“खलनायकांचा संजय दत्त” तो मेल्यानंतर त्याचं शरीर सडत राहीलं तरी कोणाला आठवण आली नाही.

ऐंशीच्या दशकात व्हिलन म्हणून गाजण्याची सगळी क्वालिटी त्याच्याकडे होती. सहा फुटाहून अधिक उंची, धडकी भरवेल अशी शरीरयष्टी त्याहूनही डेंजर डोळे. नाव महेश आनंद.

बॉलीवूडमध्ये तीन टाईपचे व्हिलन असतात. एक म्हणजे मुख्य व्हिलन. दुसऱ्या फळीचे व्हिलन आणि मग अंडूपांडू व्हिलन. मेन व्हिलन सगळ्यात शेवटी मरतो. आंडूपांडू व्हिलनचं काम हिरोकडून मार खाणे असत. दुसऱ्या फळीच्या व्हिलनचं पण तेच काम असत पण त्यांना कधी कधी हिरोची मेन व्हिलनच्या आदेशावरून धुलाई करणे, त्याच्या बहिणीची छेड काढणे अशी कामे असतात.

दुर्दैवाने महेश आनंद दुसऱ्या फळीत राहिला. त्याला कधी वर येण्याची संधी मिळाली नाही. त्याची जास्तीत जास्त प्रगती म्हणजे व्हिलनचा बिगडा हुआ लडका इथपर्यंत झाली.

खर तर तो सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये हिरो व्हायचं म्हणून आला होता. दिसायला देखणा तर होताच पण डान्स सुद्धा बरा करायचा मार्शल आर्टमध्ये ब्लक बेल्ट मिळवल होत. इंटरनॅशनल स्पर्धेत भाग घेतला होता. त्याला वाटलं सहज आपल्याला रोल मिळतील.

पण तसं काही झालं नाही.  सुरवातीला खूप स्ट्रगल केला, मॉडेलिंग केलं पण हिरो म्हणून डाळ शिजली नाही. घरच्या परिस्थिती मुळे मिळेल तो रोल घ्यायला भाग पडलं. डान्स मुळे मोठ्या पडद्यावर झळकण्याचा चान्स मिळाला.

१९८२ साली सनम तेरी कसम म्हणून कमल हसनचा एक सिनेमा आला होता, या सिनेमाच्या टायटलवेळी एक्झोटिक डान्स करायची संधी महेश आनंदला मिळाली. गंमतम्हणजे यात पूर्ण गाण्यात त्याचा चेहरा कधी दिसलाचं नाही. अशाच दोनतीन सिनेमामध्ये त्यान डान्स केलाय. अखेर कमल हसनच्याच कुठल्यातरी सिनेमात साईड व्हिलनचा छोटासा रोल मिळाला.

महेशच्या लक्षात आलं होत की आपल्या नशिबात हेच आहे. त्याने ते स्वीकारलं. मिळालेलं काम मनापासून करू लागला.  अमिताभ बच्चन पासून ते गोविंदा पर्यंत अनेक हिरोबरोबर तो दिसला. स्वर्ग या सिनेमापासून तो नजरेत भरू लागला. त्याच्या उंचीमुळे बच्चन आणि संजय दत्त बरोबरचे रोल त्याला भरपूर मिळाले.

सव्वा सहा फुट उंची, जिममध्ये कमावलेली बॉडी, लांब केस बऱ्याचदा डोळ्यावर गॉगल अशा स्टाईलमधल्या महेश आनंदला सगळे खलनायकांचा संजय दत्त म्हणायचे.

संजय दत्त प्रमाणेचं महेश देखील खऱ्या आयुष्यात एकदम राउडी होता. असं म्हणतात की त्याने दारूच्या नशेत बच्चनच्या घरासमोर एका फुटपाथवर गाडी चढवली आणि तीन भिकाऱ्यांचा यात मृत्यू झाला. अमिताभने त्याला या केसमधून बाहेर काढलं असही सांगितलं जात.

दारू आणि मुलगी हे दोन त्याचे विकपॉईंट होते. त्याने तब्बल चार लग्ने केली. 

यातली सगळ्यात शेवटची बायको रशियन होती. पण कुठलचं सक्सेसफुल झालं नाही. प्रत्येकवेळी भांडण आणि बाकी काही काही कारणांनी सगळ बिनसायचं. एका मासिकात तो एस्कोर्टचा धंदा करतो हे पुराव्यासकट छापून आलं होतं. अंगात रग असणाऱ्या जवानीचा काळ असल्यामुळे महेशने सुद्धा कधी कशाची चिंता केली नाही. दोस्त पार्टी यामध्ये मश्गुल असायचा.

व्हिलन लोकांच्यातल्या या संजय दत्त मध्ये आणि खरोखरच्या संजय दत्त मध्ये एक फरक होता. खऱ्या संजय दत्तचा बाप सुनील दत्त होता. सुनील दत्तचं नाव इंडस्ट्रीमध्ये, राजकारणात मोठ होत, पैसा होता त्यांनी आपल्या पोराने केलेल्या घाणीतून त्याला शक्य तेवढ्या वेळा बाहेर काढलं. महेश आनंदला असं कोणी नव्हत. 

साल होत २००० जेव्हा त्याच आयुष्य बदलून गेलं. एका सीनमध्ये कुठला तरी स्टंट स्वतः करताना त्याचा अॅक्सीडेंट झाला. पाठीचा मणका तुटला. जवळपास तीन वर्षे बेडवरून उठता ही आलं नाही. कोणीही जवळचा माणूस नाही, मित्र नाही, बायको मूले एक पाहुणा नाही अशा स्थितीत त्याने ते दिवस काढले. त्याच्या अनेक बायकांपैकी एक बायकोला त्याच्यापासून त्रिशूल नावाचा मुलगा देखील होता पण त्याला कधीच त्याला भेटता आल नाही.

या तीन वर्षांमुळे तो इंडस्ट्रीमधून बाहेर फेकला गेला होता. सिनेमा आता पर्यंत बदलला होता. महेश जे काम करायचा तशी फायटिंग असणारे मसाले सिनेमे बंद झाले होते. महेशने मोडून पडला. दिवसभर जिम करणे आणि दारू पिणे एवढच तो करत होता.

पन्नाशीत पोहचूनही त्याची बॉडी एखाद्या कसरतपटू प्रमाणे प्रमाणात होती.

images

काही दिवसापूर्वी त्याला गोविंदाच्या रंगीला राजा या सिनेमात एक रोल मिळाला. पण दुर्दैव म्हणजे तो सिनेमा अजूनही रिलीज झाला नाही. त्याचे जे थोडे फार मित्र होते त्यांना किंवा फेसबुकवर तो फक्त एकटेपणाबद्दल, आत्महत्येबद्दल सांगायचा.

१३ फेब्रुवारी २०१९. त्याच्या कामवाली बाईने पोलीस कंप्लेट केली की महेश आनंद दार उघडत नाही आहे आणि घरातून कसली तर दुर्गंध येत आहे. नंतर कळाल की त्याचा कित्येक दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. व्यायामाने कमवलेल तगड शरीर पूर्णपणे सडल होत. व्हिलनचा शेवट दुर्दैवी झाला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.