गादीवर बसण्याची संधी आली होती, पण शिंदेंनी दूसऱ्याला बादशहा केलं : शिंदेची दिल्ली स्वारी

१७६६ मधील पानिपतची तिसरी लढाई म्हणजे मराठेशाहीतील इतिहासातील भळभळती जखम.  पानिपतामुळे मराठ्यांचा कणाच मोडला. अतोनात हानी झाली, लाखो घरे उध्वस्त झाली. पिढीच्या पिढी नष्ट झाली. याशिवाय तिजोरीलाही मोठा फटका बसला होता. 

मराठयांचं झालेलं पानिपत भरून काढलं ते सरदार महादजी शिंदे यांनी…!

पानीपतच्या पराभवाचा कलंक पुसण्यासाठी दिल्ली काबीज करायला गेलेल्या महादजी शिंदेंनी १० वर्षात दिल्ली काबीज केली होती. 

राजधानी दिल्ली म्हणजे इतिहासापासून ते आजपर्यंत भारताच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेलं शहर.  खऱ्या अर्थाने दिल्लीवर मुघलांनी राज्य केलं. दिल्लीतला मुघलांचा मुख्य राजवाडा म्हणजे लाल किल्ल्यात बसून औरंगजेबापासून पुढे अनेक बादशाहानी हिंदुस्तानच्या बऱ्या वाईटाचे निर्णय घेतले. आणि शिवरायांच्या मराठा साम्राज्याला संपवण्याचं स्वप्न बघितलं. 

नानासाहेब पेशव्यांच्या अकाली निधनानंतर माधवराव पेशव्यांवर मराठी राज्याची जबाबदारी आली त्यांनीच महादजी शिंदेंना सरदारकी दिली आणि पानिपतचे अपयश धुऊन काढण्यासाठी दिल्लीकडे रवाना केले.

स्वतःला दिल्लीचा बादशहा होण्याचा चान्स आला तरीही शिंदेंनी दुसऱ्यालाच खुर्चीवर बसवलं…आणि याच दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये बसून महादजी शिंदेंनी संपूर्ण भारतावर राज्य केलं. 

कोण होते महादजी शिंदे ?

शिंद्यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कण्हेरेखेड या गावचे. राणोजी व जयाप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहिमांतून महादजी शिंदेंना शिपाईगिरीचे शिक्षण मिळाले. महादजी शिंदेनी प्रथम तळेगाव-उंबरीच्या निजामावरील लढाईत पराक्रम करून नाव मिळविले. औरंगाबाद (१७५१), साखरखेडले, पंजाब इ. मोहिमांतही त्यांनी भाग घेतला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत (१७६१) एका पठाणाने केलेल्या आघातामुळे ते अधू झाले.

उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी पानिपतच्या लढाईनंतर महादजींनी आपले प्रयत्न सुरु केले.

शाह आलम बादशहाला दिल्लीच्या तख्तावर बसवले.

महादजी दिल्लीच्या मोहिमेवर आले. त्यावेळेस राजस्थानमध्ये, भरतपूर, मथुरा भागात राजपुतांनी बंड केलेले, ते बंड मोडून महादजी शिंदे मथुरेतून देशाचा कारभार पाहू लागले.

त्याचदरम्यान १७७० मध्ये मराठ्यांच्या भीतीने रोहील्याचा मुलगा नजीबखान हाय खाऊन मेला.  याच नजीबखानचा मुलगा झाबेता खान जेंव्हा दिल्लीवर हल्ला करायला येणार तेंव्हा दिल्लीचा बादशाह शाह आलमने दिल्लीतून पळ काढला अन बिहारमध्ये जाऊन इंग्रजांचा आश्रय घेतला. रोहिल्ल्यांनी दिल्ली काबीज केली होती. तेंव्हा बादशाह शाह आलमला मराठ्यांची आठवण आली. 

इंग्रजांच्या नजरकैदेत असलेल्या शाह आलम बादशहाने माधवराव पेशवे आणि महादजींकडे आपणास पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची विनंती केली. 

