३ नव्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर तरी भरतीतला गोंधळ मिटणार का?

आधी आरोग्य विभागाच्या आणि नंतर म्हाडाच्या परीक्षेचे पेपर फुटले. आरोग्य विभागाचा पेपर तर अधिकाऱ्यांनीच फोडला असल्याचं समोर आला होतं. न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आरोग्य विभागाची परीक्षा घेतली होती. या कंपनीनं घातलेल्या गोंधळामुळं ऐन टायमाला परीक्षा पुढं ढकलावी लागली होती. 

म्हाडापेपर फुटीप्रकरणी तर परीक्षा घेणाऱ्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लि.या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच अटक करण्यात आली आहे. 

नोकरभरतीत होणाऱ्या या प्रकारांनमुळे राज्यसरकारला विधार्थ्यंच्या रोषाला तोंड द्यावे लागत होते.  विरोधकांनी तर मंत्र्यांनी  राजीनामे देण्याची मागणी केली होती. आता याच गोंधळावर महाराष्ट्र सरकारनं नवीन उपाय शोधलाय.

परीक्षांची तयारी करणारे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांतील नोकरभर्तीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा खाजगी कंपन्यांनकरवी न घेता एमपीएससीतर्फे घेण्यात याव्यात अशी मागणी करत होते.

मात्र एमपीएससीने या परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती. महाराष्ट्र सरकारनं ज्या पाच कंपन्या ऑनलाईन परीक्षेसाठी निवडल्या होत्या त्यांच्या विश्वासार्हतेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते.

मग आता महाराष्ट्र सरकारने आयबीपीएस, टीसीएस,एमकेसीएल या तीन कंपन्यांची निवड केलीय.

यापैकी आयबीपीएस, टीसीएस या कंपन्यांना राष्ट्रीय पातळीवरील एसएससी, खाजगी तसेच सरकारी बँकांमध्ये भरतीच्या परीक्षा घेण्याच्या अनुभव आहे. राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गोंधळ आणि भ्रष्टाचारही कमी असल्याचे विद्यार्थी सांगतात. मग यांना या अधिच कॉन्ट्रॅक्ट का दिले नाहीत याची उत्तरे मात्र सरकारनं दिली नाहीएत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे २०२० मध्ये राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने जेव्हा निविदा काढल्या होत्या तेव्हा टीसीएसनं  पण निविदा भरून पाठवली होती. 

मात्र ज्या ५ फायनल कंपन्या निवडण्यात आल्या तेव्हा आयटी क्षेत्रातली लीडर मानल्या जाणाऱ्या टीसीएसचं नाव त्यात नव्हत. असे कोणते निकष माहिती तंत्रज्ञान विभागाने लावले होते की  टीसीएसलाही रिजेक्ट व्हावं लागलं? मात्र याचंही उत्तर राज्यसरकारणं दिला नव्हता. आता म्हाडाची परीक्षा जेव्हा घेण्याची वेळ अली तेव्हा राज्यसरकारला टीसीएसकडेच जावं लागलं.

आपल्या टीसीएस-आयओएन या कंपनीच्या माध्यमातून टीसीएसनं स्पर्धा परीक्षा घेण्यामध्ये चांगलं  नाव कमवलं आहे. देशभरात जवळपास १००० केंद्रांमध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्याचा अनुभव टीसीएसकडे आहे. विशषेतः रेल्वे आणि केंद्रीय स्टाफ सीलेक्शनच्या परीक्षा ज्यात लाखो विद्यार्थी एकाचवेळी परीक्षा देतात या परीक्षा यशस्वीपणे हाताळण्याचा अनुभव टीसीएसकडे आहे .

यातील दुसरी कंपनी आहे आयबीपीएस. बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS)  ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील सरकारी मालकीची बँक कर्मचारी भरती एजन्सी आहे.

बँकांबरोबरच इतर ही संस्थांना हि संस्था आपली सेवा देते.

यातील तिसरी कंपनी आहे एमकेसीएल. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ही महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाची कंपनी आहे. प्रामुख्याने कॉम्पुटरचं शिक्षण देणारी हि संस्था एमएससी-आयटी सारखे कोर्स घेते. महाराष्ट्रभर जवळपास यांचे ५०० केंद्र आहेत.

त्यामुळं आता कंपन्या बदलून तरी भरती परीक्षेमधला गोंधळ थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेत. विशेषतः कोरोनानंतर वाढलेल्या बेरोजगारीनंतर अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षांकडे वळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष राज्यसरकारला परवडण्यासारखा नाहीए.    

Leave A Reply

Your email address will not be published.