बँकेचा कंटाळवाणा जॉब सोडला आणि सुरु झालं मेक माय ट्रिप..!

आजचं जग हे सगळं टेक्नॉलॉजिचं जग आहे. आज कुठं प्रवासाला जायचं असल्यावर आपण घरबसल्या तिकीट बुक करतो आणि आपली सीट आरक्षित करतो म्हणजे ऐन वेळेला धावपळ होणार नाही. आज इतक्या सोयीसुविधा आहेत. पण हेआजचं सगळंच प्रगत तंत्रज्ञान २००० च्या काळात पूर्णपणे रुजलेलं नव्हतं.

चांगल्या चांगल्या प्रेक्षणीय स्थळांसाठी, फ्लाईट बुक, हॉटेल्स अशा सगळ्या फॅमिली पॅकेजची सोय केली ती मेक माय ट्रिपने. पुढे मेक माय ट्रिप भारताची सगळ्यात मोठी लिडिंग ट्रॅव्हल कंपनी बनली. पण मेक माय ट्रिप उभारणाऱ्या दीप कालरा यांचा प्रवास खूप जबरदस्त आहे. तर जाणून घेऊया मेक माय ट्रीपची यशोगाथा. 

मेक माय ट्रिप उभारणाऱ्या दीप कालरा यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८७ मध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर त्यांनी बिजनेस मॅनेजमेंटसाठी अहमदाबादचा रस्ता धरला. ग्रॅज्युएशन आणि बिजनेस मॅनेजमेंट झाल्यावर दीप कालरा यांनी आपलं करियर बँकिंग सेक्टरमध्ये करण्याचा निर्णय घेतला. एबीएन एमरो बँक मध्ये त्यांनी सुरवातीचे ३ वर्ष जॉब केला. पण नवीन काहीतरी करायचं म्हणून त्यांनी १९९५ ला राजीनामा देऊन टाकला.

नवीन करायच्या नादात नोकरी सोडून आल्यावर त्यांनी भरपूर विचार करायला सुरवात केली. इंटरनेटवर एक्सप्लोर करायला सुरवात केली याकाळात त्यांना अनेक ठिकाणाहून बँकेचे जॉब आले होते पण त्यांनी निर्णय घेतलेला होता कि आता नोकरी करायची नाही. पण त्यांच्या डोक्यात आयडिया आली कि ऑनलाइनच्या माध्यमातून काहीतरी लोकांची मदत होईल असं काहीतरी करू. 

याच काळात नाईलाजाने एएमएफ बॉलिंग या कंपनीसाठी त्यांनी काम करायला सुरवात केली. यात अनेक अडचणी आल्या पण दीप कालरा यांनी हार मानली नाही. एएमएफ कंपनी मोठी करण्यात दीप कालरायांचा मोठा वाटा होता पण स्वतःच असं काहीतरी त्यांना इच्छा होती. १९९९ साली एका कंपनीत ते काम करत असताना त्यांना ऑनलाईन व्यवहाराचं होत. परत त्यांनी  नोकरी सोडली आणि बिजनेस बद्दल विचार  लागले.

पर्यटन विषयक माहिती पाहत असताना दीप कालरा यांच्या एक गोष्ट ध्यानात  कुठल्याही ठिकाणी भेट देण्याआधी लोकांना बराच काळ रांगेत तिकीट घेण्यासाठी थांबावं लागत असायचं. हि समस्या ओळखून त्यांनी ऑनलाईन तिकीट बुकिंगची योजना बनवली. यासाठी २००० साली त्यांनी मेक माय ट्रिप नावाची वेबसाईट बनवली. मेक माय ट्रीपला अल्पावधीतच भरपूर प्रसिद्धी मिळाली.

मेक माय ट्रिप थेट तिकीट बुकिंगपासून ते हॉटेलचं बुकिंग या सगळ्या सुविधा देत होत त्यामुळे दीप कालरा यांच्या या आयडियाचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. या मेक माय ट्रिपमुळे लोकांना हॉलिडे पॅकेजिंगचं सोयीचं पडू लागलं आणि याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला.

आज घडीला मेक माय ट्रिपचे ५१ रिटेल स्टोर भारताच्या मोठ्या ४७ शहरांमध्ये आहे ज्यामुळे लोकं घरबसल्या तिकीट बुकिंगच्या सगळ्या गोष्टी करतात. सगळ्यात यशस्वी स्टार्टअप म्हणून मेक माय ट्रीपकडे आज घडीला बघितलं जातं. सुरवातीच्या काळात दीप कालरा यांच्या मेक माय ट्रीपला मोठमोठे अडथळे येत गेले पण त्यांनी हिंमत न हारता हा आपला स्टार्टअप यशस्वी करून दाखवला.

२०१६-१७ मध्ये कंपनीने ६२ मिलियन डॉलरची उलाढाल केली होती. मेक माय ट्रिपमुळे आज घडीला बऱ्याच लोकांच्या हाताला काम मिळत आहे. आजसुद्धा मेक माय ट्रिप भारतातली सगळ्यात मोठी ट्रॅव्हल कंपनी म्हणून ओळखली जाते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.