६० वर्षाची मॅडोना आज्जी आजही जगात सेक्स सिम्बॉल म्हणून फेमस आहे…

अप्सरेला मागं टाकणारी ६४ वर्षांची आजची म्हातारी. आणि तरी ही एव्हरग्रीन. जगातल्या सगळ्या पोराठोरांच्या दिलाची धडकन..सेक्स सिम्बॉल… आपली मडोना,

या मॅडोनाचं आयुष्य बऱ्याच वादांनी भरलंय. शाळेपासूनच पोरांना आपली अंतर्वस्त्र दाखवायची हिला भारी हौस होती. अशा या मडोनाचा इतिहास जरा बघावाच लागेल. कारण आज पण तिची ओळख सेक्स सिम्बॉल म्हणूनच आहे.

मडोनाचा जन्म १६ ऑगस्ट १९५८ ला सकाळी ७ वाजता मिशिगन मध्ये झाला. आणि या पोरीने जगाला सकाळी सकाळी चांदण्या दाखवल्या. सुरुवातीला शांत अल्लड असणाऱ्या मॅडोनाचा स्वभाव तिच्या आईच्या मृत्यूनंतर बदलला. मॅडोना अवघ्या ५ वर्षांची असताना तिच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला. आणि तिची आई वारली. वडील एक इंजिनियर होते, जनरल मोटर्स मध्ये चांगल्या नोकरीवर होते. मॅडोनाच्या आईच्या मृत्यू नंतर त्यांनी जोन गुस्ताफ्सन या नर्सशी लग्न केलं.

मॅडोनाला दोन मोठे भाऊ होते.

वडिलांच्या या दुसऱ्या लग्नाने मॅडोना खुश नव्हती. एकदा प्रसिद्ध मासिकला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिने आपल्या सावत्र आईचा कधीच स्वीकार केला नसल्याची कबुली दिली. तसेच मडोनाच्या या स्वभावामुळेच तिच्या सावत्र आईला त्रास झाल्याचं तीने सांगितलं.

जेव्हा मडोना हायस्कुल गेली तेव्हा तीच ऍडमिशन सेंट फ्रेडरिक सेंट एंड्रयूज़ एलीमेंट्री या शाळेत करण्यात आलं. या शाळेत मडोना तिच्या असभ्य वागण्यासाठी प्रसिद्ध होती.

ती शाळेतल्या मुलांना स्वतःकडे कामुकतेने बघावं यासाठी जाणीवपूर्वक आपले अंडरवेअर दाखवायची. ज्या ज्या वेळी मोकळा तास मिळायचा मडोना शाळेच्या व्हरांड्यात कार्टव्हील्स सारखे व्यायामाचे प्रकार करायची. तसंच खांबांना लोंबकळायची जेणेकरून तिच्या पँटी मुलांना दिसतील.

आता एवढंच करून ती थांबायची नाही तर, वर्ग चालू असताना ती बेंचवर बसल्यावर आपला स्कर्ट उचलायला मागे पुढे पहायचीच नाही.

मॅडोनाच्या वडिलांनी तिला पियानो शिकायच्या क्लासला घातलं पण जात्याच बंडखोर असलेल्या पोरीने बॅले शिकायचा हट्ट धरला. योगायोगाने तिला ख्रिस्तोफर फ्लिन नावाची एक चांगली शिक्षिका लाभली. तिच्या मुळे या बंडखोर पोरीचं आयुष्य बदलून गेलं.

पुढं बॅले डान्स शिकण्यासाठी या पोरीन थेट मिशिगन गाठलं. आई वडिलांचा पाठिंबा नसताना ही तिने आपल्याला नृत्यात करिअर करायचं आहे म्हणून आई वडिलांना मनवलं. पुढं ते ही तिनं मन लावून केलं नाही.

आणि पुढं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे ही पोरगी रोचेस्टर एडम्स हायस्कुलमध्ये चियरलीडर म्हणून प्रसिद्ध झाली.

पुढं तीनं हे चियरलिडरचं काम सोडून गाणी गायला सुरुवात केली. आणि ती यात इतकी फेमस झाली की यातच करियर करायचं ठरवून कॉलेजचं सोडून दिलं. न्यूयॉर्कला शिफ्ट झाली.

मॅडोना म्हणते,

“मी तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा विमानाने प्रवास केला, मी पहिल्यांदा टॅक्सीमध्ये बसले, खिशात फक्त 35 डॉलर घेऊन मी या शहरात आले होते. माझ्या जीवनातलं हे सगळ्यात मोठं धाडस होतं.”

मॅडोनाने केलेल्या त्या वेड्या धाडसामुळे तिचा एक नवीन प्रवास सुरु झाला, याच प्रवासामुळे तिला अक्ख जग ‘क्वीन ऑफ पॉप’ म्हणून ओळखायला लागलं.

तिचा हा वादग्रस्त प्रवास अजून पर्यंत संपला नाही. आज तीच वय काहीपण असो, ती तिच्या अदांनी तिच्या रॉक शो ने पुरूषांना घायाळ करतच आहे.

हे ही वाच भिडू

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.