राष्ट्रीय राजकारणाच्या रेसमध्ये स्टॅलिन मायावतींची जागा घेतायेत ते या मुद्द्यांच्या जोरावर

२०१४ च्या लोकसभा निवडणूका जसा जवळ येतायेत तसं अनेक प्रादेशिक पक्ष भाजपला पर्याय म्हणून समोर येतायेत. त्यात तामिळनाडूतला DMK पक्ष देखील मागे नाही.

तमिळनाडूमध्ये सद्या DMK चा म्हणजेच द्रवीड मुन्नेत्र कळघमचं मजबूत सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आहेत. आणि एमके स्टॅलिन यांचं लक्ष्य आता दिल्लीवर वळवलं आहे. ते राष्ट्रीय राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार स्टॅलिन हे विविध राष्ट्रीय पक्षांच्या नेतृत्वाशी संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्न करतायेत. 

केंद्रीय राजकारणाच्या रेसमध्ये असलेल्या मायावती गेल्या विधानसभेतल्या अपयशामुळे कमकुवत झाल्या की, त्याचा फायदा घेत स्टॅलिन आता केंद्रात जाण्याच्या तयारीला लागलेत.  मायावतींना रिप्लेसमेंट म्हणून स्टॅलिन स्वतःला आणखी सिद्ध करतायेत. 

स्टॅलिन आता मायावतींची जागा ज्या मुद्द्यांच्या जोरावर घेऊ पाहतायत ते मुद्दे म्हणजे..

  •  मायावतींचा पक्ष बसपा कमकुवत झाली. 

२००७ मध्ये जेव्हा बसपाने पहिल्यांदा स्वबळावर सत्ता स्थापन केली होती तेव्हा ३०.०४ % मत घेत पक्षाने २०६ जागा जिंकल्या होत्या. तर २०१२ मध्ये अवघ्या ८० जागा जिंकल्यानंतरही मायवतींची मताची टक्केवारी ही २५% एवढी होती. २०१७ मध्ये अवघे १७ आमदार आले असताना देखील २२% मते घेत एकूण व्होट शेअरच्या बाबतीत मायावतींचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता.  पण २०२२ मध्ये बसपा इतक्या जोरात आपटली की युपीच्या ४ वेळेस मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींच्या पक्षाचा फक्त १ च आमदार निवडून आला आहे. १ आमदार निवडून आला म्हणजे जवळपास बसपा संपलीच.  

  • आता दोन्ही पक्षांची तुलना केली तर, विचारसरणीचा प्रमुख मुद्दा येतो..

कांशीराम यांच्या ठाकूर, ब्राह्मण, बनिया चोर, बाकी सब हैं DS4 (दलित सोशीत समाज संघर्ष समिती ) इथून सुरू झालेल्या बहुजन समाज पक्षाचा प्रवास सुरु झाला.  ते  ”हाथी नाही गणेश है, ब्रह्मा, विष्णू महेश है ” इथपर्यंत बसपाच्या विचारधारेचा प्रवास दिसून येतो. थोडक्यात पक्ष कोअर आईडियालॉजी पासून दूर गेला. सुरुवातीला रॅडिकल विचारसरणीचा बसपा आता हिंदुत्वासाठी सॉफ्ट होत गेल्याचं म्हणलं जातं. 

पण बसपा पेक्षा अधिक DMK पक्ष रॅडिकल विचारांचा आहे.  

DMK पक्षाची विचारसरणी पाहायला गेलं तर, पेरियार यांनी उभारलेली DMK द्रवीड चळवळ, याच  चळवळीतून उगम पावलेला पक्ष म्हणजे DMK आहे. द्रविड चळवळ १०० वर्षांपेक्षा जुनी आहे. या चळवळीने तामिळनाडूच्या राजकारणात जम बसवला. द्रवीड चळवळीचा ब्राह्मणी हिंदू धर्माला इतका टोकाचा विरोध होता की, इथे एकेकाळी हिंदू देव-देवतांच्या मूर्त्यांना चपलांचे हार घातले जायचे, रामाच्या मूर्तीभंजनाच्या घटना देखील येथेच घडल्या होत्या.  

तामिळनाडू भाजपला अक्षरशः सलतो म्हणायला लागेल कारण येथे आर्य विरुद्ध द्रविड असा संघर्ष चालतो. त्यामुळे हिंदुत्वाच्या राजकारण जरी भाजपने केलं तरी त्याला फारशी धार मिळणार नाही. कारण येथील जनतेचा एक कल निरीश्वरवादाकडे म्हणजेच नास्तिकतेकडे झुकलेला आहे.

