पहिल्यांदाच मक्का मशिदीत महिला सुरक्षा रक्षक म्हणून तैनात करण्यात आल्या आहेत

सौदी अरेबिया मध्ये महिलांना अजूनही भारता सारखे स्वातंत्र्य नाही. साधी कार चालवायला मिळावी म्हणून अनेकवर्ष संघर्ष करावा लागला. मात्र मागच्या काही वर्षात सौदीत महिलांना काही क्षेत्रात काम करण्याची मुभा देण्यात येत आहे.

मागच्या काही वर्षात सौदीत महिलेची न्यायधीश आणि राजदूत म्हणून निवड करण्यात आली. आता इतर क्षेत्रही महिलांसाठी खुले करण्यात येत आहे. इस्लाम धर्मियांचे पवित्र स्थान असणाऱ्या मक्का आणि मशिदीत सुरक्षेसाठी महिला सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सौदी अरबचे किंग सलमान यांच्या शासन काळात महिला सबलीकरणा बाबत अजून एक पाऊल टाकण्यात आले आहे. महिलांसाठी वेगवेगळे क्षेत्र नोकरी करण्याची संधी दिल्या नंतर आता मक्का येथील हज यात्रेसाठी काही महिला सैनिकांना तैनात करण्यात आला आहे. सांगण्यात येत आहे की, अनेक महिलांना मक्का आणि मदिनेत येथे होणाऱ्या हज यात्रेच्या सुरक्षेसाची जबाबदारी देण्यात आली आहे.

२०३० च्या व्हिजनसाठीची तयारी

मागच्या काही वर्षात सौदीत बदलाचे वारे वाहू लागेल आहे. या बदलांचे श्रेय किंग सलमानचा मुलगा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना जात. याच प्रिन्स मोहम्मदला पेट्रोल निर्याती वर निर्भर होत सौदीची अर्थव्यवस्था बदलण्याचा निश्चिय केला आहे. आणि त्याच बरोबर पर्यटन वाढीसाठी पर्यंत सुरु केले आहे. महत्वाचे म्हणजे सौदी गुतंवणूकचे केंद्र बनेल यावर लक्ष केंद्रित केले आहे.

या व्हिजन अंतर्गत महिलांना अनेक क्षेत्रात महिलांना सुट देण्यात येत आहे. या सुधारणांना व्हिजन २०३० असे  नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत सौदीच्या प्रिन्स ने महिलांवर लावण्यात आलेले विविध प्रतिबंध कमी केले आहेत.

तसेच कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षा पुरविण्याचे धोरण आखले आहे. लिंग आधारित भेदभाव कमी करण्याचा पर्यंत सुरु केले आहे.

मक्का आणि मदिनातील मशिदीत महिला सुरक्षा रक्षक

सौदी सेनेचा खाकी ड्रेस घातलेल्या महिला मक्केच्या मुख्य मशिदी मध्ये येणाऱ्या- जाणाऱ्या वर लक्ष ठेवतांना दिसून आल्या आहेत. खाकी वर्दी बरोबर महिला सैनिकांना एक लांब जॅकेट आणि केस झाकायला काळी रंगाची ओढणी आहे.

मक्का येथे महिला पोलीस म्हणून सुरक्षा पुरविणाऱ्या मोना हिने स्थानिक माध्यमांना सांगितले की, माझे वडील मक्केतील या मशिदीत सुरक्षा रक्षक होते. त्यांचे म्हणणे होते की, मक्केत दर्शन घेणाऱ्या भक्तांना पाहणे ही समाधानाची बाब असते.

मी सायकोलॉचे शिक्षण सुरु असून हे करिअर निवडल्या नंतर कुटुंबियांची फार मदत झाली. या कामातून वडिलांचे स्वप्न पूर्ण करत असल्याचेही मोना हिने माध्यमांना सांगितले.

एप्रिल महिन्या पासून महिला सुरक्षा रक्षकांना मक्का आणि मदिनेची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या एकून ११३ महिला सैनिक तैनात करण्यात आल्या आहेत. या सुरक्षा रक्षक महिलांना सौदीच्या लष्कराकडून प्रशिक्षण दिले आहे. या महिला सौदी लष्कराची विशेष तुकडी म्हणून ओळखली जाणार आहे. प्रत्येकी १८ महिलांची एक तिक तयार करण्यात आली असून २४ तसं या महिला मशिदीत सुरक्षा पुरवितात.

त्यांना प्रशिक्षणा दरम्यान स्वं-संरक्षण, बंदूक कशी वापरायची, प्रथमोपचार आणि इंग्रजीचे शिक्षण देण्यात आले आहे.

सौदीच्या संरक्षण क्षेत्रात लैंगिक भेदभाव कमी करण्यासाठी येथील प्रिन्स प्रयत्न करत आहे. त्याप्रमाणे तीन वर्षांपूर्वी महिलांना सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. २०२०  मध्ये सौदी अरेबियाच्या सैन्य दलात महिलांसाठी लष्करीची एक तुकडी तयार करण्यात आला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की, पुरुष व महिला सैन्यात भर्ती होण्यासाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे.

सौदीकडून महिलांना देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य बाबत अनेक देशाने स्वागत केले आहे.

सौदीत आहे महिलांना ड्रायव्हिंग संधी दिली आहे. महिला राजदूत, महिला न्यायधीश आणि सिनेमा निर्मितीची संधी उपलब्ध करून दिली आहे.  तसेच सौदीत आता वयस्कर महिला एकटे-दुकटे फिरण्याची मुभा दिली आहे. तसेच कुटुंबातील प्रश्नावर बोलण्याची मुभा देऊ केली आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.