गरिबांना रोजगार नाही म्हणून नवाबाने बांधला होता भुलभुलैय्या !!! 

 

सध्या भारतात नवाब खूप झालेत. या नवाबांच मुख्य काम काय तर, मेर सवासौं करोड देस वासियों म्हणत लोकांना मुलभूत प्रश्नाकडून दूसरीकडे घेवून जायचं. याला सोप्या भाषेत रान मारत बसायचं अस म्हणलं जात. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या कामाकडे लक्ष न देता आपलं आपणं कडकडनं रान मारत बसायचं. तर असे रान मारणारे नवाब या भारताला आजवर खूप मिळाले अशाच एका नवाबाची हि गोष्ट.

काळ – १७८५. 
इलाखा – लखनौं

मुस्कराईंये आप लखनौं मैं हैं !!!
लखनौं आत्ता जस आहे तसच १७८५ साली देखील होतं. त्याच मोठमोठ्या कोठ्या. संगीत, पान, खाणं पिणं हे सगळं लखनौं मध्ये जोरात चालू होतं. या सर्वावर अधिपत्य कोणाचं  होतं तर लखनौंच्या नवाबाचं. हा नवाबं महा दलिंदर माणूस. खाल्लेलं पान सुद्धा रंग देण्यास आलेल्या इमारतीला देवून तो रंगाचे पैसे वाचवत. तर अशा नवाबाच्या डोक्यात आलं संपुर्ण लखनौ शहर दिसू शकेल अशी ठिकाणी एक हवेली बांधावी.

 

bhool bhulaiya lucknow 7
http://2.bp.blogspot.com/-qVHyY2PsZN0/VZdyYtyksnI/AAAAAAAAV8g/E2gFcY_EG3E/s1600/bhool%2Bbhulaiya%2Blucknow%2B7.jpeg

 

लक्षात असू द्या ते नवाबाच्या मनात आलेलं तुमच्या नाही साहजिक लगोलग जागा शोधली. लगोलग पाया काढला. गारवा देवून काम चालू झालं. आत्ता शहर होतं लखनौ, त्यात हा माणूस नवाब. साहजिक कारगीर पण झाडावरचेच असणार, त्यांनी काय केल दिसेल तिथे पिलर टाकायला चालू केले. याचं कारण काय स्लॅबचा लोड संभाळता आला पाहीजे. मग पिलर टाकले आणि त्यातून टेरेसवर जायला रस्ते बांधले. किती रस्ते बांधले तर एकूण १०२४ रस्ते.
आणि टेरेसवरुन खाली यायला एकच रस्ता !!!

आहा आहा !!! आत्ता मज्जा आली न. विचार करा, वरती जायला १०२४ रस्ते आणि खाली यायला फक्त एकच रस्ता. तुम्ही टेरेसवर गेला की तुम्हा दिसतो ते संपुर्ण लखनौ शहर. पण खाली यायचं म्हणलं की १०२४ पैकी एका रस्त्यानं यायला लागतं. आत्ता हे सगळं घडल्यावर भक्त म्हणायला लागले की हे सगळं नवाबाने शत्रुला चकवण्यासाठी केलं आहे. पण राज्यात काही शत्रू येत नव्हते मग नवाबाने एक युक्ती काढली तो म्हणाला राज्यात बेरोजगारी खूप वाढली आहे तर आपण असू करू जितके बरोजगार लोक आहेत त्या सगळ्यांना या महालातून रस्ता शोधायचं काम

Leave A Reply

Your email address will not be published.