देशभक्तीचे गाणे म्हणजे आवाज महेंद्र कपूरचा इतकं परफेक्ट समीकरण तयार झालं होतं…

मेरे देश कि धरती सोना उगले उगले हिरे मोती

मेरे देश कि धरती

हे गाणं प्रत्येक राष्ट्रीय सणांच्या दिवशी वाजतं. अगदी ज्यावेळी ब्लॅक न व्हाईट टीव्हीचा काळ ते अगदी आजचा काळ म्हणा हे गाणं आजही तितकंच नवंकोरं आणि फ्रेश वाटत. तो आवाज होता महेंद्र कपूर यांचा. खरतर महेंद्र कपूर यांच्या आवाजात जितकी गाणी झाली ती सगळीच हिट होती.

महेंद्र कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक जबरदस्त हिट गाणी गेली पण त्यांची लोकप्रियता वाढली ती खरं म्हणजे देशभक्तीपर गाण्यांमधून. ५० च्या दशकातील हि गोष्ट ज्यावेळी अमृतसरमध्ये जन्मलेला एक मुलगा मुंबईत गायक बनण्यासाठी येतो. तो मोहम्मद रफी यांचा. मुंबईत येऊन महेंद्र कपूर यांनी स्वतःवर मेहनत घेतली. अनेक गुरूंकडे जाऊन ते गाणं शिकले.  

इतक्या साऱ्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं  म्युझिकल कॉन्टेस्टमधून. मर्फी रेडिओमध्ये नवीन कलाकारांचा शोध सुरु होता. त्यासाठी मर्फी रेडिओमधल्या आयोजकांनी एक म्युझिक कॉन्टेस्ट आयोजित केला होता, तो कॉन्टेस्ट महेंद्र कपूर यांनी जिंकला. यानंतर त्यांना थेट नवरंग या सिनेमात गाणं गाण्याची संधी मिळावी. या सिनेमातील गाणं हिट झालं.

महेंद्र कपूर यांचे आदर्श होते मोहम्मद रफी. पुढे संगीतकार नौशाद यांनी महेंद्र कपूर आणि मोहम्मद रफी भेट घालून दिली. मोहम्मद रफी आणि महेंद्र कपूर यांच्यात वयोमानाने फार कमी अंतर होतं. मोहम्मद रफी यांनी महेंद्र कपूर यांना गाण्यातल्या बारीक बारीक जागा कशा घ्याव्या याचं मार्गदर्शनसुद्धा केलं होतं. 

यागोदर महेंद्र कपूर यांनी गाण्याचं शास्त्रीय शिक्षण पंडित हुस्नलाल, पंडित जगन्नाथ, उस्ताद नियाज अहमद खां, उस्ताद अब्दुल रहमान खां आणि पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडून घेत होते. पण पुढे बॉलिवूडमध्ये वेगळी जागा निर्माण केली. मेरे देश कि धरती, भारत का रेहने वाला हूं भारत कि बात सुनीता हूं…. हे गाणे विशेषतः मनोज कुमारमुळे जरी लक्षात राहिले असले तरी तो आवाज महेंद्र कपूर यांचा होता.

चलो इक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनों हो या नीले गगन के तले… अशा अनेक गाण्यांना महेंद्र कपूर यांचा आवाज परफेक्ट बसला. त्याकाळात बी.आर.चोप्रा आणि मनोज कुमार या दोघांचा आवडता गायक म्हणून महेंद्र कपूर यांचं नाव पुढे असायचं. मनोज कुमार हा महेंद्र कपूर यांना आपल्यासाठी लकी मानायचा. कारण मनोज कुमारची सगळी गाजलेली गाणी हि महेंद्र कपूर यांनी गायलेली होती. 

१९६८ मध्ये एक सिनेमा आला होता तो होता आदमी. या सिनेमात मोहम्मद रफी आणि तलत मेहमूद नौशाद यांनी नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली एक गाणं गायलं होतं. या गाण्यात एक ओळ होती ओ देने वाले तूने तो कोई कमी ना की, किसको क्या मिला ये मुकद्दर की बात है. हि लाईन मनोज कुमारवर चित्रित होणार होती पण जेव्हा त्याला कळलं कि गायक तलत मेहमूद आहे तेव्हा त्याने नौशाद यांना विनंती केली कि हे गाणं महेंद्र कपूरकडून गाऊन घ्यावं.

नौशाद यांनी मनोज कुमारचा मान ठेवत महेंद्र कपूर यांच्याकडून हे गाणं गाऊन घेतलं होतं. बी आर चोप्रा यांच्या महाभारत या सिरियलमध्येही महेंद्र कपूर यांनी आपला आवाज दिला होता. दादा कोंडकेंच्या बऱ्याच सिनेमात महेंद्र कपूर यांनी आपला आवाज दिला आहे. आजसुद्धा महेंद्र कपूर यांचा आवाज फ्रेश वाटतो.

२७ सप्टेंबर २००८ साली हृदयविकाराच्या आटल्याने महेंद्र कपूर यांचं निधन झालं. १९७२ साली त्यांना पदमश्री सुद्धा देण्यात आला होता. महेंद्र कपूर विशेषतः गाजले ते देशभक्तीपर गाण्यांमुळेच…!

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.