हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये महिंद्रा स्कॉर्पियो अभ्यासासाठी आहे……

गाड्यांचे शौक असणारे स्कॉर्पियोला कधी कमी समजत नाही. महिंद्रा स्कॉर्पियोची क्रेझ बाकी लोकांच्या मनातून अजूनही उतरलेली नाही. सगळ्यात दणकट आणि चालवायला उत्तम अशी महिंद्रा स्कॉर्पियोची ओळख आहे. अजय देवगणच्या सिंघम सिनेमातही हि गाडी वापरण्यात आली होती. पण महिंद्रा स्कॉर्पियोची गोष्ट आपण डिटेलमध्ये माहिती करून घेऊ.

१९९०च्या सुरवातीला महिंद्रा कंपनी नवनवीन गाड्या मार्केटमध्ये आणत होते. पण वेळी महिंद्रा कंपनी जरा वेगळ्या विचारात होते. ते अशी गाडी बनवू पाहत होते जी खेड्यापाड्यात वापरली जाईल जेणेकरून वर्ल्ड वाइड हि गाडी अजून प्रसिद्ध होत जाईल. महिंद्रा कंपनी अशा गाडीच्या शोधात होते ज्यात प्रवासी आरामशीर बसतील पण कंपनीला अशा गाड्या बनवायचा अनुभव नव्हता. 

अशा वेळी कंपनीने इंडस्ट्रीमधल्या दोन मातब्बर लोकांना पाचारण केलं. ते होते पवन गोयंका आणि ऍलन डॉरांटीक. या दोघांनी एकत्र येताच एसयूव्ही प्रोजक्ट्वर काम करू लागले. १९९५ आणि १९९६च्या सुमारास फोर्ड या कंपनीने भारतात प्रवेश केला होता. पूर्वी फोर्ड आणि महिंद्रा यांचं बऱ्याच प्रोजेक्टमध्ये एकत्र योगदान होतं.

महिंद्राच्या नव्या प्रोजेक्टकरता १२० लोकं, १९ टीम्स आणि ७५ प्रोटोटाइप रेडी केले गेले. डिजाईन, बजेट आणि इतर गोष्टींसाठी बरेच इनपुट हे महिंद्राचेच होते. हि गाडी प्रायोगिक तत्वावर तयार झाल्यानंतर सप्लायर लोकांनी हि गाडी टेस्ट केली, प्रत्येक पार्टची बारीकसारीक माहिती घेतली आणि प्रोडक्शनसाठी परवानगी दिली. महिंद्राच्या प्लांटमध्ये या गाडीचं प्रॉडक्शन सुरु झालं. सप्लायर आणि महिंद्रा यांनी दोघांनी बरेच इनपुट यात दिले होते. 

५ वर्षाचा काळ गेल्यानंतर पूर्णपणे तयार झाली अर्बन महिंद्रा स्कॉर्पिओ. ७०० करोड इतका खर्च स्कॉर्पिओ बनवण्यात आला. २००२ मध्ये महिंद्राने आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं.

महिंद्रा स्कॉर्पिओ बाजारात अचानक लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे गाडीची किंमतच कंपनीने अशी ठेवली कि तिची लगेच विक्री होईल. तेव्हा महिंद्रा स्कॉर्पिओची किंमत होती ७ ते ७.५ लाख.

मार्केटमध्ये आल्यावर स्कॉर्पिओला २.६ लिटर डिझेल इंजिन, १०५ BHP, रेनोचा २.१ लिटरचं पेट्रोल इंजिनसुद्धा ऑफर केलं होतं. डिझेल स्कॉर्पिओची मागणी जास्तच वाढली होती. यामुळे महिंद्राने लोकांच्या मागणीनुसार अपडेटेड व्हर्जनवर काम करणं सुरु केलं.

२००६ मध्ये अनेक सुधारणा करून महिंद्रा स्कॉर्पिओ पुन्हा नव्याने लोकांसमोर आली. स्लायडिंग सीट्स, कॉस्मेटिक चेंजेस, कलर, अड्जस्ट होणार स्टिअरिंग असं सगळं नव्या ढंगात आलं. एकूण ४३ नवीन बदलांसह स्कॉर्पिओ बाजारात आली होती. यामुळे स्कॉर्पिओ पुन्हा बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होऊ लागली. टाटा सफारीच्या कैक मैल पुढे महिंद्रा स्कॉर्पिओ गेली होती. 

टाटा सफारी आणि महिंद्रा स्कॉर्पिओ यांच्यामध्ये तेव्हा टीव्ही वॉर सुरु आला होता. कारण दोघांनी आपल्या कारची मोठ्या प्रमाणावर टीव्हीवर जाहिरात करणं सुरु केलं. या जाहिराती इतक्या जबरी होत्या कि गाडी घेऊ वाटेल इतपत लोकांची मजल जायची.

महिंद्राने लिव्ह यंग लिव्ह फ्री हा कॅम्पेन सुरु केला. महिन्द्राचा हा ट्रेंड लोकांना प्रचंड आवडला आणि त्याची ट्यून लोकांच्या आजही लक्षात आहे.

इतकं असूनही महिंद्रा स्कॉर्पिओ मध्ये अनेक सुधारणा बाकीचं होत्या. त्यामुळे स्कॉर्पिओने महिंद्रा स्कॉर्पिओची पहिली जनरेशन बंद करून २००९ मध्ये महिंद्रा स्कॉर्पिओची सेकंड जनरेशन उतरवली. डिझेल इंजिन, एअरबॅग्स, ऑडिओ सिस्टीम त्यात सीडी प्लेअर, मेमरी कार्ड अशा सुविधा होत्या. इथून पुन्हा स्कॉर्पिओने उडी घेतली.

ऑस्ट्रियामध्ये महिंद्राने स्कॉर्पिओचे नवीन व्हर्जन आणले पीकप जे स्वस्त असल्याने मोठ्या प्रमाणात त्याची विक्री झाली. २०१२-१३च्या काळात महिंद्रा स्कॉर्पिओ जरा OUTDATED वाटायला लागली कारण टाटा सफारीने नवीन गाडी बाजारात आणली होती. त्यामुळे २०१४ मध्ये महिंद्राने स्कॉर्पिओची ३ री जनरेशन लाँच केली. पुढे अनेक बदल करत करत स्कॉर्पिओ टिकून राहिली.

स्कॉर्पिओची इतकी क्रेझ होती कि सिनेमात सुद्धा वापरण्यात आली. अजय देवगणचा सिंघम आणि रणवीर सिंगचा सिम्बा या दोन्ही सिनेमात या गाडीला जास्त फुटेज देण्यात आलं होतं.

अचानक विक्री वाढल्याने याची दखल हॉवर्ड युनिव्हर्सिटीने घेतली होती आणि स्कॉर्पिओच्या केस स्टडीचा अभ्यासक्रम ठेवला होता.

आजसुद्धा खेड्यापाड्यात बऱ्याच ठिकाणी स्कॉर्पिओचा धुरळा पाहायला मिळतो…..

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.