महात्मा गांधींना आणि स्वातंत्र्यलढ्याला सर्वात जास्त फंडिंग या उद्योगपतीने दिलं होतं…

महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित राहिलेल्या व्यक्तींबद्दल  लोकांना बरेच काही माहीत आहे, परंतु काही ठराविक व्यक्तींबद्दल फारसे माहिती नाही, ज्यांनी महात्मा गांधीजींना आणि स्वातंत्र्य चळवळींना आर्थिक मदत केली.

या व्यक्तींपैकी एक नाव म्हणजे घनश्याम दास बिर्ला !

लोकांना महात्मा गांधीं – स्वातंत्र्य सेनानी आणि बिर्ला समूहाचे संस्थापक घनश्याम दास बिर्ला यांच्या समीकरणा बद्दल अनेकांना खूप कमी माहिती असेल, घनश्याम दास बिर्ला यांनीच स्वातंत्र्य  चळवळींना आर्थिक मदत केली होती. तर मग आपण गांधी आणि जी.डी. बिर्ला यांच्या संबंधांबद्दल जाणून घ्या.

घनश्याम दास बिर्ला म्हणजेच, भारतातील बिर्ला समूहाच्या निर्मिती आणि उदयामागे असलेला माणूस !

घनश्याम दास बिर्ला हे भारतातील अग्रगण्य औद्योगिक समूह बिर्ला समूहाचे संस्थापक होते. घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म १८९४ मध्ये पिलानी, राजस्थान येथे झाला. ते गांधीजींचे खास मित्र, सल्लागार आणि सहकारी होते.

घनश्याम दास बिर्ला यांचे बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजेच १९८३ रोजी निधन झाले. त्यांनी पिलानी येथे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस तसेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्सची स्थापना केली.  १९५७ मध्ये भारत सरकारने बिर्ला यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

इतर काही उद्योगपतींसोबत त्यांनी १९२७ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) ची स्थापना केली. त्यांच्या प्रेरणेमुळे, यूको बँक स्थापन झाली ज्याला पूर्वी युनायटेड कमर्शियल बँक म्हटले जात असे. हा गट कापड, फिलामेंट यार्न, सिमेंट, रासायनिक साहित्य, वीज, खते, दूरसंचार, आर्थिक सेवा आणि अल्युमिनीयम अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे, ज्यामध्ये ‘ग्रासिम इंडस्ट्रीज’ आणि ‘सेंच्युरी टेक्सटाइल्स’ या आघाडीच्या कंपन्या आहेत.

बिर्ला आणि महात्मा गांधी यांचा सबंध कसा ?

घनश्याम दास बिर्ला हे खऱ्या अर्थाने स्वदेशी आणि स्वातंत्र्य चळवळीचे कट्टर समर्थक होते आणि म्हणूनच महात्मा गांधींच्या कार्यांसाठी निधी देण्यास तयार झाले. स्वतः तर मदत करायचेच पण त्यांनी  भांडवलदारांना देखील राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा देण्याचे आणि काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीला पाठिंबा देत, राष्ट्रीय चळवळीसाठी आर्थिक मदत देणे सुरू ठेवले.

१९१६ मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतण्याच्या सुरुवातीपासूनच ते गांधींजींच्या प्रभावाखाली आले होते. महात्मा गांधींनी आपल्या जीवनाचे शेवटचे चार महिने बिर्ला यांच्या निवासस्थानी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये घालवले होते.

१९७९ साली इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत जी.डी. बिर्ला म्हणाले होते,

‘गांधीजींशी माझा जो संबंध आला आहे, तो काही पूर्वनियोजित नव्हता. स्वातंत्र्यलढ्यातील सर्व प्रमुख नेत्यांना भेटण्याची माझी सुरुवातीपासूनच महत्वाकांक्षा होती. गांधीजी सुद्धा माझ्या आयुष्यात आले कारण मी त्यांना स्वतः जाऊन भेटलो. मला त्यांचे व्यक्तिमत्व जाणून घ्यायचे होते आणि तसेच झाले या महान आत्म्याला भेटून मला खूप फायदा झाला होता.

घनश्याम दास बिर्ला यांच्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव राहिला तो महात्मा गांधी आणि चर्चिल यांचा.

गांधी आणि बिर्ला यांच्यात परस्पर आदराचे आणि मैत्रीचे नाते होते. महात्मा गांधी यांनीदेखील जी.डी. बिर्लांविषयी लिहिले होते, ‘देवाने माझ्या आयुष्यात मला अनेक मार्गदर्शक दिले आहेत, त्यापैकी एक म्हणजे बिर्ला.’

तर बिर्ला यांनी देखील महात्मा गांधींबद्दल लिहिले होते, ‘गांधी स्वातंत्र्य चळवळीसाठी माझ्याकडून कितीही रक्कम मागत असत, कारण त्यांना माहिती होतं, चळवळीसाठी लागेल तेवढी आर्थिक मदत माझ्याकडे उपलब्ध होईल, कारण मी त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी नाकारू शकत नाही.

जी.डी बिर्ला यांनी ब्रिटीश सरकार आणि महात्मा गांधी यांच्यातला एक उत्कृष्ट दुवा म्हणून काम केले.

व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांनी बिर्लांच्या मार्गात बरेच अडथळे आणले होते, म्हणून बिर्ला यांनी स्वदेशी उद्योग विकसित करून त्यांना चांगलेच उत्तर दिले होते.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.