मलाला म्हणायची, “लाइफ पार्टनर सोबत राहण्यासाठी लग्न करायची काय गरज आहे”.

मलाला ….तिचा विषय म्हणजे सद्या तिचं लग्न. तिचं लग्न फार असं काही गाजत नसलं तरीही तिच्या लग्नाची गोष्ट सर्वच जण एकमेकांना इंटरेस्ट घेऊन सांगतात. आता मलाला म्हणजे तुमच्या आपल्या मैत्रिणीसारखीच चुणचुणीत मुलगी…फरक एवढाच कि तिने असामान्य गोष्ट करून दाखवली. म्हणून तिचा सन्मान नोबेल पारितोषिकाने झाला.

पण आता मलाला च्या एकंदरीत लग्नाबद्दल आणि तिच्या जोडीदारा विषयी बोलूयात…

मलाला इतर मुलींसारखी च म्हणायची मला नाही लग्न करायचं नी आता तिने स्टेट्स टाकलंय..”टुडे मार्क्स अ प्रेशियस डे इन माय डे”…म्हणजेच आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस…असो हा गंमतीचा भाग आहे. तिचा जोडीदार हा सुद्धा तिच्या आवडत्या क्षेत्रातला आहे.

मलालाने युसुफझाईचे बर्मिंगहॅममध्ये एका छोट्याशा कार्यक्रमात आपले लग्न आटोपले. मलालाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून हि माहिती दिली आहे. 

पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातील मलालाने मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवला. २०१२ मध्ये मलालाला शाळेच्या बसमधून जात असताना तालिबानने तिच्या डोक्यात गोळी झाडली होती. तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. गंभीर स्थिती पाहून मलालाला उपचारासाठी ब्रिटनला नेण्यात आले. तेथे शस्त्रक्रियेनंतर तिचे प्राण वाचले. तिच्या वडिलांनाही ब्रिटनमधील पाकिस्तानी दूतावासात नोकरी देण्यात आली होती. मलाला युसुफझाईला २०१४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि हा पुरस्कार भारताचे बाल हक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत देण्यात आला. 

‘I Am Malala’ या मलाला च्या आत्मचरित्रानंतर पुस्तकानंतर ती जगप्रसिद्ध झाली….‘I Am Malala’ या पुस्तकामुळे तिची कहाणी लोकांना कळाली. 

त्यातून अनेक रंजक गोष्टी देखील आपल्याला कळल्या..तसेच तिने व्होग या प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलालाने लग्नाबद्दल तिचे विचार बोलून दाखवले होते. तिने लग्नाला थेट अनावश्यक गोष्ट ठरवली होती.  ती म्हणाली होती की, लोकं लग्न का करतात हेच मला समजत नाही. जर तुम्हाला जीवनसाथीच हवाय तर तुम्हाला लग्न करण्याची काय गरज आहे, एक जोडीदारासोबत राहायचं असेल तर तुम्हाला लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या करायची काय गरज आहे, फक्त पार्टनरशिप म्हणून का राहू  शकत नाही?…असे मलालाने परखड विचार मांडले होते आणि त्यावर प्रचंड विवाद निर्माण झाला होता. 

हा वाद एवढा वाढला होता कि शेवटी मलालाच्या या विधानावर तिचे वडील झियाउद्दीन युसुफझाई यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

असो मलाला चा जोडीदार कोण आहे याकडे वळूया…मलाला ला नेहेमीच क्रिकेट आवडत असल्याचा उल्लेख ती वारंवार तिच्या लेखात आणि मुलाखतीत करत असते. ती क्रिकेटची चाहती आहे हे तर स्पष्टच आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिने क्रिकेटचा उल्लेख केला आहे.  आता मलाला चे नशीब म्हणा कि योगायोग म्हणा तिला तिचा जोडीदार नवरा देखील क्रिकेटशी संबंधितच मिळाला आहे. म्हणजेच तिच्या पतीचे क्रिकेट कनेक्शन आहे. 

थेट सांगते… असर मलिक हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरचे जनरल मॅनेजर आहेत. त्यांनी लाहोरच्या प्रतिष्ठित एचिसन महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर लाहोर विद्यापीठातून त्यांनी मॅनेजमेंटचं शिक्षणही घेतलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबरोबर काम करण्याआधी ते पाकिस्तान सुपर लीगमधल्या मुलतान सुलतान्स संघासाठीही काम करत होते.

अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या विकासाकरता नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना केली होती. माजी क्रिकेटपटू नसीम खान या सेंटरचे संचालक आहेत.

त्यामुळे आता हा योगायोग म्हणावा कि, मलालाने ठरवून आपला क्रिकेटशी सबंधित जोडीदार शोधला हे पाहणं महत्वाचं नाहीये तिच्या आयुष्याचा निर्णय आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.