महाराष्ट्रातील अनेक खासदारांना २०१९-२० मधील खासदार निधी अद्याप मिळालेला नाही…

सध्या कोरोना काळात खासदारांना मिळणार खासदार निधी २ वर्षांसाठी निलंबित आहे. मागच्या वर्षी हा खासदार निधी गोठवून तो consolidated fund मध्ये जमा केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. हा खासदार निधी मिळावा म्हणून विनायक राऊत, डॉ. अमोल कोल्हे यांच्या सारखे अनेक खासदार मागणी करत आहेत.

मात्र राज्यातील अनेक खासदारांना अदयाप २०१८-१९, २०१९-२० या वर्षातीलच खासदार निधी मिळालेला नसल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे. उद्योजक प्रफुल्ल सारडा यांनी मागवलेल्या माहितीमधून ही गोष्ट उघड झाली आहे. सोबतच www.mplads.gov.in या वेबसाईटवर देखील याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

हा पेंडिंग खासदार निधी मिळावा म्हणून खासदारांनी पंतप्रधान कार्यलायाला अनेकदा पत्र देखील लिहिली आहेत. मात्र तरीही त्यांना हा खासदार निधी मिळालेला नाही. त्यामुळेचं हा खासदार निधी देण्यासाठी केंद्र सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप सारडा यांनी केला आहे.

कोणकोणत्या खासदारांचा कोणत्या वर्षाचा निधी पेंडिंग आहे?

२०१८-१९ मधील निधी न मिळालेले खासदार : 

  • खा. प्रितम मुंडे
  • खा. सुभाष भामरे
  • खा. राजेंद्र गावित
  • खा. रावसाहेब दानवे
  • खा. सुप्रिया सुळे

२०१९-२० मधील निधी न मिळालेले खासदार :  

  • खा. इम्तियाज जलिल
  • खा. भारती पवार
  • खा. हिना गावित
  • खा. सुजय पाटील
  • खा. जयसिद्धेश्वर स्वामी
  • खा. अरविंद सावंत
  • खा. अशोक नेते
  • खा. धर्यशील माने
  • खा. गजानन कीर्तिकर
  • गिरीश बापट
  • गोपाल शेट्टी
  • हेमंत पाटील
  • हेमंत गोडसे
  • कपिल पाटील
  • कृपाल तुमणे
  • नितीन गडकरी
  • ओमप्रकाश राजेनिंबाळकर
  • प्रतापराव चिखलीकर
  • प्रतापराव जाधव
  • राहुल शेवाळे
  • राजन विचारे
  • रणजितसिंह निंबाळकर
  • सदाशिव लोखंडे
  • संजय जाधव
  • संजय मंडलिक
  • संजय काका पाटील
  • श्रीरंग बारणे
  • सुधाकर श्रृंगारे
  • उन्मेश पाटील
  • विनायक राऊत
  • रक्षा खडसे

२०२०-२१ मधील निधी न मिळालेले खासदार : 

  • खा. अमोल कोल्हे
  • खा. नवनीत राणा

राज्यसभेतील खासदार 

२०१८-१९ मधील निधी न मिळालेले खासदार  

  • खा. पियुष गोयल
  • खा. प्रफुल्ल पटेल
  • खा. संजय राऊत
  • खा. विनय सहस्त्रबुद्धे

२०१९-२० मधील निधी न मिळालेले खासदार

  • खा. नारायण राणे
  • खा. पी. चिदंबरम
  • खा. अनिल देसाई
  • खा. प्रकाश जावडेकर
  • खा. व्ही. मुरलीधरन
  • खा. वंदना चव्हाण

२०२०-२१ मधील निधी न मिळालेले खासदार 

  • खा. केशव उर्फ कुमार केतकर

खासदारांनी यासाठी पत्र देखील लिहिली आहेत

खासदार श्रीरंग बारणे यांनी १९ नोव्हेंबर २०२० रोजी हा प्रलंबित निधी मिळावा म्हणून राव इंद्रजित सिंग या राज्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.

shrirang barane 1st letter

त्यानंतर जवळपास महिन्याभराने म्हणजे १५ डिसेंबर २०२० रोजी राव इंद्रजित सिंह यांच्या कार्यालयाने पत्र मिळलं असल्याच सांगितले होते.  barane reply

त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी १० जून २०२० रोजी प्रलंबित खासदार निधीसाठी पत्र लिहिलं होतं.

prafull patel

यावर्षी म्हणजे मार्च २०२१ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांना प्रलंबित खासदार निधी मिळावा म्हणून पत्र लिहावं लागलं होतं.

prakash javdekar

८ जुन २०२० रोजी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी देखील खासदार निधी साठी पत्र लिहिलं होतं. यातून ते निसर्ग चक्रीवादळातून झालेल्या नुकसान भरपाईसाठी निधी उपलब्ध करून देणार होते.

rahul shewale

त्यानंतर जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी देखील तत्कालीन केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना प्रलंबित खासदार निधीसाठी पत्र लिहिलं होतं.

umesh patil

खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्रावर अनुराग ठाकूर यांनी दिलेले उत्तर…

umesh patil reply

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी २१ जुलै २०२० रोजी प्रलंबित खासदार निधीसाठी पत्र लिहिलं होतं.

vinayak raut

थोडक्यात कोण्या एका पक्षाचे नाही तर सर्वपक्षीय खासदारांचा निधी प्रलंबित असल्याचं दिसून येतो..

केंद्र सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप 

उद्योजक प्रफुल्ल सराडा यांनी मागवलेल्या माहितीमधून ही गोष्ट समोर आली असल्याने ‘बोल भिडू’ ने त्यांचं मत जाणून घेतलं. ते म्हणाले,

केंद्र सरकारने २०२१-२२ आणि २०२२-२३ सालचा खासदार निधी निलंबित केला आहे. मात्र त्या सोबतच २०१८-१९ आणि २०१९-२० चे देखील खासदार निधी अद्याप खासदारांना मिळेलेले नाहीत. ते का त्याच कारण देखील केंद्राने कुठेही सांगितलेले नाही.

याबाबत अनेकदा पत्र व्यवहार खासदारांनी केले आहेत, मात्र केवळ पत्र पुढे पाठवलं आहे एवढीच उत्तर मिळतं आहेत. त्यामुळे केंद्र सरकार हा निधी देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं स्पष्ट दिसून येते. सोबतच इतिहासात पहिल्यांदाच राव इंद्रजित सिंह या राज्यमंत्र्यांनी तत्कालीन वरिष्ठ कॅबिनेट मंत्री असलेल्या प्रकाश जावडेकर यांचा खासदार निधी निलंबित केल्याचा प्रकार घडला आहे असं देखील सारडा म्हणाले.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.