महाशिवरात्री का साजरी केली जाते, वाचा.
भारतात अनेक उत्सव साजरे केले जातात. अनेक धर्म परंपरा असणाऱ्या आपल्या देशाला म्हणूनच उत्सवांचा देश असे हि ओळखले जाते. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत अशी मान्यता आहे. त्यामुळे हिंदू धर्मात अनेक उत्सव, उपवास देवाची आराधना केली जाते. यातीलच एक प्रसिद्ध उत्सव म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री आपल्याकडे उत्साहात साजरी केली जाते.
अनेक जण या दिवशी महादेवाची म्हणजेच भगवान शंकराची प्रार्थना म्हणून उपवास करतात तसेच पिंडीवर अभिषेक देखील करतात. पण अनेक वेळा आपल्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल कि,
आपण नेमक महाशिवरात्री का साजरी केली जाते ? या प्रश्नाच उत्तर आम्ही तुम्हाला देऊ.
समुद्र मंथना वेळी राक्षस आणि देवांच्यात युद्ध झाले होते. या मंथनात प्राप्त झालेली सगळी संपती समान वाटून घेण्यात आली होती. पण एक भांडण मात्र जोरात चालू होत ते म्हणजे अमृत कोणी घायचं या साठी. कारण हे अमृत जो कोणी पिणार होता तो कायमचा अमर होणार होता. पण मंथनात हे अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडत होत, जे सगळीकडे पसरत होत. त्यामुळे देव, साधू, सन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले.
यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळ विष पिऊन घेतल आणि ते आपल्या गळ्यात थांबवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकरास नीळकंठ असे हि म्हणले जाते. शंकरानी स्वत सगळ विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशत म्हणजेच त्या पोर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात.
या महाशिवरात्री पाठीमागे अजून एक कथा सांगितली जाते.
एकदा ब्रह्मा आणि विष्णूदोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड अशांतत निर्माण झाली. नंतर हे भांडण खूप विकोपाला गेले. भांडण कसे मिटवायचे या चिंतेत सगळे देव होते. तेव्हा त्यांनी शंकराच्या कानावर हि गोष्ट घातली. भगवान शंकर एका मोठ्या सुरवात आणि शेवट नसणाऱ्या पिंडीच्या रुपात प्रकट झाले. हे पाहून ब्रह्मा आणि विष्णू यांना हे महाकाय रूप कशाचे आहे हे समजेना. मग विष्णू ने सुकरचे रूप धारण केले आणि विष्णू ने हंस रूप धरण करून पिंडीची सुरवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला.
शेवटी दोघे ही हे शोधण्यात असमर्थ ठरल्याने त्यांनी त्या पिंडी समोर हात जोडले. हात जोडताच त्यातून ओम असा स्वर ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्म आणि विष्णू ज्या लक्षात आले कि पिंडीच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्पटीकाच्या रुपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची पूजा करायला लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर पिंडीच्या रुपात प्रकट झाल्याने या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.