तो व्हायरल फोटो अन् शाहरुख खानच्या आईचं आणि इंदिरा गांधींचं कनेक्शन

सोशल मीडियावर २ गोष्टी चवीने चघळल्या जातात त्या म्हणजे राजकारण आणि दुसरं बॉलिवूड. राजकारणावर लोकांना बोलून कंटाळा आलाय त्यामुळे हा मोर्चा आता बॉलिवूड सेलिब्रेटीवर वळलाय..

आपला लाडका किंग खान शाहरुखन सोशल मीडियावर ट्रेंडींगला आहे. असणारच शाहरुख आर माधवनचा चित्रपट रॉकेट्रीमधून एंट्री मारतोय. 

पण तो ट्रेंड ला असण्याचं कारण म्हणजे, शाहरुखच्या आईचा एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. 

SHARUKH MOM

शाहरुख खानची आई फातिमा खान या फोटोत दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी  यांच्यासोबत दिसतायेत. त्यामुळे या फोटो मागची नक्की स्टोरी काय असेल? आणिनशाहरुख खानच्या आईचा आणि इंदिरा गांधींचं काय कनेक्शन असेल याची उत्सुकता लागलीये.

शाहरुखने आपल्या मुलाखतीत सांगितो की, त्याच्या आई-वडिलांची प्रेमविवाह होता. त्यानंतर शाहरुख खानचा जन्म १९६५ मध्ये झाला.

शाहरुख खानचे आजोबा जान मुहम्मद हे अफगाण होते. आणि वडील मीर खान मोहम्मद खान हे पेशावरचे एक पठाण होते. त्यांनी त्याकाळी एमए एलएलबी पदवी मिळवली. त्यांना इंग्रजी, हिंदी, पंजाबी, पश्तो, संस्कृत आणि पारशी अशा सहा भाषा येत होत्या. 

मीर खान मोहम्मद यांची आणखी एक ओळख म्हणजे ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचं वय फक्त १६ वर्षांचं होतं. तेंव्हा त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांसोबत स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला. 

खान हे व्यवसायाने वकील होते, काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. येथेच ते खान अब्दुल गफार खान यांच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. मीर ताज मोहम्मद हे सर्वात तरुण स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. ऑगस्ट १९४२ मध्ये काँग्रेसने “भारत छोडो आंदोलन” सुरू केले ज्यात नेहरू आणि गांधींसह अनेकांना अटक करण्यात आली. त्यांच्यामध्ये मीर ताज मोहम्मद हे देखील होते.

१९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या काही काळ आधी ते पेशावरहून कायमचे दिल्लीला गेले. त्यांना जिनांच्या पाकिस्तानवर विश्वास नव्हता आणि त्यांनी महात्मा गांधींच्या धर्मनिरपेक्ष भारतावर विश्वास व्यक्त करत पाकिस्तान सोडला आणि फाळणीनंतर ते ताज मोहम्मद पेशावर सोडून दिल्लीत आले.

अशी माहिती मिळतेय कि, त्यांनी फ्रंटियर गांधी, खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता.

आता येऊया शाहरुख खानच्या आईच्या त्या व्हायरल फोटोच्या स्टोरीवर..

शाहरुख खान त्याच्या आईची म्हणजेच फातिमा खान यांची आठवण प्रत्येक मुलाखतीत काढतोच काढतो. फातिमा खान यांचा जन्म १९४१ मध्ये हैदराबादच्या टोलीचौकी येथे झाला. फातिमा खान  मूळच्या हैदराबादच्या होत्या, मात्र त्यांचं कुटुंब कर्नाटकात राहायचं

 शाहरुखच्या आई-वडिलांनी प्रेमविवाह केला. त्यांची लव्ह-स्टोरी एका अपघातामुळे सुरु म्हणायला हरकत नाही.

झालं असं की, फातिमा अपघातात जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तिथेच मीर खान देखील हजर होते. फातिमा यांना रक्ताची गरज भासली तेंव्हा त्यांना मीर खान यांनी रक्तदान केलं आणि झालं पुढे दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. 

फातिमा खान या मीर खान मोहम्मद खान यांच्यापेक्षा १० वर्षांनी लहान होत्या. फातिमा यांचे वडील देखील ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकले होते. त्यानंतर फातिमा यांनी देखील ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण घेतलं. त्या तसेच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या रँक-होल्डर मजिस्ट्रेट होत्या.  तसेच फातिमाजींचे दक्षिणेतील ४ भाषांवर उत्तम प्रभुत्व असल्याचे सांगितले जाते.  

फातिमा या सामाजिक न्यायदंडाधिकारी होत्या ज्या मुलांच्या तुरुंगात फिरत आणि त्यांच्या केसेस पाहत असत. 

शाहरुखचे वडील मीर ताज मोहम्मद यांना कॅन्सरचं निदान झालं होतं आणि घरची आर्थिक परिस्थिती अचानक बिकट झाली. मात्र फातिमा दिवसा न्यायदंडाधिकारी म्हणून काम करायच्या आणि सोबतच रेस्टोरंन्ट चा जोडव्यवसाय करत असत असं सांगितलं जातं.

इतकं असूनही त्या सामाजिक जीवनात देखील सक्रिय होत्या. त्या काळात एक प्रभावशाली महिला, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. 

स्वातंत्र्योत्तर काळात अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा पुढाकार असायचा. त्या काळात शिक्षणात, सरकारी कामकाजात आणि सामाजिक जीवनात कार्यरत असणाऱ्या महिलांमध्ये मुस्लिम महिला म्हणून त्यांचं विशेष कौतुक असायचं. 

याचदरम्यान त्यांची ओळख तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसोबत झाली. 

काही सामाजिक उपक्रम  इंदिराजींच्या पुढाकाराने पार पडते होते. त्या दरम्यान फातिमा इंदिरा गांधी यांच्या जवळच्या सहकारी बनल्या. आणि अशाच काही कार्यक्रमामध्ये फातिमा यांचा इंदिराजींसोबतच हा फोटो कॅप्चर झाला. 

पुढे १९९० मध्ये जेंव्हा शाहरुख चा दिवाना हा पिक्चरचे शूटिंग चालू होते त्यादरम्यान फातिमा यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.