कधी रात्री गर्दी झाल्याने तर कधी नमाज पडल्याने लुलु मॉल टार्गेट होतोय
भारताच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात ऑर्डर देऊन तो खरेदी करतो, जेणेकरून त्याला अतिशय स्वस्त दरात माल मिळतो. अशा परिस्थितीत, लुलू आपल्या स्टोअरमध्ये अतिशय स्वस्त किंमतीत उत्पादन विकण्यास सक्षम आहे. यामुळेच लुलू जिथे जातो तिथे मोठा लालाही लोकांना टेन्शनमध्ये टाकतो.
जर आपण लुलू मॉलबद्दल बोललो, तर ते इतके मजबूत विक्री करत नाही. लुलूचा एक मॉल आहे त्याचप्रमाणे त्याचे अनेक स्टोअर्स आहेत. तो त्याच्या दुकानात अतिशय स्वस्त दरात वस्तू विकू शकतो कारण तो जगभर पसरलेला आहे. सर्व उत्पादने ते जग.लुलु मॉल. नावावरून जरी हलक्या घेत असाल तर जरा दमानं घ्या. मागच्या आठवड्यातील कोची आणि तिरुवनंतपुरम येथील मॉल मधील गर्दीचे व्हिडीओ आणि फोटो तुम्ही बहुतेक पहिले नसतील.
या दोन्ही शहरात मॉल मध्ये रात्री १२ वाजता एवढी गर्दी झाली होती की तिथं पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती. मॉल मध्ये मध्यरात्री गर्दी होण्याचे कारण होते ते म्हणजे रात्री शॉपिंग केल्यास ५० टक्के सूट देण्यात येणार होती. यानंतर मॉल प्रशासनावर बरीच टिका करण्यात आली होती. आता परत एकदा लुलु मॉल टार्गेट वर आला आहे मात्र वेगळ्या करण्यासाठी.
लखनऊमध्ये मॉल मध्ये पडण्यात आलेल्या नमाजमुळे तो टार्गेटवर आला आहे.
१० जुलै रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनऊ येथे लुलु मॉलचे उद्घाटन करण्यात आले होते. काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मॉल मध्ये ६ ते ७ जण नमाज पडत आहेत.
या विरोधात उत्तरप्रदेश मधील हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.
उत्तरप्रेदश मध्ये सार्वजनिक ठिकाणी पूजा, नमाज पडण्यास बंदी घातली आहे. कलम १४४ अंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे. लुलु मॉल आहे की लुलु मशीद अशी टिका अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने करण्यात येत आहे. या ठिकाणी मॉल बांधायची म्हणून ही जागा घेतली आहे आणि तेथे आता नमाज पडण्यात येत असल्याचे आरोप सुद्धा हिंदू महासभेच्या वतीने करण्यात येत आहे.
तसेच मॉल मध्ये जाऊन हिंदू महासभेच्या वतीने सुंदरकांड पाठ करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी पत्र लिहले असून त्यात लुलु मॉल तयार करतांना ब्लॅक मनीचा वापर करण्यात आले असून त्याला बॉयकॉट करावे असे म्हटले आहे.
त्यानंतर लुलु मॉलच्या प्रशासनाच्या वतीने नमाज पडणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
देशातील सगळ्यात मोठा मॉल म्हणून लुलु मॉलची ओळख आहे
लखनऊ येथील लुलु मॉल देशातील सर्वात मोठा मॉल आहे. ११ एकर जागेवर हा मॉल बांधण्यात आला आहे. यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मॉल मध्ये देशातील,परदेशातील ३०० पेक्षा जास्त कंपन्यांचे आऊटलेट आहेत. या मॉल मध्ये एकाचवेळी ५० हजार लोक शॉपिंग करू शकतात. ११ स्क्रीन असणारे थेटर इथं आहे. तसेच मॉलच्या पार्किंग मध्ये ३ हजार कार पार्क करता येतील एवढी जागा आहे.