DMK बसपासारखं ‘दलित व्होट बँक’ खेचू शकतो.

मायावतींची आत्तापर्यंतची हक्काची व्होट बँक म्हणजे, दलित व्होट बँक. दलित समाजाची एक गठ्ठा मतं, दलित-मुस्लिम असं सोशल इंजिनिरिंग करून सत्तेत पोहचत असत. त्याच प्रमाणे DMK कडे देखील तामिळनाडूमधील दलित व्होट बँक आहे. तेच DMK जातिव्यस्थेच्या विरोधांत असल्यामुळे पक्षा कडे अर्थातच दलित जनतेचं व्होट बँक आहे.

  •  DMK चे प्लस पॉईंट म्हणजे…

एनडीए आणि यूपीए दोन्ही सोबत युती केलेला पक्ष –

स्टॅलिन यांचे वडील आणि तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री के करुणानिधी यांनी एनडीए आणि यूपीए या दोन्ही पक्षांशी युती केली होती. वाजपेयी सरकारच्या काळात DMK एनडीएमध्ये होती. आणि आता DMK काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचा भाग आहे. एकंदरीत DMK पक्षाला राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव आहे.

लोकसभेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे –

लोकसभेतील आकडेवारी पाहिली तर, सत्ताधारी भाजपचे ३०३ खासदार आहेत. तर ५२ खासदारांसह दोन नंबरला काँग्रेस आहे. यानंतर सर्वाधिक जागा जिंकण्याचा मान  DMK कडे जातो, २३ खासदारांसह DMK हा लोकसभेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. 

हे झाले प्लस पॉईंट पण DMK ला राष्ट्रीय राजकारणाच्या मार्गावर काही अडथळे आहेत जे दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

एक म्हणजे भाषेची मर्यादा –

भाषेचा मुद्दा साधा वाटत असेल पण विशेषत: केंद्राच्या राजकारणात अस्खलित हिंदी आणि इंग्रजीला जास्त महत्व आहे. त्यात हिंदी प्रामुख्याने बोलली जाते पण दक्षिणेकडील नेत्यांना हिंदी जमत नाही.  त्यात स्टॅलिन यांचा समावेश आहे.

दुसरं म्हणजे, राज्याच्या बाहेरचा अनुभव नाही –

DMK केंद्रात एनडीए आणि युपीए सोबत युतीमध्ये होती, भलेही पक्षाला राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव आहे पण पक्षाला तामिळनाडूच्या बाहेर राजकारणाचा अनुभव नाही. 

दक्षिणेत झपाट्याने सामाजिक न्यायाचे राजकारण करणाऱ्या स्टॅलिन यांना यूपी-बिहारसारख्या राज्यात सामाजिक न्यायाचे राजकारण करता येईल का ? आणि जरी केलं तर ते कितपत यशस्वी होईल हा मेन मुद्दा आहे. द्रमुकची काँग्रेससोबत युती आहे, तर काही नेते काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी तयार करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे स्टॅलिन यांच्यासमोर हे हि मोठे आव्हान आहे.

हिंदुत्वाच्या विरोधात सामाजिक न्यायाचा नारा बुलंद करून देशात भाजपचा पर्याय बनू शकतो, असे स्टॅलिन यांना वाटते.

गेल्या चार दशकांत व्हीपी सिंग, कांशीराम, रामविलास पासवान, शरद यादव, लालू यादव, मुलायमसिंह यादव हे सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी राजकारणातील मोठे चेहरे होते. 

त्यातील व्हीपी सिंग, कांशीराम आणि रामविलास राहिले नाहीत. तर मुलायम सिंह, शरद यादव आणि लालू यादव राजकीयदृष्ट्या सक्रिय नाहीत. कांशीराम यांच्या वारसदार मानल्या जाणाऱ्या मायावती यांचा देखील पराभव झाल्यामुळे त्या काहीशा मागे पडल्या.

अशा परिस्थितीत केंद्रातली हि पोकळी निर्माण झाली आहे. जी भरून काढण्याची संधी स्टॅलिन यांना आहे. अलीकडेच स्टॅलिन यांनी दिल्लीत पक्षाच्या ऑफिसचं उद्घाटन केलं आहे.  यावरून स्पष्ट झालं आहे की, तामिळनाडूच्या राजकारणातून बाहेर पडून ते राष्ट्रीय राजकारणात उतरले आहेत. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.