महादजींनी इंग्रजांवर दबाव आणला. महादजींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी उत्तरेतला नजीबखानाचा रोहिलखंड प्रांत लुटून ताब्यात घेतला आणि शाह आलम बादशहास इंग्रजांच्या तावडीतून सोडवलं.

तोपर्यंत नजीबखानाचा मुलगा झाबेदाखान याने दिल्लीचा ताबा घेतला होता. शाह आलम बादशहाच्या मदतीने महादजींनी दिल्लीवर हल्ला केला.  मराठ्यांच्या फौजा दिल्लीजवळ पोहोचल्या. फेब्रुवारी १७७१ मध्ये महादजींनी दिल्ली शहर जिंकून घेतले व दिल्लीच्या लाल किल्ल्याला वेढा दिला. झाबेदाखानचा काय मराठ्यांच्या पुढं टिकाव लागला नाही. शेवटी त्याला मराठ्यांनी तुरुंगात टाकले. 

याचदरम्यान १९७१ मध्ये मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून भगवा दिल्लीवर फडकावला होता. शाह आलम बादशहास दिल्लीच्या तख्तावर बसविले. 

त्यामुळे पेशव्यांनी उत्तरेत मराठयांचा जम बसविण्यास महादजी शिंदेंचा पराक्रम कारणीभूत ठरला.  दिल्लीच्या बादशाहीवरील मराठ्यांचे जे वर्चस्व कमी झाले होते,  महादजींच्या जोरावर ते पुन्हा प्रस्थापित करता आले. 

त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीवर संकट आलं..

उत्तरेत मराठे इतर युद्धात गुंतलेले पाहून त्याने मुघल बादशहा शहा आलमला ताब्यात घेऊन नजीब खान रोहिल्याचा नातू गुलाम कादिरने कारभार हाकायला सुरवात केली. त्यांना रोहिल्याचं राज्य पसंद नव्हते.

एकेकाळी महादजी शिंदेंनी शाह आलम बादशहास इंग्रजांच्या तावडीतून सोडवून दिल्लीच्या तख्तावर बसविले होते. पण पुण्यात उदभवलेलं राघोबा दादाचे बंड, कोल्हापूर गादीचा प्रश्न बारभाई कारभार अशा कारणांमुळे महादजी शिंदे दक्षिणेत अडकून पडले होते.

याचाच फायदा घेत गुलाम कादिरने या काळात दिल्लीच्या लाल किल्ल्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता.  त्याच्या जुलमी कारभाराने सगळेच वैतागलेले. 

बादशहा शाह आलम सकट अख्खा उत्तर भारत द ग्रेट मराठा महादजी शिंदे परतण्याची वाट पहात होता.

१७८८ साली महादजी शिंदेंनी दिल्लीकडे पुन्हा कूच केली. फक्त हिंदूच नाही बरेचसे मुस्लिम सरदारही कादिरच्या वर्तवणुकीला कंटाळले होते. यामुळे इस्माईल बेग सारख्या अनेकांनी मराठ्यांना साथ देण्याचं ठरवलं. महादजी शिंदेनी राणेखानाच्या नेतृत्वाखाली तोफा व मोठं पायदळ देऊन आपलं एक दल दिल्लीवर पाठवलं तर दुसरीकडे रोहिल्यांच्या अंतर्वेदीवर हल्ला केला. बचाव करण्यासाठी गुलाम कादिर दिल्ली सोडून निघाला, राणे खान त्याच्या मागावर होता त्याने १९ डिसेंबर १७८८ रोजी त्याला उचलून महादजीच्या पायाशी आणून घातले आणि जुलमी गुलाम कादिरला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि पानिपतच्या पराभवाचा बदला ही पूर्ण केला. 

आणि इकडे मराठ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीवर पद्धतशीरपणे कब्जा केला.

