खर्चाचा प्रॉब्लेम झाला की आयुष्यमान रेल्वेमध्ये गाणी गाऊन पैसे गोळा करून आणायचा..

बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करणाऱ्यांची संख्या काय कमी नाहीच, जितके आज गुणी नट आपण बघतो त्यांचा स्ट्रगल आजवर आपण पाहत, वाचत आलो. एखाद्या छोट्याश्या शहरातून मुंबईत येणं भरपूर काम करणं आणि त्यातलं एखादं काम वाजून त्यावर अजून काम मिळून प्रसिद्ध होणं हि थेरी पाहायला मिळते. अशीच एक स्टोरी आहे बॉलिवूडच्या डोनरची.

बॉलिवूडचा विक्की डोनर म्हणजे अर्थातच आयुष्यमान खुराना. आज घडीचा सगळ्यात डिमांड असलेला हिरो हि आयुष्यमान खुरानाची खासियत. नव्या पिढीतला एक दमदार नायक म्हणून त्याला ओळखलं जातं. आपल्या स्ट्रगलच्या काळात आयुष्यमान थेटर तर करतच होता पण खिशाला असलेली कडकी काय काय करायला लावू शकते याचा हा किस्सा. 

१४ सप्टेंबर १९८४ साली आयुष्यमान खुरानाचा जन्म एका पंजाबी परिवारात झाला. कॉलेज काळात थिएटरची गोडी लागली आणि त्याने बॉलिवूडमध्ये येण्याचा संघर्ष आरंभिला. आपल्या करिअरची सुरवात आयुष्यमान खुरानाने रेडिओ जॉकी म्हणून केली. नंतर रेडिओवरून शिफ्ट होत होत तो रियालीटी शोकडे वळला. नंतर तो हळूहळू काम मिळवत गेला.

एकदा कॉलेज काळात आयुष्यमान खुरानाच्या कॉलेजच्या मित्रांनी गोव्याला जायचा प्लॅन केला. गोव्याला जायचा प्लॅन केला खरा पण आयुष्यमान खुरानाच्या खिशात एकही रुपया नव्हता. तेव्हा यावर उपाय काय तर त्याने थेट रेल्वेमध्ये गाणी गायला सुरवात केली. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यावेळचा खर्च गाण्यातून मिळालेल्या पैशांवर निभावून गेला.

पण आता कॉलेज काळात मजा करण्यासाठी पैसे नसायचे म्हणून हा मार्ग आयुष्यमान खुरानाला शक्य झाला होता. जेव्हा जेव्हा पैशाचा प्रॉब्लेम यायचा तेव्हा तेव्हा आयुष्यमान खुराना रेल्वेमध्ये गाणी गाऊन पैसे गोळा करून आणायचा. आपले खर्च जेव्हा वाढायचे तेव्हा आर्थिक तंगी मिटवण्यासाठी आयुष्यमान रेल्वेत गाणी गेला जाऊ लागला.

रेडिओ जॉकी असताना आयुष्यमान खुरानाचा मान न मान मैं तेरा आयुष्यमान हा शो तुफ्फान हिट झाला होता. चॅनल व्ही चा शो असलेल्या पॉपस्टार्स या कार्यक्रमांत सहभाग घेणारा तो पहिलाच स्पर्धक होता. एमटीव्हीचा लोकप्रिय शो रोडीज जिंकून रो सगळ्यांच्या नजरेत आला. इथून मात्र त्याने मागे वळून पाहिलंच नाही. भरपूर छोटेमोठे काम आणि शोज त्याने केले. 

पहिला सिनेमा आयुष्यमानला दिला तो दिग्दर्शक सुजित सरकार यांनी. २०१२ साली सुजित सरकार यांनी विकी डोनर या सिनेमातून आयुष्यमान खुरानाला लोकांसमोर आणलं. हा सिनेमा त्याच्या वेगळेपणामुळे हिट झाला. भरपूर अवॉर्डसुद्धा या सिनेमाला आई आयुष्यमानला मिळाले. यानंतर तो काही थांबलाच नाही.

नौटंकी साला, हवाईजादा, बेवकूफीया असे अनेक चांगल्या कन्टेन्टचे सिनेमे आयुष्यमानने प्रेक्षकांना दिले. २०१५ साली आलेल्या दम लगा के हैश्या या सिनेमाने त्याच्या करियरला एक वेगळीच चमक दिली. हा सिनेमा लोकांनी चांगलाच उचलून धरला. यानंतर इंडस्ट्रीला एक नवा हिरो आयुष्यमान खुरानाच्या रूपाने मिळाला होता. 

आयुष्यमान खुरानाला लो बजेट सिनेमांचा हिरो म्हणून हिणवलंही जाऊ लागलं होतं. पण जितक्या लो बजेट असलेल्या फिल्म्स आयुष्यमान खुरानाने केल्या त्या सगळ्या सुपरहिट ठरल्या. अभिनय आणि गायक म्हणून आयुष्यमान इंडस्ट्रीत एस्टॅब्लिश होत गेला. आजसुद्धा बॉलिवूडच्या टॉप हिरोंमध्ये आयुष्यमान खुराना या नावाचा दबदबा दिसून येतो.

बधाई हो, अंधाधुन, बरेली कि बर्फी, शुभ मंगल सावधान असे अनेक युनिक सिनेमे आयुष्यमान खुरानाच्या नावावर आहेत. १६ वेळा अवॉर्ड नॉमीनेशन आणि त्यापैकी १२ वेळा त्याने तो अवॉर्ड मिळवला आहे. तरुणाईमध्ये सगळ्यात जास्त क्रेझ हि आयुष्यमान खुरानाची आहे. एकेकाळी पैश्याची अडचण होती म्हणून ट्रेनमध्ये गाणी गाणारा आयुष्यमान खुराना आज बॉलिवूडचा टॉपचा हिरो झाला आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.