मात्र या मॉलचे नाव लुलु असं अतरंगी का ठेवण्यात आले आहे असा प्रश्न सगळ्यांचा पडतो.
यापूर्वी लुलु ग्रुपचे सगळे मॉल दक्षिण भारतात होते. लुलु ग्रुपचा उत्तर भारतातील हा पहिला मॉल आहे. लुलु हायपरमार्केट हे सुपर मार्केटची चैन आहे. अबू धाबी येथे राहणारे भारतीय नागरिक युसूफ अली यांनी २००० साली लुलु हायपरमार्केटची स्थापना केलीये.
युसूफ अली यांचा जन्म केरळ राज्यातील थिरुसुर येथे झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण केरळ येथे झाले. त्यानंतर अली यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्यासाठी गुजरात गाठले होते. पुढे १९७३ मध्ये अली बिझनेसाठी अबू धाबी गेले होते. पहिल्यांदा त्यांनी EMKE ग्रुप मध्ये काम केले आणि त्यानंतर त्यांनी लुलु ग्रुपची स्थापना केली.
लुलु हा अरबी शब्द आहे. ज्याचा अर्थ मोती असा होतो. तसेच कुराण मध्ये सुद्धा लुलु शब्दाचा समावेश आहे. यामुळे युसूफ अली यांनी आपल्या बिझनेसाठी लुलु या शब्दाची निवड केली.
लुलु ग्रुप भारताबरोबर अमेरिका, इंग्लंड, इटली, चीन सारख्या देशांमध्ये आहे. जगभरात ४२ देशांमध्ये २३० पेक्षा जास्त आऊटलेट आहेत. पुढच्या काही वर्षात लुलु ग्रुपचे १८ हायपरमार्केट, ७ मोठे शॉपिंग मॉल देशात सुरु करण्यात येणार आहे. लुलु ग्रुप मध्ये ५७ हजार पेक्षा जास्त लोक कामाला आहेत. मॉल बरोबरच लुलु ग्रुप फायनन्स, हायपर मार्केट, कपडे, कॉफी, इलेक्ट्रिक वस्तू सारख्या बिझनेस मध्ये आहे.
५० टक्के ऑफ देणं लुलु मॉलला कसं शक्य आहे
लुलु मॉल फेमस असल्याचे अनेक कारणे आहेत. एक म्हणजे तुम्हाला एकाच छताखाली सगळं उपलब्ध मिळते. लुलु कंपनीचं साम्राज्य २२ पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. त्यामुळे जगभरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात ऑर्डर देऊन लुलु कंपनी त्या वस्तू खरेदी करते. त्यामुळे कंपनीला अतिशय स्वस्त दरात माल मिळतो. त्यामुळे लुलु मॉल आपल्या ग्राहकांना ५० टक्यांपर्यंत सूट देते.
सतत ५० टक्के ऑफ देत असल्याने लुलु मॉल फेमस आहे. यामुळे जेव्हा लखनऊ मध्ये हा मॉल उघडण्यात आला त्यावेळी तिथल्या व्यवसायिकांना टेन्शन आले आहे.
हे ही वाच भिडू
- या देशात मुस्लिम तर राहतात मात्र तिथे मशीद उभारण्यास परवानगी नाही..
- बाबरी मशीद पडत होती तेव्हा पंतप्रधान नरसिंह राव काय करत होते?
- हिंदू मुस्लिम वादातून पेटलेल्या गुरुग्राममध्ये असा हि एक गुरुद्वारा आहे जिथं नमाज पडला जातो.
करण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, यामागे लोकांना मध्यरात्री शॉपिंग करण्यासाठी प्रोत्साहित करणे आमचा मुख्य उद्देश आहे. मध्यरात्री जर लोक शॉपिंगसाठी आले तर त्यामुळे रस्त्यांवर ट्राफिक जॅम होणार नाही. लोकांना लागणाऱ्या वस्तू शांततेत घेता याव्यात म्हणून हा निर्णय घेतल्याचे