ पाहून ती शिकत गेली. ती मोहम्मद अलीची मोठी फॅन होती. पण त्याच्या लढती पाहून प्रोत्साहित होत होती. मोहम्मद अलीचे लॉंग डीस्टन्स फटके तिला आवडायचे. कारण पाच फूट दहा इंच ही तिची उंची. त्या शैलीला समर्पक होती.

आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ती म्हणत होती. दोन बॉक्सर कधीही सारखे नसतात. याची खूणगाठ मी मनाशी बांधली आहे. त्यामुळे कोणाची स्टाइल कॉपी करायची नाही हे मी ठरवून टाकले होते.

मोहम्मद अलीचे फुटवर्क तिला आवडायचे. त्याच्या पंचेसचा प्रभाव तिच्यावर आहे. लॉंग पंचेसची ती फॅन होती. मेरी कोमला पाहूनच तिने बॉक्सिंग खेळ निवडला होता. तिच्यासोबत सराव करून एकत्र राहून तिला खूप शिकता आले.

२०१७ पासून तिने मनाची एकाग्रता करायला सुरुवात केली. डोकं शांत ठेवून फायदा होतो हे तिच्या आता लक्षात यायला लागलं होतं. ती स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली. मला कोणीही हरवू शकत नाही हे तिचे ब्रीद वाक्य बनले. त्यामुळे या आधी चार वेळा हरवणाऱ्या चेन निल चीन विरुद्ध लढताना ती यावेळी निश्चित होती. तिने चेनचे व्हिडिओ देखील पाहिले नाहीत.

लोव्हलीना आज म्हणत होती तिचे व्हिडिओ पुन्हा पाहायची गरजच नव्हती. याआधी मी चार वेळा तिच्याविरुद्ध हरली होती. त्यामुळे तीचे डावपेच मला ठाऊक होते. रिंगमध्ये उतरताना मी आज मनाशी म्हणत होते स्वतःवर विश्वास ठेव, सव्वाशे कोटी भारतीय माझ्यासाठी, मी जिंकण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. ही भावनाच मला बळ देणारी होती.

आज मला सर्व भारतीयांसाठी १००% द्यायचे आहेत. एवढेच ठाऊक होते आज मला कोणीही हरवू शकत नाही हेच मनाची सतत म्हणत होते.

गेल्या वर्षी मला कोरोना झाला आणि सर्व स्पर्धा आणि सराव चार महिन्यांसाठी बंद झाला. इटलीचा दौरा करता आला नाही. लॉकडाऊन मुळे प्रत्यक्ष सरावाची संधी मिळाली नव्हती. पण साई आणि माझे प्रशिक्षक व त्यांचे सहकारी यांनी झुमद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मला घरीच सराव करण्यास मदत केली.

आईवर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी मी फक्त एकच दिवस तिथे राहू शकली. त्याचे शल्य मला आहे. त्यावेळी आईसोबत राहायचे होते पण देश कर्तव्य मोठे मानले व ट्रेनिंग सोडून आले नाही. आज त्याच गोष्टीचे आईने कौतुक केले असं लोव्हलीना म्हणत होती.

पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर लोव्हलीना पुन्हा उपांत्य फेरीच्या लढतीसाठी रिंग मध्ये उतरेल. त्यावेळी तिच्यासमोर एकच लक्ष असेल भारतीय मष्टीयुद्धाचा इतिहास बदलण्याचे.

  • विनायक दळवी

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.