जगभरात गाजलेलं टिकैतांच्या वडिलांचं आंदोलन अचानक कसं संपलं?

केंद्रानं आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू होतं. एकूण 42 संघटनांच्या नेतृत्वात जवळपास 40,000 शेतकरी दिल्लीच्या सीमेवर हे कायदे सरकारने रद्द करावेत, ही मागणी करत आंदोलनाला बसले होते.

यादरम्यान अनेक हिंसक घटना घडल्या, सरकारने सुद्धा शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे म्हणून प्रयत्न केला. पण शेतकरी आंदोलन सुरूच राहील. शेवटी कंटाळून सरकारनेच शेतकऱ्यांपुढे नमतं घेतलं. आणि हे तीनही कृषी कायदे रद्द केले. यानंतर आज शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलन संपल्याचे जाहीर केले.  

दरम्यान शेतकऱ्यांचे आंदोलन इतकं व्यापक होतं की फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात या आंदोलनाची चर्चा होती. आणि याचं आंदोलनाचा चेहरा होते राकेश टिकैत. ज्यांनी या शेतकऱ्यांनी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, राकेश टिकैत यांचा हा वारसा वडिलोपार्जित त्याचे वडील महेंद्र सिंह टिकैत सुद्धा शेतकरी नेते होते. आपल्या अनेक आंदोलनातून त्यांनी सरकारला आपल्या पुढे असचं नमतं घ्यायला लावलं होतं.

पण महेंद्र सिंह टिकैत यांचं राजपथावर सुरू असलेलं आंदोलन अचानक एक दिवस संध्याकाळी संपलं. का? याचं उत्तर आंदोलन करण्याऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा समजलं नाही. 

1987 चं ते साल उत्तर प्रदेश मधल्या करमुखेडी पॉवर प्लांट येथे झालेल्या निदर्शनाने सुरू झालेलं शेतकरी आंदोलन मोठं व्यापार बनलं होतं. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते वीर बहादूर सिंग. 

आंदोलनामुळे वीर बहादूर सिंग यांची डोकेदुखी वाढली होती. तेव्हा त्यांनी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष महेंद्रसिंग टिकैत यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या सिसौली या गावी येण्यास सांगितले. आणि म्हंटले की, शेतकऱ्यांच्या बाजूने काही निर्णय जाहीर करू इच्छितात.

टिकैत सुद्धा या गोष्टीला तयार झाले, परंतु त्यांनी एक अट घातली की, या बैठकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा नसेल किंवा वीर बहादूर सिंग यांच्यासोबत काँग्रेसचा कोणताही नेता किंवा पोलीस नसतील.

मुख्यमंत्री सुद्धा यावर तयार झाले आणि भेटीचा दिवस ठरला 11 ऑगस्ट 1987, वीर बहादूर सिंह यांचे हेलिकॉप्टर सिसौली येथे उतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कोणीचं नव्हते आणि त्यांना संमेलनाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर चालतं जायला लागलं. त्यांनी मंचावर पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केल्यावर टिकैतांच्या लोकांनी दोन्ही हाताची ओंजळ करून पाणी प्यायला लावले.

वीर बहादूर सिंह यांना आपला हा अपमानचं वाटला. टिकैत इथेच थांबले नाहीत. ते मंचावरून बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी वीर बहादूर सिंग यांच्या समोरचं त्यांना बरचं काही ऐकायला लावलं. यामुळे वीर बहादूर इतके चिडले की ते कोणतीही घोषणा आणि चर्चा न करता लखनऊला परतले.

वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या आठव्या वर्षीचं बालियान खापचे चौधरी बनलेले टिकैत.जेव्हा उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेच्या दरात वाढ केली. त्याला शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला. त्या निदर्शनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेने महेंद्रसिंग टिकैत यांना अचानक शेतकर्‍यांचा नेता बनवले.

महेंद्रसिंग टिकेत हे राजकारणाचा सक्त विरोधात होते. कोणत्याही राजकीय पक्षाला त्यांनी आपल्या व्यासपीठावर येऊ दिले नाही. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही ते स्वतःच्या हाताने शेती करायचे. साधी सरळ गावाकडची भाषा बोलणारे टिकैत यांना शेतकऱ्यांचा मसिहा म्हंटले जायचे. 

1987 मध्ये जेव्हा मेरठमध्ये जातीय दंगली भडकल्या होत्या. तेव्हा या दंगली मेरठ शहराच्या हद्दीबाहेर जाणार नाही. याची टिकैत यांनी पुरेपुर काळजी घेतली. त्यांनी गावोगावी जाऊन पंचायती केल्या आणि हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र ठेवले.

आंदोलनाचे नेतृत्व करून सुद्धा ते स्वतः मंचावर बसले नाहीत. मंचावर भाषणे दिलं की, ते शेतकऱ्यांमध्ये जायचे.

टिकैत यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण म्हणजे 25 ऑक्टोबर 1988 रोजी त्यांनी दिल्लीच्या प्रसिद्ध बोट क्लबच्या लॉनवर सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना एकत्र केले. उसाला जादा भाव द्यावा, पाणी व विजेचे दर कमी करावेत, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी त्यांच्या आंदोलनाची मागणी होती.

