गांधीजींच्या मृत्यूच्या जवळपास ४९ वर्षांनी त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलेलं

महात्मा गांधींचे हौतात्म्य म्हणजे विद्वेष आणि रक्तपात थांबविण्यासाठी त्यांनी मृत्यू पत्करला होता. आपण एकमेकांचा जीव घेणे थांबवावे म्हणून त्यांनी आपले जीवन दिले. ३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. कारण काय तर भारताची फाळणी.

भारताची फाळणी गांधींमुळे झाली असं गृहीत धरून मारेकरी नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळी झाडली. हा एक पुरोगामी हिंदू होता आणि त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते. त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते.

गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे. हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे. गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले. तेव्हा नेहरू म्हणतात,

माझ्या मित्र आणि सहकार्‍यांनो, आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेलाय. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे आणि मला कळत नाही आहे तुम्हाला काय आणि कसे सांगावे. पण आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने ’बापू’ म्हणायचो ते आता आपल्यात नाहीत. त्यांच्या सानिध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार नाही. हा एक प्रचंड धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील कोट्यावधी लोकांसाठीसुद्धा.

नथुरामने गांधींना मारलं कारण गांधींची अहिंसा हिंदूंना कायर बनवुन टाकेल असं त्याचं म्हणणं होतं. कानपूरमध्ये गणेश शंकर विद्यार्थीला मुस्लिमांनी निर्दयपणे मारून टाकल होता. महात्मा गांधी हिंदूंना गणेश शंकर विद्यार्थी सारखे बनवतील आणि बलिदान द्यायच्या गोष्टी करायचे. नथुराम गोडसेला भीती होती गांधीजींची अहिंसावादी नीती हिंदूंना कमकुवत बनवे. आणि हिंदू आपल्या अधिकार प्राप्त करू शकणार नाहीत. यामुळे गोडसेने गांधीजींवर गोळी झाडून हत्या केली होती.

महात्मा गांधीजींची हत्या ३० जानेवारी १९४८ ला झाली. त्यानंतर अवघ्या काही तासातच जगभरातून शोक संदेश शोक भावना प्राप्त होऊ लागल्या. संपूर्ण जग शोकमग्न झाले. महात्मा गांधी यांच्या अंत्ययात्रेत सगळ्याच गोष्टी न भूतो न भविष्यती अशा होत्या. जवळपास दहा लाख लोक त्यांच्या अंत्ययात्रेत चालत होते. पंधरा लाखापेक्षा लोक रस्त्यावर, झाडावर उभे होते. संयुक्त राष्ट्र संघाचा ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला. स्थलसेना, वायुसेना, नौसेनेच्या २०० सैनिकांचे दल ४ दोरखंडाद्वारे गांधीजींच पार्थिव असलेली गाडी ओढत होते.

हजारो सैनिक, पोलीस अंतिम यात्रेत मागे पुढे चालत होते. त्यांच्या अस्थींचे २२ कलश तयार करण्यात आले. बिर्ला हाऊस मध्ये एक तर २२ कलश देशातील विविध ठिकाणी दर्शनासाठी पाठवण्यात आले. गांधीजींच्या मूळ अस्थी विशेष रेल्वे द्वारा दिल्लीहून अलाहाबादला पाठवण्यात आल्या.

जवळपास सर्व अस्थींचे विसर्जन १२ फेब्रुवारी १९४८ ला अलाहाबाद येथील संगमावर करण्यात आले. पण काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. १९९७ मध्ये तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. हे रक्षापात्र एका बँकेमधील लॉकरमध्ये सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते.

३० जानेवारीला त्यांच्या परिवाराने अजून एका रक्षापात्राचे विसर्जन मुंबईत गिरगाव चौपाटीवर केले. हे पात्र एका दुबईमधील व्यापार्‍याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयाला पाठविले होते. अजून एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे जिथे गांधीजी १९४२ आणि १९४४ च्या दरम्यान बंदिवासात होते. आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक श्राइन येथे आहे.

महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर आज सात दशकांचा काळ लोटला आहे तरीदेखील महात्मा गांधींचे विचार कार्य प्रभाव आज संपूर्ण भारतभर पाहायला मिळतात.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.