हिटलरच्या छळ छावणीमध्ये एका भारतीयाचा देखील मृत्यू झाला होता…

दुसरे महायुद्ध म्हणलं कि आपल्या नजरेसमोर नाझींचा छळ आणि त्या छळछावण्या दिसतात. एखाद्या हॉलिवूड सिनेमात दाखवत कदाचित त्या पेक्षाही दहापट जास्त रक्तपात या छळछावण्यात झाल्याचे इतिहास सांगतो. सिनेमातले दृश्य पाहून अंगावर काटा येतो तर वास्तवात ह्या छावण्या किती भयंकर असतील जणू जमिनीवरचा नरकच !

कारण याच छळछावण्यांमध्ये जवळपास १० लाख लोकांनी आपले प्राण गमावले. यातले बहुतांश लोक ज्यू होते.

१९३३ ते १९४५ दरम्यान, नाझींनी त्यांच्या छळछावण्यांमध्ये लाखो लोकांची हत्या केली होती. याच  छळछावण्यांचे नाव ऐकून आजही काही लोकं विचलीत होतात. पण याच  छळछावण्यांमध्ये एक भारतीय व्यक्ती देखील होता. ज्याला नाझींनी गोळ्या घालून ठार केले.

असे म्हटले जाते की, नाझींनी छळछावण्यांमध्ये ठार करण्यात आलेले ते एकमेव भारतीय होते. 

ही भारतीय व्यक्ती कोण होती आणि नाझींनी त्यांना का मारले असावे?

युद्धकैद्यांना शिक्षा देण्यासाठी नाझींनी छळ करणारे, माणसाला जिवंतपणी नरकयातना देणारे कॅम्प तयार केले होते जेथे अमानवीय शिक्षा देण्यात येत असायची. अशा कॅम्प मधे एका भारतीयाला देखील यातना सहन कराव्या लागल्या होत्या.

त्यांचे नाव होते एम.माधवन, जे केरळमधील असून मल्याळी होते.

ते थिया समाजाचे होते. महात्मा गांधी दलित समाजाच्या उत्थानासाठी १९३४ मध्ये माधवन जिथे राहत होते तिथल्या फ्रेंच वसाहतीतही पोहोचले. त्यांनी तिथे ‘हरिजन सेवक संघ’ स्थापन केला ज्यामुळे दलितांना उच्च शिक्षण आणि मंदिरांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत झाली होती. महात्मा गांधींच्या प्रभावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी जुन्या विहिरी दुरुस्त करून हरिजनांसाठी त्या खुल्या केल्या होत्या.

हरिजन सेवक संघाने हरिजन चळवळीचा प्रसार-प्रचार केला. संघाने स्वतंत्र प्राथमिक विद्यालये, माध्यमिक शाळा सुरू करून तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय केली.

एम.माधवन यांनी महात्मा गांधींसोबत काम केले होते.

आणि माधवन याच हरिजन सेवक संघाचे माधवन सदस्य होते. 

या संघात सहभागी होऊन माधवन यांनी दलितांना खूप मदत केली. जुन्या विहिरी दुरुस्त करून हरिजनांसाठी त्या खुल्या केल्या गेल्या. हरिजनांसाठी वसतिगृहे बांधण्यात, शाळा आणि रुग्णालये सुरु करण्यात त्यांनी हातभार केला.

एवढेच नव्हे तर त्यांनी गांधीजींबरोबरच ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दलितांना जागृत करण्याचे देखील काम केले.

१९३७ मध्ये माधवन उच्च शिक्षण घेण्यासाठी पॅरिसला गेले. या दरम्यान ते सोरबोने विद्यापीठाच्या वसतिगृहात राहायला होते. आणि याच दरम्यान नाझींनी फ्रान्सवर हल्ला केला होता. फ्रांसीसी कम्युनिस्ट पार्टीचे ते मेंबर होते.

माधवन हे फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते आणि नाझींचे कट्टर विरोधक होते. त्यामुळे त्यांनाही अटक करून एका छळ छावणीत पाठवण्यात आले होते. त्यांच्यासोबत आणखी एक कैदी होता जो नाझींपासून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्याने आपल्या डायरीत लिहिले आहे की, त्याने मनात आणले असते तर तो भारतीय असल्याचा पुरावा देऊन नाझींपासून सहज पळून जाऊ शकला असता, पण त्याने तसे केले नाही.

माधवन ला छावणीतल्या खांबाला बांधलेल्या इतरांप्रमाणे गोळ्या घालण्यात आल्या.

एकमेव भारतीय ज्याला नाझींनी गोळ्या घातल्या होत्या.

कैदेत असताना ते  फ्रेंचांबरोबर माधवन देखील फ्रेंच राष्ट्रगीत  गात असायचे. खूप कमी लोकांना त्यांच्याबद्दल माहिती होते आणि अजूनही खूप च कमी लोकांना त्याचा इतिहास माहिती आहे. इतिहासकारांचा असा दावा आहे की ते  कदाचित नाझी अत्याचारांचा पहिला आणि एकमेव भारतीय बळी होते.

विशेष बाब म्हणजे १९४४ मध्ये नाझींच्या गोळीबार पथकाने ठार केलेल्या प्रसिद्ध गुप्तहेर नूर इनायत खान यांचा जन्म मॉस्को येथे झाला होता. त्यामुळे माधवन हे एकमेव भारतीय ठरले जे नाझींच्या क्रुर अत्याचाराचा बळी ठरले होते.  माधवन यांच्या स्मरणार्थ  मेमोरियल डे ला फ्रान्स कॉम्बॅटेन्टे कोरलेले आहे. तसेच केरळमध्ये माहेमध्ये देखील त्यांच्या इतिहासातील संदर्भ जपून ठेवले गेले आहेत.

नाझी सारख्या जुलमी लोकांचा सामना करणाऱ्या या भारतीयाचे योगदान विसरता येणार नाही.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.