४१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मक्का मशिदीवर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला होता

सौदी अरेबियातील मक्का शहरातील काबातुल्लाह मस्जिद. साधारण १४०० वर्षापुर्वी मोहम्मद पैगंबरांनी स्थापन केलेली ही मस्जिद मुस्लीम समाजासाठी जगातील सर्वात पाक जागा मानली जाते.

प्रत्येक मुसलमान आयुष्यात एकदा तरी मक्काला अर्थात हज यात्रेला जावून यावं ही इच्छा बाळगून असतो. दरवर्षी लाखोंच्या घरात मुस्लीम इथे भेट देत असतात.

पण आजपासून बरोबर ४१ वर्षापुर्वी हिच पवित्र जागा साधारण २०० धार्मिक अतिरेक्यांनी (कट्टरपंथी सुन्नी मुस्लिम सलफी) ताब्यात घेतली होती. या घटनेत शेकडो जणांचे जीव गेले होते.

२० नोव्हेंबर १९७९. सकाळी ५ वाजताच्या दरम्यानची वेळ.

शेख मुहम्मद अल सुबायिल हे जवळपास ५० हजार लोकांच्या नमाजची तयारी करत होते. यात हे बंदुकधारी धार्मिक अतिरेकीदेखील होते. नमाज अदा करुन होत आली आणि या हल्लेखोरांनी सुबायिल यांना बंदुकीच्या धाकावर बंदी बनवले.

सुबायिल यांच्यानंतर मस्जिदमधील इतर सर्वांना ओलीस ठेवण्यात आले. मस्जिदचा माईक ताब्यात घेवून घोषणा केली की,

“हम माहदी के आगमन का एलान करते हैं, जो अन्याय और अत्याचारों से भरी इस धरती में न्याय और निष्पक्षता लाएंगे.”

(इस्लाम धर्मामध्ये माहदी हे मोठे सुधारक मानले जातात)

युवा सौदी प्रचारक जुहेमान अल-ओतायबी हे या हल्लेखोरांच्या गटाचे नेतृत्व करत होते.

त्याच दरम्यान हल्लेखोरांच्या समुहातील मोहम्मद अब्दुल्ला अल-क़हतानी हा पुढे आला, आणि त्याने स्वतःची ओळख माहदी म्हणून करुन दिली. हे सगळे जण अल कुओंताय्बी नावाच्या एका आंदोलनाशी जोडले होते.

इकडे मस्जिदमध्ये ओलीस ठेवलेले लोक घाबरुन जाण्याऐवजी खूश झाले, कारण त्यांची धारणा झाली की, माहदी अर्थात आपला रक्षक परत आला आहे. त्या आनंदात त्यांनी प्रार्थनाही म्हणायला सुरुवात केली.

मस्जिद ताब्यात घेतल्यानंतर या हल्लेखोरांनी सर्व दार बंद करुन घेतली, त्यामुळे आतमध्ये किती जण आहेत, या हल्लेखोरांकडे नेमकी कोणती शस्त्रे आहेत या संदर्भातील कसलीच माहिती बाहेर समजू शकत नव्हती.

यानंतर हल्लेखोरांनी मनोऱ्यांवर स्नाईपर्सना तैनात केले.

त्यांच्या मते जे आमच्यासोबत लढण्यासाठी येतील ते माहदीचे शत्रु मानले आणि हे स्नाईपर्स त्या शत्रुंचा सामना करतील.

सौदीच्या व्यवस्थेला हे सर्व जण भ्रष्ट आणि अनैतिक मानत होते.

त्यावेळी सौदी बिन लादेन नावाचा एक गट मस्जिदच्या आतमध्ये काही तरी दुरुस्तीचे काम करत होता. हल्लेखोरांनी टेलिफोनची वायर कापण्यापुर्वी यातील एका कर्मचाऱ्याने प्रसंगावधान ठेवत ही बातमी बाहेर कळवली.

अरेबियाचे तत्कालिन क्राउन प्रिंस फहद ट्यूनेशियामध्ये होते. नॅशनल गार्डचे प्रमुख प्रिंस अब्दुल्ला मोरक्कोमध्ये होते. अशावेळी किंग खालिद यांनी मस्जिदला हल्लेखोरांच्या तावडीतुन सोडवण्याची जबाबदारी प्रिंस सुलतान यांच्यावर सोपवली.

