माझे फुटबॉलचे प्रयोग : महात्मा गांधी

ग्लोबल माणसाची ग्लोबल गोष्ट,

महात्मा गांधी,

भारताचा सगळ्यात ग्लोबल माणूस. देशाच्याच काय तर जगाच्या पातळीवर इतिहासावर बोलत असताना महात्मा गांधींच नाव घ्यावच लागतं. हि गोष्ट महात्मा गांधी आणि त्यांच्या फुटबॉलप्रेमाची. पण त्याअगोदर एक सल्ला, तुम्ही चुकून कधी साऊथ आफ्रिकेला गेलाच तर गांधीजींचे पुतळे आणि स्मारकांबरोबरच त्यांनी सुरु केलेल्या फुटबॉल क्लब्सना भेट देऊन या. (आता क्लब बंद झाले असले तरी मैदाने आहेत).

323926 gallery

गांधीजी आणि द. आफ्रिका म्हणलं कि, आपल्याला फक्त रेल्वे स्टेशनवर झालेला अपमान आणि त्याविरुद्ध त्यांनी केलेलं बंड एवढच आठवणार पण हाच अपमान त्यांना फुटबॉलच्या मैदानापर्यंत घेऊन गेला होता.

तर गोष्ट चालू होते  १९ शतकाच्या उतरार्धात, तेव्हा क्रिकेट हा फक्त गोऱ्या लोकांचा खेळ होता. काळया लोकांना क्रिकेट बघायला देखील बंदी होती. त्यामुळे द.आफ्रिकेतील बहुतांश काळी जनता ज्यामध्ये भारतातून गेलेले मजूर आणि छोटे व्यापारी देखील होते यांचा प्रमुख खेळ फुटबॉलच होता.

क्रिकेट हा कायमच “जंटलमन्स गेम” राहिला आहे. आणि फुटबॉलमध्ये एक तरी हाड मोडल्याशिवाय सामना संपत नाही, मग म.गांधीसारखा अहिंसावादी माणूस फुटबॉलकडे कसा आकर्षित झाला असेल ?

द.आफ्रिकेत फुटबॉलचे सामने बघायला भरपूर गर्दी होत असे, ही गर्दी अशा लोकांची होती कि ज्यांना कधी ना कधी वंशवादाचा त्रास सहन करायला लागला आहे. आत्ता जसा फुटबॉल टीमचा मॅनेजर सामन्याच्या हाफटाइम मध्ये टीमला मार्गदर्शन करतो तसेच गांधी या सामन्याच्या मध्ये उपस्थित गर्दीला मार्गदर्शन करत, आंदोलनाची पत्रकं वाटतं.

 

84a6d669 8788 4cbf ad2c 1f202324a8c0

फक्त भाषणं द्यायला आणि आंदोलनं करायला गांधी फुटबॉल कडे बघत नव्हते. तर द. आफ्रिकेत फुटबॉल प्रसार करायला देखील गांधींनी बरीच मदत केली.

डर्बन, प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग या तीन शहरात त्यांनी फुटबॉलचे क्लब काढले होते. या क्लबनां नाव पण त्यांनी “पॅसिव्ह रेसिस्टर्स” असं दिल होतं. गांधी स्वतः कधी फुटबॉल खेळले याचा पुरावा नसला तरी ते आपल्या संघांचा सामना बघायला मात्र उपस्थित राहत. पुढे ते भारतात आले आणि लगेचच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले परंतु आफ्रिकेत सुरु केलेल्या फुटबॉल संघांशी ते संबंध टिकवून होते.

१९२१-२२ मध्ये आफ्रिकेतील संपूर्ण भारतीय लोकांचा फुटबॉल संघ असणाऱ्या “ख्रिस्तोफर्स काँटिजंट” या संघाला भारतात आमंत्रित केलं. या संघाने वर्षभरात देशात विविध ठिकाणी १४ सामने खेळले. अहमदाबाद मधील मॅच बघायला स्वतः गांधीजी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.