महाराष्ट्रात १५ ते १८ वयोगटातील ६५ लाख विद्यार्थ्यांना लस मिळणार आहे, काय आहे प्रक्रिया

लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यात आता १५-१८ वयोगटातील पोरं-पोरींना लस द्यायला सुरवात झालेय. ३ जानेवारी म्हणजे कालच या टप्याला सुरवात झाली. महाराष्ट्रातपण या लसीकरणाला जोरदार सुरवात झालेय. पहिल्याच दिवशी १५-१८ या वयोगटातील दीड लाख मुला-मुलींचं लसीकरण करण्यात आलंय. आता ह्या वयोगटातील सगळी पोरं शाळेत जाणारी असल्यानं शिक्षण विभागानं पण लसीकरणात आपली जबाबदारी घ्यायचं ठरवलंय. 

राज्यात १५ ते १८ वयोगटातील म्हणजेच नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या  ६५ लाख विद्यार्थ्यांना महिनाभरात पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट राज्याच्या शिक्षण विभागानं निर्धारित केलंय.

आरोग्य विभागाच्या मदतीनं शहर, जिल्हा, तालुका पातळीवर  लसीकरणाची मोहीम राबवण्यात येइल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी दिली. या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्याच्या शिक्षणधिकाऱ्यांनी शाळांना सूचना द्यावेत अशा वर्षा गायकवाड यांनी सूचना केल्यात.

त्याचबरोबर शाळांमधले जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत ज्यांनी लस घेतली नाहीए त्यांनाही तातडीने लास घेण्यास सांगण्यात आलं आहे. शाळांमध्ये करूणा संदर्भातील सगळे प्रोटोकॉल पाळावेत अश्याही सूचना शाळांना देण्यात आल्यात.

त्याचबरोबर शाळांमध्ये ५०%विद्यार्थी उपस्थितीची अट पण घालण्यात आलीय.

पण या लसीकरण बाबत काहींच्या मनात संभ्रम आहे. पण  १५ ते १८ वयोगटातील लसीकरांची प्रक्रिया सेमच आहे त्यामुळं त्यात गोंधळून जाण्यासारखं काय नाहीए भिडू. तुझ्यासाठी सगळी प्रक्रिया विस्कटून सांगतो –

१) पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. ती म्हणजे या वयोगटाला फक्त भारताची ‘कोवॅक्सिन’ हीच     लस देण्यात येइल.

२)  सिरमच्या कोवीशिल्ड वॅक्सिन अजून १५-१८ साठी मान्यता नाही देण्यात आलेय. त्यामुळं आठवणीनं तुमच्या मुला -मुलींना दिली जाणारी लस ‘कोवॅक्सिन’च आहे याची खात्री करून घ्या.

३) पाहिलं तर लसीकरण केंद्रावर डायरेक्ट जाऊन तुम्हाला लसीसाठी अपॉइंटमेंट घेता      येइल.त्याचबरोबर ऑनलाईन बुकींचा पण पर्याय देण्यात आलाय.

४) लसीकेंद्रवार जाऊन गर्दी करण्यापेक्षा ऑनलाईन बुकिंग बरं . २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेल्यांना लसीकरण बुक करण्यासाठी Co-WIN च्या वेबसाइटवर नोंदणी करता येइल.

५) या एकतर Co-WIN वेबसाइटवर नवीन नोंदणी करू शकतात किंवा आधीच तयार केलेले जे खातं  वापरून या लसीकरणासाठी नोंदणी करू शकतात.

६) याचाच अर्थ 18 वर्षांवरील लोक ज्यांच्याकडे आधीच Co-WIN खाती आहेत ते 15 ते 18 वर्षे वयोगटातील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नोंदणी करू शकतात.

आता तुम्हाला कोवॅक्सिनचं का हा प्रश्न पडला असेल तर ते हि सांगतो?

 

अलीकडेच भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने 12 ते 18 वर्षे वयोगटासाठी ही लस वापरण्यास आपत्कालीन मंजुरी दिली आहे.

भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार त्यांच्या चाचणीमध्ये इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदनांव्यतिरिक्त कोणतीही प्रतिकूल घटना आढळून आली नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 374 मुलांमध्ये सौम्य किंवा मध्यम तीव्रतेची लक्षणे आढळली, त्यापैकी 78.6 टक्के प्रकरणे एका दिवसात बरी करण्यात आली. भारत बायोटेकचे म्हणणे आहे की कोवॅक्सीन अशा विशेष प्रकारे डिझाईन केलंय ज्यामुळं प्रौढ आणि मुलांसाठी समान डोस देण्यात येइल. त्यामुळं सरकार सांगतंय तसं लवकरात लवकर लास घ्यायचं तेवढं बघा.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.