शहा आलमला महादजी शिंदेंनी परत गादीवर बसवले. एका मोठ्या समारंभात अंध बादशाहने महादजींना अलिजा बहाद्दर ही पदवी व वजीरकीची वस्त्रे दिली. छत्रपतींचा सरदार व पेशव्याचा प्रतिनिधी या नात्याने महादजींनी त्याचा स्वीकार केला.

महादजी शिंदेंना बादशहाकडून पेशव्यांस ‘वकील-इ-मुतालिक’ (मुख्य कारभारी) ही पदवी मिळविली. स्वतःस नायबगिरी मिळवून बादशहास ६५,००० नेमणूक करून त्यांनी सर्व अधिकार आपल्या हाती घेतले. 

महादजी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या शाही दरबारात बादशहाच्या शेजारी बसून राज्यकारभार पाहू लागले. शिवछत्रपतींच्या राज्याचा आठवण होईल असा अंमल संपूर्ण राज्यात निर्माण केला. महादजींचे शाह आलम वर आभाळाएवढे उपकार होते. त्याने वृंदावन, मथुरा अशी देवस्थाने मराठ्यांच्या ताब्यात दिली. इतकंच नाही महादजी शिंदेंची मर्जी राखायची म्हणून देशात गोवंश बंदी चा फर्मान काढला.

 महादजींच्या विरुद्ध बंड सुरु झाले. 

महादजींच्या वाढत्या सत्तेस शह देण्यासाठी मुसलमान सरदार व काही राजपूत राजे यांनी त्याविरुद्ध बंडाळी माजविली. महादजींना थोडीशी माघार घ्यावी लागली. पण त्यानंतर पातशाही कारभार महादजीने आपल्या हाती घेतला. 

अशाप्रकारे महादजींनी आपल्या पराक्रमाने व कर्तृत्वाने सतलजापासून तुंगभद्रेपर्यंत मराठी साम्राज्याच्या सीमा भिडविल्या आणि उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेचा दरारा निर्माण केला.

महादजी शिंदेंच्यामुळे दिल्लीत मराठा भीमथडी तट्टांचा मोठा वावर सुरु झाला. स्वतः महादजी लालकिल्यातून कारभार हाकत होते. त्यांनी या काळात दिल्लीमध्ये अनेक सुधारणा केल्या. काही मंदिरे उभारली.

मग प्रश्न येतो स्वतःला दिल्लीचा बादशहा होण्याचा चान्स आलेला तरीही शिंदेंनी दुसऱ्यालाच खुर्चीवर बसवलं…असं का ?

संधी असूनही मराठ्यांनी दिल्लीवर थेट राज्य का केलं नसावं?

वरचा सर्व इतिहास पाहिला तर महादजी शिंदेंनी दोनदा दिल्ली जिंकली. तख्तावर बादशहाला बसवलं त्यांना संरक्षण दिलं पण शिंदेंनी थेट तख्तावर ताबा घेतला नाही. ना दिल्लीवर स्वतःचा झेंडा फडकावला.  याच्यामागे मराठ्यांचा राष्ट्रीय दृष्टीकोन होता. दिल्ली काबीज केल्यानंतर सगळ्या राजपूत संस्थांन, अब्दाली, ब्रिटिशांसोबत ते लढले. त्यांनी भारत हा आपला देश समजून दिल्लीचं संरक्षण केलं. बादशहाची जागा घेण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही.

मात्र बादशहाला तख्तावर बसवलं असलं तरीही त्यावर मराठ्यांचा अंकुश होता. शिंदे दिल्लीच्या तख्ताचे संरक्षक होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने महादजी शिंदे हेच दिल्ली चालवत होते. त्यात करवसुलीचा अधिकार मराठ्यांनी स्वतःकडे ठेवला होता.

मात्र ही लढाई हिंदू विरुद्ध मुघल राज्यकर्त्यांमधली कधीच नव्हती तर परागंदा झालेल्या मुघल बादशहा शाह आलमला तख्तावर पुन्हा बसवण्यासाठीची मोहीम होती.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.