परीक्षा देण्यासाठी महर्षी कर्वेंनी 125 मैलांचं अंतर 3 दिवस पायी चालून पार केलं होतं.

 भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे पहिली महाराष्ट्रीय व्यक्ती म्हणजे महर्षी कर्वे.

धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित झाले. त्यांनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क विधवा-पुनर्विवाह यासाठी आपलं 104 वर्षाचं जीवन वाहिलेलं तसेच आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री समाज सुधारक म्हणून ते भारतभर प्रसिद्ध झाले.

धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 साली रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शेरवली या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव तर त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. समाजसेवा करणे आणि शिक्षण याचं त्यांना प्रचंड वेड होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे महर्षी कर्वे यांचं गाव होतं. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागत असे.

१८७६ मध्ये शाळेची परीक्षा देण्यासाठी कुंभाली घाटातुन १२५ मैलांचे अंतर ३ दिवस पायी चालुन पार केले व सातारा येथे पोहचले.

पुढील शिक्षण त्यांनी रत्नागिरीला पुर्ण केले. रत्नगिरीमध्येच एका मराठी शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. १८८१ मध्ये कवं हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1881 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.

पुढे शिक्षणासाठी कर्वे पुण्यात आले आणि तत्कालीन परिस्थितीमुळे ते अस्वस्थ झाले. समाजात बदल घडवून आणण्याचे विचार त्यांच्या डोक्यात सुरू होते आणि यातून एक मोठा बदल घडला तो म्हणजे विधवा पुनर्विवाह. त्यावेळी उच्च वर्णीय समाजात स्त्रियांची परिस्थिती अतिशय दयनीय होती. विशेषतः विधवा स्त्रियांची स्थिती तर अतिशय कठीण होती. समाजाने त्यांच्यावर कर्मठ निर्बंध घातले होते. त्या काळात बालमृत्यूचे प्रमाण खूप होते. म्हणून बालविधवांची संख्या फार मोठी होती आणि शिक्षणासाठी त्यांना कुटुंबीयांचा व पर्यायाने समाजाचा छळ सहन करत उभे आयुष्य काढावे लागत होते.

महर्षी कर्वे विचारांत पडले. विधुर झालेला पुरुष पुन्हा विवाह करू शकतो, मग विधवा स्त्री का विवाह करू शकत नाही ? या प्रश्नाने ते अस्वस्थ होत. दुर्दैवाने कर्वे यांच्या प्रथम पत्नीचा मृत्यू झाला आणि त्यांना घरातून पुन्हा लग्नासाठी आग्रह होऊ लागला. तेव्हा कर्वे यांनी एक फार मोठे पाऊल टाकले. त्यांनी विवाह केला तो एका विधवेशीच अगदी वपन केलेल्या स्त्रीशी. या धाडसाचे फळ म्हणून समाजाचा छळ, बहिष्कार त्यांनी सोसला. त्यांच्या पत्नी बाया कर्वे यांनी महर्षी कर्वे यांना समाजकार्यात जन्मभर साथ दिली.

महिलांसाठी महर्षी कर्वे यांनी भरीव काम केलं. स्वतः कसं शिक्षण घेतलं किती पायपीट केली याची त्यांना कल्पना होती पण आपल्यासारखे हाल दुसऱ्याचे होऊ नये म्हणून कर्वे यांनी महिलांसाठी शाळा सुरू केली. महर्षी कर्वे यांच्या शिक्षणाचं महत्व इतकं मोठं की परीक्षा देण्यासाठी ते 3 दिवस चालत असायचे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.