त्या एका आयडियामुळे माधुरीच्या धकधकची सेन्सॉरच्या कचाट्यातून सुटका झाली.

१९९२ ला बेटा रिलीज झाला न् सगळ्या माऊलींनी अशी आई असते का ? म्हणायला सुरुवात केली. एक साध्या-भोळ्या मुलाला अशी वागणुक देती म्हणून त्यावेळी लक्ष्मी देवीचा रोल केलेल्या अरुणा इराणींनी तुफान शिव्या खाल्ल्या होत्या. विषारी दुधामुळं चित्रपट अमाप हिट झाला होता.

पण यात जास्त भाव खावून गेली ती सासूला पुरुन उरलेली सुन. म्हणजे माधुरी दिक्षीत.

भारतात थोड्या फार प्रमाणात का होईना पण आता सासुला ‘आरे ला कारे’ म्हणणारी सुन मिळाली होती. आणि सोबतच 90च्या दशकातील तमाम पुरुषांना ‘धक-धक’ करायला लावणारी ‘धक-धक’ गर्ल सुद्धा. अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांचा रोमॅन्टिक आवाज आणि सोबतीला होतं सरोज खान यांच दिग्दर्शन. याच गाण्यानं माधुरीला आयुष्यभरासाठी धक-धक गर्ल म्हणून ओळख मिळवून दिली.

पण भिडूंनो, हे गाणचं जर या चित्रपटात नसतं तर ?

कारण ऑलमोस्ट कॅन्सल होत असलेलं हे गाणं चित्रपटामध्ये अगदीच शेवटच्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलं.

त्याची दोन-तीन कारण होती. पहिलं तर लिप सिंक होत नसल्यामुळे ते अतिशय शेवटच्या क्षणी चित्रीत करण्यात आलं.

अजून एक कारणं म्हणजे माधुरी त्यावेळी एका दुसऱ्या चित्रीकरणामध्ये होती त्यामुळे ती रात्रीच्या वेळी या गाण्याच्या चित्रीकरणाला वेळ देत होती. फक्त माधुरीच नव्हे, तर अनिल कपूरसुद्धा त्यावेळी आणखी एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता. त्यामुळे या दोन्ही कलाकारांनी रात्रीच्याच वेळी चित्रीकरण करत तीन ते चार दिवसांमध्ये गाण्याचं चित्रीकरण पूर्ण केलं.

पण अजून ही या गाण्याचं चित्रपटाच्या आत-बाहेर चालूच होतं. गाण्याचं दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी केलं. चित्रपट सेन्साॅरला गेलं, न् नाट लागला.

“या गाण्यामध्ये उत्तेजित करणारं अन् स्त्री देहाविषयी चुकीचा संदेश जात असल्याचं दृश्य असल्यानं स्टेप्स बदलल्याशिवाय याला परवानगी देणार नाही”

असं त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांना कळवलं.

हरतऱ्हेच्या मनवन्या करुन देखील बोर्ड अडून बसलं होतं. दोन महिने मिटींग झाल्या तरी बोर्ड आपला ठेका सोडत नव्हतं. शेवटी एका मिटींगला सरोज खान यांना बोलवण्यात आलं. त्यांनी सगळं स्पष्टीकरण दिल्यानंतरही परवानगी मिळतं नव्हती.

चर्चा चालु असतानाचं त्यांच लक्ष एका महिला सदस्याकडं गेलं.

सरोज यांनी त्या महिला सदस्याला पायात हिल्सची चप्पल घालून चालून दाखविण्यास सांगितलं. चालताना त्यांची चालीतील बदल लगेच दिसून आला. अन् हाच मुद्दा पकडत सरोज यांनी सांगितलं,

“त्यामध्ये अश्लिल नसून ते नृत्यातील सगळे भाव उतरण्यासाठी नैसर्गिकपणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळं त्यातं अक्षेपार्ह काहीच नसून शब्दातील भाव पोहचवताना झालेला बदल आहे. “

सरोज यांचं हे म्हणणं सेन्सॉरनं ग्राह्य धरलं गाण्याला लगेचं परवानगी मिळाली. अनेक अडचणी, कामाचा व्याप असताना त्यातही वेळ काढत अगदी शेवटच्या टप्प्यात चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात माधुरी झळकली आणि बस्स पाहता पाहचा तिनं प्रेक्षकांच्या काळजात अशी काही धक-धक केली की हीच तिची ओळख ठरली.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.