प्रिंस नाएक हे देखील त्यांच्या सोबत होते.

हल्ल्याची बातमी ऐकताच सुरक्षा दलाच्या शंभर जवानांनी मस्जिद सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यात दोन्हीकडील गोळीबारात अनेक निष्पाप जीव मारले जात होते. त्यामुळे जवानांना माघारी फिरव लागले. संध्याकाळ होईपर्यंत संपुर्ण मक्का रिकामे केले.

सौदी अरेबियाचे सैन्य आणि नॅशनल गार्ड यांनी प्रयत्न चालू ठेवले. सौदीचे इंटेलिजेंस अल मखाबरात अल आम्माहचे प्रमुख तुर्की बिन फैज़ल अल सौदीच्या पुढच्या भागातुन मस्जिद सोडवण्याचा प्रयत्न करत होते.

पुढील जवळपास १५ दिवस ते इथेच होते.

अशा परिस्थितीमध्ये सौदीने पाकिस्तानकडे मदत मागितली. पण पाकिस्तानी जवानांच्या हाती काहीच यश लागले नाही.

या मस्जिदवरील हल्ल्याची बातमी जशी बाहेर आली तशी इराणचे मुस्लीम क्रांतीकारी अयातोल्ला खोमेनी यांनी रेडिओवर म्हंटले की, या हल्ल्याच्या पाठिमागे अमेरिका आणि यहूदींचा हात आहे यात तीळमात्र शंका नाही.

या अफवांमुळे जगभरात अमेरिकेच्या विरोधात निदर्शन झाली. इस्लामाबादमध्ये दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ नोव्हेंबर १९७९ रोजी अमेरिकेचे दुतावास पेटवून दिले.
एका आठवड्यानंतर लिबीयामधील ही अमेरिकेचे दुतावास पेटवले.

अखेरीस Groupe d’Intervention de la Gendarmerie Nationale (GIGN) या फ्रान्समधील जवानांच्या एका तुकडीला पाचारण केले गेले.

पण अडचण अशी होती की बिगर मुस्लीम लोकांना मस्जिदच्या आत जाण्याची परवानगी नव्हती. अशावेळी फ्रान्सच्या तीन जवानांनी छोट्या मेळाव्यात धर्म परिवर्तन केले आणि ते आतमध्ये शिरले.

यानंतर आतुन लढाई चालू झाली. मस्जिदच्या आतमध्ये जावून धूराचे ट्युब आतमध्ये फेकले. त्यामुळे हल्लेखोरांना आतील चेंबरमधून बाहेर यावे लागले. भिंतीमध्ये ड्रिल करुन आतमध्ये बॉम्ब फेकले गेले. हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने बॉम्ब फेकले गेले. आणि पुढील कारवाईमध्ये मस्जिद सोडवली.

हल्लेखोरातील प्रमुख असलेला अल कहताबी सह अनेक हल्लेखोर जवानांच्या उत्तरातील गोळीबारात मारले गेले.

त्यांचे एकुण ६७ साथीदार पकडले गेले. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या ऑपरेशनमध्ये हाजी, जवान आणि हल्लेखोर असे मिळून २५५ जण मारले गेले. तर ५६० जण जखमी झाले.

चार डिसेंबरला हे ऑपरेशन संपल्यानंतर मस्जिदचे अतोनात नुकसान झाले होते. जणू दुसरे युद्धक्षेत्रच. पाक जागी रक्तपात झाला होता. पकडल्या गेलेल्या ६७ जणांपैकी ९ जानेवारी १९८० ला ६३ जणांचा सौदीमधील वेगवेगळ्या ८ शहरांमधील मुख्य चौकांमध्ये शिरच्छेद केला आणि इतर जणांना तुरुंगात टाकले गेले.

हे ही वाच भिडू.

3 Comments
  1. Ab says

    तुम्ही मराठी लेखक आहात.. तरी मशीद च्या ऐवजी मज्जिद
    पवित्र ऐवजी पाक असे शब्द वापरता…

  2. S says

    Editors email please ? A lot to clarify

  3. Milind Desai says

    I think the attackers were shias.

Leave A Reply

Your email address will not be published.