भारतात स्त्री शिक्षण या राणीमुळे सुरु झालं, अंगावरचे दागिने गरिबांना वाटून टाकले होते..

अशा कित्येक महिला आपल्या इतिहासात घडून गेल्यात ज्यांनी समाजासाठी अनेक महत्वाचे कार्य केले आहे, पण त्या आपल्या वाचनात किंव्हा ऐकण्यात आल्याच नाही. पण आम्ही अशा काही महिला शोधून काढल्या आहेत ज्या भारतीय इतिहासाच्या संदर्भात क्वचितच वाचायला मिळाल्या होत्या.

त्यातल्याच एक म्हणजे राणी गौरी पार्वतीबाई !

राणी गौरी पार्वतीबाई या वयाच्या तेराव्या वर्षी त्रावणकोर संस्थानाच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या.

कंपनी सरकार कडून कर्नल मन्रो राज्याचे रेसिडेंट म्हणून नियुक्त होते राणीच्या शासन काळात प्रमुख सल्लागार होते. त्यांच्या काळात सामाजिक आणि प्रशासकीय सुधारणांना वेग आला. धान्यावरील निर्यात शुल्क रद्द केले. शेतकऱ्यांशी विचारविनिमय करून नवीन कर पद्धतीचा वापर केला गेला. ‘

त्याकाळी संगमावरील घरात राहण्याचा व सोने चांदीचे दागिने घालण्याचा हक्क केवळ खानदानी लोकांना असेही प्रथम त्यांनी बंद पाडून स्वतःचे दागिने गरिबांना दान करून त्यांना हक्क मिळवून दिला.

सोन्या -चांदीचे दागिने घालण्याबाबत त्रावणकोरमधील काही कनिष्ठ जातींवरील निर्बंध काढून टाकण्यात आले आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार राहण्याची परवानगी देण्यात आली. नायरसारख्या उच्च जातींमध्ये, सोन्याचे दागिने वापरण्यासाठी विशेष परवाने मिळवायची प्रथा होती.

विशिष्ट प्रकारच्या घरांच्या वापराच्या बाबतीत देखील जाती धर्माच्या आधारावर सामाजिक निर्बंध असायचे ते देखील या राणीने मोडून काढले. सर्व जातींच्या सदस्यांना त्यांना त्यांचे घरे त्यांच्या पद्धतीने बांधण्याचा आणि सजवण्याचा मार्ग मोकळा करून दिला.

त्याचप्रमाणे पालखी, हत्तींच्यावर आणि गाड्यांमध्ये प्रवास करणे ज्यांना ज्यांना परवडेल अशा सर्वांना अशा प्रवासाची मुभा दिली गेली.

हुंडापद्धतीवर नियंत्रण ठेवावे  हुंड्याची रक्कम केवळ शंभर रुपये निश्चित केली.

अशी राणी इतिहासाने तोपर्यंत पाहिलीच नव्हती कि, त्यांनी सर्व प्रकारचे टोल टॅक्स थांबवले होते. 

बालपणापासून ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शैक्षणिक सेवा योजनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आणि त्याच प्रभावालाखाली राणी गौरी पार्वतीबाई यांनी मिशनर्‍यांना शाळा सुरू करणे व चर्च बांधण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र त्यांनी याची देखील खबरदारी घेतली कि, या शाळांमध्ये आणि चर्चमध्ये  धार्मिक कार्य व सेवा कार्य या व्यतिरिक्त कसल्याही उपक्रमासाठी परवानगी दिली नाही.

त्यांचा शिक्षणाकडे विशेष कल होता.

आपल्या प्रदेशातील लोकं शिक्षित व्हावी, जागरूक व्हावीत म्हणून त्यांनी राज्यात शिक्षणासाठी स्वतंत्र योजना तयार केली. बरं फक्त योजना तयार करूनच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी त्या योजना  यशस्वीपणे राबविण्यासाठी वार्षिक अर्थसंकल्पातून तशी विशेष तरतूद देखील केली होती.

या शिवाय त्यांनी त्या काळात देखील तेथील शाळांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद मोडून काढला. तसेच शाळेत प्रवेशासाठी गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदभाव त्यांनी ठेवला नव्हता.

मुलींसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे त्यांनी उचललले क्रांतिकारी पाऊल होते.

मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांचा सन्मान केला.

महाराणी गौरी पार्वती बाई या वयाच्या २७ व्या वर्षी राज्यकारभारातून निवृत्त होऊन आपला भाचा श्रीराम वर्मा याला गादीवर बसवले. 

पण सत्तेवरून पायउतार होऊन देखील त्यांनी त्यांचे समाज सुधारणांचे कार्य चालूच ठेवले. गादीवर बसवलेल्या आपल्या भाच्याकडून राज्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या होत्या. अशी होती राणी जिने १८ व्या शतकात देखील अनेक आधुनिक आणि धाडसी निर्णय घेतले होते. त्याच्या दीडशे वर्षानंतर देखील सत्ताधार्यांना इतके आधुनिक निर्णय घेण्याची क्षमता नाहीये कि धाडस नाहीये असा प्रश्न निर्माण होतो.

 हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.