खान कुटूंबाच्या सुनबाई, एका गाण्यामुळे तीच अख्ख करियर बदलून गेलं….

बॉलिवूडचा एक वेगळाच झगमगाट असतो, सिनेमात गाण्यांची भयंकर रेलचेल असते आणि इतकी गाणी असूनही त्यातल्या त्यात एखादं आयटम सॉंग असतंच. अगोदर जत्रेत लहान मुलांच्या खेळण्यात तो एक फोन यायचा ज्यात खैके पान बनारसवाला, धूम मचाले आणि चल छय्या छय्या ही गाणी असायची.

दिल से सिनेमातील हे छय्या छय्या हे गाणं त्यावेळी प्रचंड गाजलं होतं. त्याहीपेक्षा शाहरुख सोबत ट्रेनवर नाचणारी मलायका अरोरा जास्त गाजली होती. मलायका अरोरा हे नाव आज घडीला फिटनेस फ्रिक, योगा वैगरे प्रसिद्ध झालं आहे, पण एकेकाळी मलायकाने आयटम गर्ल आणि आयटम सॉंग हा प्रकार विलक्षण लोकप्रिय केला होता.

मलायका अरोरा खान घराण्याची सून होती. पुढं बरेच प्रकरण होऊन ते बिनसलं पण मलायका अरोरा बॉलिवूडची आयटम गर्ल कशी बनली त्याबद्दल जाणून घेऊया.

२३ ऑगस्ट १९७३ रोजी मुंबईच्या चेंबूरमध्ये मलायकाचा जन्म झाला. ती ११ वर्षाची असताना आईवडिलांचा डिव्होर्स झाला. आई मल्याळी तर वडील पंजाबी होते. चेंबूरच्या स्वामी विवेकानंद विद्यालयातून मलायकाने शिक्षण घेतलं. पुढे जयहिंद कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि इथूनच मॉडेलिंगची सुरवात झाली. मॉडेलिंग करत असताना एक महत्वाची घटना घडली.

एमटीव्हीच्या व्हीजेमध्ये मलायका अरोराची निवड झाली. यामुळे मॉडेलिंगच्या जगतात मलायका अरोरा हे नाव गाजू लागलं आणि अनेक जाहिरातींमध्ये ती दिसू लागली. नंतर सांग गुरू नाल ईश्क या अल्बम मध्ये मलायका झळकली. मॉडेलिंगमध्ये बराच संघर्ष करून चांगलं काम मिळत नव्हतं तेव्हा बॉलिवूडमध्ये मलायकाची अनपेक्षितपणे एन्ट्री झाली.

शाहरुख खानचा दिल से सिनेमा येणार होता आणि त्यात एका वेगळ्या प्रकारचं गाणं शूट केलं जाणार होत, चल छईय्या छईय्या या गाण्यावर आणि तेही रेल्वेवर मलायका अरोरा आणि शाहरुख खान नाचताना दिसले. हे गाणं तेव्हाही प्रचंड गाजलं आणि आताही सोशल मीडियावर याच गाण्याची चलती आहे.

२००० मध्ये अनेक सिनेमांमध्ये आयटम नंबर केल्यावर त्याच काळात छोट्या मोठ्या सिनेमांमध्ये मलायकाने कॅमिओ सुद्धा केले. २००८ साली मलायकाला ऍज ए अभिनेत्री म्हणून सिनेमा मिळाला तो म्हणजे इएमआय पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर इतका दणकून आपटला की नंतर या सिनेमाची चर्चाच झाली नाही.

२०१० साली सलमान खानचा दबंग सिनेमा आला यात मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर मलायका अरोराने आयटम नंबर केला होता आणि हा सिनेमा चाललाच शिवाय मुन्नी बदनाम हुई या गाण्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. १२ मार्च २०११ रोजी १२३५ लोकांनी जागतिक पातळीवर एकत्र हा डान्स मुन्नी बदनाम गाण्यावर केला होता. हे आयटम सॉंग त्यावेळी भयंकर गाजलं होतं.

२०१४ मध्ये फराह खानच्या हॅप्पी न्यू इअरमध्ये मलायकाने कॅमिओ केला होता. दिल से, बिछु, माँ तूझे सलाम, कांटे, हाऊसफुल, हाऊसफुल्ल २ आशा अनेक सिनेमांमध्ये मलायका दिसून येते. फक्त सिनेमा आणि मॉडेलिंगचं नाही तर मलायका टीव्ही शोजमध्ये परफॉर्मर आणि जजसुद्धा होती यामध्ये नच बलिए, इंडियाज गॉट टॅलेंट आशा अनेक शोजची नावे येतात.

बॉलिवूडचा अभिनेता, निर्माता अरबाज खान सोबत मलायकाने लग्न केलं आणि काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. आजही फिटनेस फ्रिक अभिनेत्री आणि बॉलिवूडची आयटम सॉंग स्पेशालिस्ट गर्ल म्हणून मलायका अरोरा हे नाव पुढे येतं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.