CJ300B, MM540, क्लासिक, मेजर, लिजेंड ते थार.. १९४९ ते २०२० अशी बदलत गेली थार

१५ ऑगस्टला महिंद्राची थार लॉन्च करण्यात आली. पूर्वीच्या थारमध्ये क्रेझ होती पण आत्ताची त्यापेक्षा भन्नाट आलीय. दिसायला टोटल जीपच्या रॅंगलर सारखी दिसते. पहिली थार फक्त ऑफरोडसाठी बरी होती. म्हणजे त्यात पॉवर विंडो, AC अशा बेसिक गोष्टींची बोंबाबोंब असायची. ऑनरोड ११-१२ लाख खर्च करुन हातात फक्त ऑफरोडचा ऑप्शन रहायचा. त्यातही 4 बाय 4 साठी अजून पैसे जायचे.

आत्ताची थार त्याचीही बाप आहे. म्हणजे गाडीतले फिचर बघुन तुम्हाला “कशाला घेतलय बे, यात तर काहीच नाही बे” अस म्हणणार नाही. २ ऑक्टोंबर पासून बुकींग सुरू होणाराय म्हणे. असो आपल्याला काय थार वाल्यांनी पे केलेलं नसल्याने आपण नव्या थारचा लय कौतुक सोहळा आयोजित करणार नाही.

आपण बोलुया थारच्या एकंदरित प्रवासाबद्दल, १९४९ ते २०२० या काळात थार कशी बदलत केली याबद्दल.

तर गोष्ट सुरू होते १९४९ साली. दूसऱ्या महायुद्धात WILLYS ने गाड्या काढल्या. त्याबद्दलचा सगळा इतिहास तुम्हाला इथे दूसऱ्या महायुद्धाचा एकमेव फायदा म्हणजे ही WILLYS जीप क्लिक करुन वाचायला मिळेल.

१९४९ साली महिंद्राने WILLYS कंपनीकडून CJ3A जीप भारतात विकायचं लायसन्स मिळवलं. महिंद्राने WILLYS कडून भारतासाठी हे लायसन्स घेतलं.

CJ3B हे १९५३ साली आलं

पण महिंद्रा पार्ट मध्ये WILLYS च्या CJ3A मागवून घ्यायचं आणि भारतात असेंम्बल करुन विकायचं. महिंद्रा तेव्हा इतकी मोठ्ठी नव्हती की स्वत:च इंजिन आणि गाडी तयार करु शकेल. म्हणून ही आयडीया काढण्यात आली होती.  सुरवातीची ही गाडी लेफ्ट हॅण्ड ड्राईव्ह आणि पेट्रोलमध्ये होती.

तुम्हाला आजही एखाद्या दूसऱ्या व्यक्तीकडे WILLYS दिसून जाईल. ज्यावर लेफ्ट हॅण्ड ड्राईव्ह लिहलेलं असत. ती महिंद्राकडून भारतात विकलेली होती. पण त्यावर बॅजिंग WILLYS चं असायचं. सर्व गोष्टी WILLYS च्याच होत्या फक्त असेंम्बल करून विकायचं काम महिंद्रा करायची.

त्यानंतर १९५३ साली CJ3B हे नवीन व्हर्जन सुरू झालं. या व्हर्जनमध्ये महिंद्राने हरिकेन इंजिन घातलं. त्यामुळे 72 BHP ची ताकद मिळाली. 1954 सालात महिंद्राने असेंम्बल करायच्या ऐवजी प्रोडक्शन करण्यास सुरवात केली. WILLYS ने भारतासाठी महिंद्राला तर जपानसाठी मित्स्युबिशीला लायन्सन दिलं. त्यामुळे स्वत:चं प्रोडक्शन करणं कायदेशीररित्या शक्य होवून गेलं.

CJ3B म्हणजेच सिव्हीलिएन जीप असा लॉन्गफॉर्म होता. लेफ्ट हॅण्ड ड्राईव्हचं हे मॉडेल फेमस झालं. मिलिट्री सोबत रिटायर मिलिट्रीवाले या गाड्यांना पसंद करु लागले.

