हॉकिस्टीकमध्ये लोहचुंबक असल्याचा आरोप झेलणाऱ्या “मेजर ध्यानचंद” याचे पाच किस्से !

मेजर ध्यानचंद. भारतीय हॉकीचे बादशाह. क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे रन होतं असत त्या प्रकारे मेजर ध्यानचंद गोल करतात असे गौरवउद्गार सर डॉन ब्रॅडमन यांनी त्यांच्याबाबत काढले होते. मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस. २९ ऑगस्ट १९०५ साली अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांची जयंती भारतात राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरी केली जाते. 

हॉकीचा बादशाह असणाऱ्या मेजर ध्यानचंद याचे असेच अनोखे किस्से खास बोल भिडूच्या वाचकांसाठी ! 

1) सन १९३२ सालचे ऑलिंम्पिकचे सामने.

या सामन्यामध्ये भारताने सुवर्णपदक पटकावलं होतं. अमेरिकेला हरवून हे सुवर्णपदक भारतानं आपल्या खिश्यात घातलं होतं आणि त्यांच श्रेय जात होतं ते मेजर ध्यानचंद आणि त्यांचे बंधू रुपसिंह यांना. मेजर ध्यानचंद यांनी अंतिम सामन्यामध्ये ८ गोल केले होते तर त्यांचे बंधू रुप सिंह यांनी १० गोल केले होते. या दोन बंधूंच्या १८ गोलच्या जीवावर भारताने अमेरिकेला २४-१ इतक्या मोठ्या फरकाने हरवलं होतं. 

2) हिटलरला नकार.

बर्लिन ऑलिम्पिक सामन्यांच्या दरम्यान मेजर ध्यानचंद यांचा खेळ पाहून खुद्द हिटलर देखील आश्चर्यचकित झाला होता. वंशवादाचा कट्टर समर्थक असणाऱ्या हिटलरने मेजर ध्यानचंद यांच्यासमोर जर्मनीची नागरिकता घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचं सोबत आपल्या सैन्यात मोठ्या पदावर त्यांना नियुक्त करण्याच आमिष देखील हिटलरच्या मार्फत दाखवण्यात आलं होतं. मात्र मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा हा प्रस्ताव तितक्याच हिम्मतींने धुडकावून लावला जितक्या हिम्मतीने ते गोल करत असत. 

3) सर डॉन ब्रॅण्डमनचे गौरवोद्गार.

Screen Shot 2018 08 29 at 5.48.29 PM

खुद्द क्रिकेटचे बादशाह डॉन ब्रॅडमन यांनी १९३५ च्या एडिलेड येथील सामन्यांमध्ये त्यांची भेट घेतली होती. सर डॉन ब्रॅडमन यांनी मेजर ध्यानचंद यांचा खेळ पाहिला होत. त्यांचा खेळ पाहूनच सर डॉन ब्रॅडमॅन म्हणाले होते की,

“क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे धावा काढल्या जातात त्याच प्रकारे मेजर ध्यानचंद हॉकीमध्ये गोल करतात.” 

4) स्टीकमध्ये लोहचुंबक असल्याचा संशय.

नेदरलॅण्ड येथील या किस्साचा उल्लेख अनेकजणांनी केला आहे. किस्सा नेमका कधीचा हे समजत नसलं तरी अस सांगितलं जातं कि मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीस्टीकमध्ये लोहचुंबक असण्याचा संशय घेवून त्यांची हॉकी स्टीक तोडून तपासणी करण्यात आली होती.

5) खेळत असणाऱ्या मैदानातच अंत्यविधी.

मेजर ध्यानचंद यांच निधन झालं तेव्हा मोठ्या अभिमानाने त्यांचे अंत्यसंस्कार झाशींच्या कोणत्याही घाटावर न करता ते खेळत असणाऱ्या मैदानात करण्यात आली होती. एकप्रकारे त्यांचे अत्यसंस्कार मैदानामध्ये करुन क्रिडाप्रेमींनी त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली होती.

असे हे मेजर ध्यानचंद स्वत:बाबत लिहताना आपल्या आत्मचरित्रात लिहतात “मैं बहुत साधारण आदमी हूं”.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.