दिल्लीत येण्यापूर्वी त्यांनी शामली, मुझफ्फरनगर आणि मेरठमध्ये प्रचंड धरणे आयोजित केली होती. मेरठमध्ये त्यांनी 27 दिवस आयुक्तालयाचा घेराव केला.

दिल्लीत आल्यानंतर सरकारला वाटलं, शेतकरी एक-दोन दिवस दिल्लीत राहून परत जातील, मात्र त्यांनी इंडिया गेट ते विजय चौक दरम्यान एक प्रकारची छावणी उभी केली. मध्य दिल्लीचे हे प्रतिष्ठित क्षेत्र अशा प्रकारे शेतकर्‍यांनी कधीच व्यापले नव्हते आणि आजपर्यंत ते शक्य झाले नाही.

पश्चिम उत्तर प्रदेशातील ट्रॅक्टर, ट्रॉली आणि बैलगाड्यांच्या ताफा दिल्लीत दाखल झाला होता, ज्यात सुमारे एक आठवड्याचे रेशन होते आणि त्यांनी बोट क्लबला आपले तात्पुरते घर बनवले.

एक-दोन दिवस सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, पण त्यांनी राजपथाच्या शेजारीच तंबू ठोकून चूल पेटवायला सुरुवात केली, त्यांच्या सोबत असलेली गुरे बोट क्लबचे गवत चरायला लागली, शेतकऱ्यांना झोपण्यासाठी विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत पेंढ्या पसरवल्या, कॅनॉट प्लेसच्या कारंजात शेतकरी आंघोळ करायला लागले, रात्री कॅनॉट प्लेस मार्केटच्या हॉलवेमध्ये अनेकजण चादर टाकून झोपू लागले, तेव्हा कुठं सरकारला जागं आली. 

जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत ते हटणार नाहीत, असं या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ठरवलचं होतं. राजपथजवळ जमलेल्या लाखो शेतकऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी शक्य ते सर्व मार्ग वापरले. त्या भागातील पाणी व अन्नपुरवठा ठप्प झाला होता.

लोकांना आणि त्यांच्या गुरांना त्रास देण्यासाठी मध्यरात्रीनंतर लाऊडस्पीकरवर गोंगाट करणारे संगीत वाजवले जात होते. दिल्लीतील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. दिल्लीतील सर्व वकील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ संपावर गेले होते.

त्या काळात ना मोबाईल फोन होते ना इंटरनेट आणि दूरदर्शन वाहिन्या. मात्र असे असतानाही कृषी तज्ज्ञ आणि सरकारचे लक्ष वेधण्यात टिकैत आंदोलन यशस्वी झाले

बोफोर्स घोटाळ्याशी लढा देत असलेल्या राजीव गांधींना त्यांच्या सल्लागारांनी टिकैत यांच्याशी पंग्गा न घेण्याची सल्ला दिला होता. सरकारच्या वतीने राम निवास मिर्धा आणि श्यामलाल यादव टिकैत यांच्याशी बोलत होते. त्याच ठिकाणी इंदिरा गांधींचा पुण्यतिथी सोहळा होणार असल्याने हे प्रकरण ३१ ऑक्टोबरपूर्वी निकाली काढावे, असा दबावही होता.

अखेर सरकारने इंदिरा गांधींच्या पुण्यतिथी रॅलीचे ठिकाण बदलून शक्तीस्थळ केले. सरकारला अडचणीत पाहून टिकैत आनंदात होते.

टिकैत प्रत्येक वेळी आपल्या भाषणात म्हणायचे, ‘मला माहित नाही किती दिवस इथे राहायचे आहे. भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना इथं आणलं नाही.

पण अचानक 30 ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजता टिकैत यांनी घोषणा केली की, शेतकरी बांधवांनो, खूप वेळ झाला आहे. आपल्याला घरी जाऊन कामं करायची. आपण हे धरणे संपवून आपल्या गावी परत जाऊ.

राजकीय टीकाकारांसाठी हे आश्चर्यकारक होते कारण तोपर्यंत सरकारने टिकैत यांच्या 35 कलमी मागण्यांपैकी एकही औपचारिकपणे मान्य केली नव्हती. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

टिकैतच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी राजपथावरून आपला माल गोळा करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या या शक्तिप्रदर्शनानंतरच बोट क्लबला रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली.

आत्ताचं शेतकरी आंदोलन सुद्धा वर्षेभर पेटले, सरकारने तीन कृषी कायदे मागे घेऊन सुद्धा बाकीच्या मागण्यांवर सुरू असलेलं हे आंदोलन सरकारच्या एका आंदोलनामुळे संपले

हे ही वाचं भिडू:

English Summary: According to an AFP report, the Tikait family has a history of being a thorn in the side of Indian governments that take on the country’s farmers, and their emotional appeal has again energised a showdown with authorities. Three decades after his father led a massive protest into the capital, Rakesh Tikait has revived a campaign against agricultural reforms that had quieted after a rally last month turned into an ugly rampage.

 

Webtitle: Mahendrasingh tikait farm strike was called off due to Rajiv Gandhi

Leave A Reply

Your email address will not be published.