१९७८ साली त्यांनी लेफ्ट हॅण्ड ड्राईव्हचं राईट हॅण्ड ड्राईव्ह करण्यात आलं.

इथंपर्यन्त काय चालू होतं तर महिंद्राने टॅक्टरचं प्रोडक्शन सुरू केलेलं. दूसरीकडे WILLYS कडून गाड्या घ्यायच्या, इंजिन घ्यायचं आणि असेंम्बल करायचं, त्यानंतर फक्त इंजिन घेवून बाकीच्या पार्टचं प्रोडक्शन करायचं अशी कामं सुरू होती.

इतक्यात आखाती देशातल्या युद्धांमुळे पेट्रोलचे रेट वाढले आणि डिझेल स्वस्त: झालं. WILLYS चे इंजिन फक्त पेट्रोलचे असायचे. म्हणून महिंद्राने देशी जुगाड केला आणि टॅक्टरच्या इंजिनपासून जीपसाठी इंजिन तयार केलं.

हे पहिलं डिझेल व्हर्जन होतं.

डिझेलमध्ये आल्यानंतर गाडीचा खप वाढला. महिंद्राला आत्ता या गाडीची ताकद लक्षात आली. डिझेल आल्याने खप वाढला, मागणी वाढली.

त्यामुळे १९८५ साली MM540 हे व्हर्जन आलं.

बघता बघता याचा खप जोरात वाढला. हे महिंद्राचं आयकॉनिक व्हर्जन ठरलं. याचं कारण ग्रामीण भागातले रस्ते आणि डिझेल इंजिन. काहीच प्रोब्लेम नव्हता. आजही युपी, बिहारी पोलीस दाखवताना हे गाडी दाखवली जाते.

फोटो बघितल्यावर आपण कुठल्या गाडीबद्दल बोलतोय लक्षात येईल. इथे ४ बाय ४ ऑप्शनल देण्यात आला.

या गाडीचा प्रवास उलटा झाला. म्हणजे आजवर मेलेट्रीच्या सांगण्यावरून अशा गाड्या तयार झाल्या आणि त्यांच सिव्हिलिएन एडिशन काढण्यात आलं पण इथं पहिल्यांदा सिव्हिलिएन एडिशन पाहून मेलेट्रीने मागणी केली.

त्यांच्यासाठी १९९५ साली MM550 हे नवं व्हर्जन काढण्यात आलं.

झालं अस की MM540 पेक्षा MM550 लोकांना भारी वाटू लागली. पण ती फक्त आर्मीसाठी होती.

तेव्हा 1996 साली महिंद्राने बाजारात आणली ती क्लासिक.

क्लासिक

ओपन जीप आणि सत्कार समारंभात मिरवणुका काढण्यासाठी हे व्हर्जन वापरलं जावू लागलं. इथं पहिल्यांदा युथ आकर्षित झाला. पहिल्यांदा स्पोक वापरण्यात आलं.

त्यानंतरचा काळ आला वडापचा.

२००० साली मेजर व्हर्जन आलं. मेजर हे रफटफ होतं. क्लासिक अर्बनला चाचली पण मेजर टोटल   रुलर भागात विकली गेली. लोकांनी काळीपिवळी करुन खूप कमाई केली. मेजर आणि कमांडर या दोन गाड्या चाचल्या.

मेजर

त्यानंतर आली लिजेंड.

अर्बन क्लाससाठी २००६ साली लिजेंड आली. ऑफरोडिंगसाठी पहिल्यांदा लिजेंड चाचली. कारण त्यात फोरबायफोर होतच पण लो-हाई असे ऑप्शन देखील होते.

लिजेंड

२०१० ला रिडिझाईन करुन थारचा जन्म झाला.

थर लाईफस्टाईल व्हर्जन होतं. २ बाय २ आणि ४ बाय ४ आलं. मेटल वापरण्यात आलं. ऑफरोडिंग आणि तितक्याच भारी फॅसेलिटी मिळाल्या. २०१५ साली परत थारच एक नवं व्हर्जन CRDi सहित आणण्यात आलं. ते देखील चाललं आणि त्यानंतर पूर्णपणे नव्या लूकची थार २०२० साली लॉन्च करण्यात आली.

थार

 हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.