महाराणींनी आग्रह धरून छत्रपतींचे अंत्यसंस्कार मराठा पुरोहितांकडून करवून घेतले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास संपन्न असाच आहे. शाहू महाराज म्हणजे लोकशाहीचे, सामाजिक समतेचे पुरस्कार करणारे. “एकवेळ गादी सोडीन; पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही”, या त्यांच्या वक्तव्यावरूनच त्यांचे ध्येय लक्षात येते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या प्रवासात त्यांच्या साथी राहिलेल्या त्यांच्या पत्नी महाराणी लक्ष्मीबाई यांचे संदर्भ इतिहासात काहीसे कमीच आहेत.. महाराणी लक्ष्मीबाई या राजाराम छत्रपतींच्या मातोश्री म्हणजेच आईसाहेब महाराज होत.
महाराणी लक्ष्मीबाई महाराज ज्या शाहू महाराजांच्या प्रत्येक सामाजिक सुधारणांच्या कार्यात आणि निर्णयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. शिवाय शाहू महाराजांचे सत्यशोधकी विचार देखील त्यांनी जपले आणि अंगिकारले. तसेच हीच त्यांनी शिकवण राजाराम महाराजांना दिली.  आणि राजाराम महाराजांनी देखील राजर्षी शाहू महाराजांच्या आणी आईसाहेबांच्या  पुरोगामी विचारांचा वारसा आयुष्यभर जोपासला.

तर अशा राजाराम महाराजांना घडवणाऱ्या आणि शाहू महाराजांना साथ देणाऱ्या महाराणी लक्ष्मीबाई ऊर्फ आईसाहेब महाराज यांचा जन्म १८८० मध्ये बडोदा येथे झाला. त्यांचे वडील म्हणजे बडोद्याचे श्रीमंत गुणाजीराव खानविलकर.

शाहू महाराज आणि महाराणी लक्ष्मीबाई यांचा विवाह १८९१ मध्ये संपन्न झाला आणि छत्रपतींच्या  महाराणी म्हणून त्या कोल्हापुरास आल्या. या वेळी छत्रपतींचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाईंचे वय १२ वर्षांहून कमी होते.

लक्ष्मीबाईंचा स्वभाग जितका करारी होता तितकाच कनवाळू आणि प्रेमळ होता.  त्यांना वाचनाची आवड तर होतीच, शिवाय त्यांना आयुर्वेदाचे चांगले ज्ञान होते. म्हणून त्या त्यांच्या ज्ञानाचा उपयोग कुटुंबियांना आणि नातलगांना औषधे सांगत असायच्या.

महाराणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांचे वैवाहिक जीवन सुखी व संपन्न होते. लक्ष्मीबाई महाराजांच्या पत्नी म्हणून त्या महाराजांच्या वैयक्तिक आवडी-निवडी, त्यांचे छंद जाणून घेण्यात आवड होती. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नाते होते. शाहू महाराज लक्ष्मीबाईचा खूप आदर करायचे आणि तितकेच प्रेम देखील करायचे. जेंव्हा भोगावती नदीवर धरण बांधण्यात आले तेंव्हा त्याचा शुभारंभ महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते करण्यात आला होता.  तसेच तेथील तलावाला देखील छत्रपतींनी ‘महाराणी लक्ष्मीबाई तलाव’ असे नाव दिले होते.

१८९४ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानचा राज्यकारभार हाती घेतला. आणि झपाट्याने कामाला लागले. राज्यात गावोगावी फिरून लोकांची दुःखे आणि समस्या जाणून घेतल्या. 

तो असा काळ होता जेंव्हा अस्पृश्यांना विद्येचा अधिकार तर नव्हताच पण देवालये, चावड्या, सार्वजनिक पाणवठे अशा ठिकाणी त्यांना प्रवेश नव्हता. पण महाराजांनी हि अस्पृश्यता संपवण्याचा स्वतःपासून सुरुवात केली.

१९२२ मध्ये राजर्षी शाहू छत्रपतींचे मुंबई येथे अकाली निधन झाले.

छत्रपतींच्या मृत्यूमुळे सर्व कोल्हापूर संस्थान शोकाकुल झाले. छत्रपतींची कोल्हापुरात नव्या राजवाड्यावरून मानसन्मानासहित प्रचंड मोठी अंत्ययात्रा निघाली ती थेट स्मशानापर्यंत.

पण याच वेळेस एक असा प्रसंग घडला तो संपूर्ण महाराष्ट्राला कलाटणी देणारा ठरला. तो म्हणजे, शिवाजी वैदिक विद्यालयाच्या मराठा विद्यार्थ्यांना छत्रपतींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण पुरोहितांच्या ऐवजी मराठा पुरोहित म्हणून बोलवण्यात आले. छत्रपतींचा अंत्यविधी वैदिक स्कूलच्या ब्राह्मणेतर पुरोहितांकडून होण्याचा महाराष्ट्राच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग होता.  आणि हा धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे विधवा महाराणी लक्ष्मीबाई यांनी. शाहूंच्या जाण्यामुळे त्याही तितक्याच दुखात बुडाल्या होत्या पण या हि परिस्थितीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला.

काहीही होवो, मी माझ्या पतीच्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहीन,’ असा महाराणी साहेबांनी निश्चय केला.

कालांतराने राजाराम महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजमाता श्री लक्ष्मीबाई आईसाहेब महाराज यांच्या हस्ते श्री शाहू वैदिक विद्यालय सुरू करण्यात आले. या विद्यालयाचा उपयोग समाजाला चांगला होता. परगावहून धार्मिक विधींचे शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी येत असत. त्यांची सोय करण्यासाठी हे विद्यालय उघडण्यात आले त्यात आईसाहेबांचे योगदान होते.

त्यांनी शाहू महाराजांचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. अशातच १२ मच १९४५ रोजी आईसाहेब महाराज यांचे निधन झाले.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.