बायकांप्रमाणेच बाप्येही मेनोपॉज़मधून जात असतात..

मेनोपॉज़ म्हणजेच रजोनिवृत्ती ! जेव्हाही हि कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल तर ती फक्त स्त्रियांच्याच सबंधित ऐकली असणार. थोडक्यात रजोनिवृत्ती म्हणजे जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येणे थांबते. साधारण हि स्टेज स्त्रियांच्या आयुष्यात चाळीशी नंतर येते.

पण आज आपण स्त्रियांच्या मेनोपॉज़ बद्दल नाही तर पुरुषांच्या मेनोपॉज़ बद्दल बोलणार आहोत !

हो ! पुरुषांना देखील मेनोपॉज़ असतो. त्याला पुरुष रजोनिवृत्ती म्हणतात.

हे खरे आहे की पुरुषांनाही स्त्रियांप्रमाणे रजोनिवृत्ती असते., वैद्यकीय भाषेत याला म्हातारपणात एंड्रोजनची कमतरता असणे म्हणतात. अँड्रोजेनमध्ये टेस्टोस्टेरॉनसह अनेक हार्मोन्सचा समावेश होतो, हे हार्मोन्स पुरुषाला पुरुष वैशिष्ट्ये देतात. यापैकी, सर्वात प्रभावी हार्मोन टेस्टोस्टेरॉन आहे. हे संप्रेरक अंडकोष म्हणजेच अंडकोषांद्वारे तयार केले जाते.

याशिवाय, मेंदूमधून दोन हार्मोन्स देखील बाहेर पडतात, FSH आणि LH. हे हार्मोन्स टेस्टोस्टेरॉन तयार करण्यास मदत करतात. जर या दोन हार्मोन्सची कमतरता असेल तर टेस्टोस्टेरॉन कमी होऊ लागते, त्याचप्रमाणे जर अंडकोष स्वतःच अपयशी होऊ लागले तर टेस्टोस्टेरॉनची कमतरता असते. जेव्हा वृषणात टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढत्या वयाबरोबर कमी होते, तेव्हा त्याला पुरुष रजोनिवृत्ती किंवा वृद्ध पुरुषात एंड्रोजनची डेफिशियेंसी होणे म्हणतात.

पुरुष आणि महिलांच्या रजोनिवृत्तीमध्ये काय फरक आहे?

स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती खूप कमी कालावधीत पूर्ण होते. परंतु पुरुषांमध्ये, रजोनिवृत्ती हळूहळू सुरु होते आणि दीर्घ काळ चालू राहते. ह्याची सुरुवात बहुतेक ६० ते ७० वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये आढळते. काही प्रकरणांमध्ये, पुरुष रजोनिवृत्ती वयाच्या ४० व्या वर्षी देखील दिसू शकतात.

लक्षणांबद्दल बोलायचं तर, पुरुष रजोनिवृत्तीचा काळ सुरु होणे म्हणजे जवळपास ६०- ७० नंतर  पुरुषांची लैंगिक इच्छा कमी होऊ लागते. मॉर्निंग इरेक्शन न होणे, इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या सुरु होणे, याशिवाय त्यांना चिडचिड होणे, नैराश्य येणे, तसेच विचार करण्याची क्षमता कमी होऊ लागणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्मरणशक्ती कमी होते.

पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते, थोडक्यात लठ्ठपणा येतो. मूड स्विंग, हॉट फ्लॅश (तीव्र उष्णता, घाम येणे), झोप कमी होणे, – स्नायूंमुळे हाडांची ताकद कमी होऊ लागते. याशिवाय पुरुषांची शारीरिक ताकद कमी होऊ लागते.

अशावेळेस कोणत्या प्रकारची वैद्यकीय घेणे गरजेचे आहे का ?

पुरुष रजोनिवृत्तीच्या उपचारांमध्ये लाइफ स्टाइल ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पुरुषांनी त्यांच्या जीवनशैलीत बदल केले पाहिजेत. व्यायाम करावा, सकस आहार घ्यावा, पूर्ण झोप घ्यावी आणि तणाव कमी घ्यावा. काही लोकांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचीही गरज असते. हे हॉर्मोन जेल किंवा इंजेक्शनच्या रुपात दिले जातात.

जर हार्मोन रिप्लेसमेंट योग्यरित्या केले गेले नाही तर ते फायद्याऐवजी नुकसान जास्त करते. त्याचप्रमाणे, अनावश्यक टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन दिले गेले तर ते देखील हानिकारक असते. हे महत्वाचे हे आहे की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी केवळ तज्ञांकडूनच घ्यावी. बाजारामध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचा दावा करणारे अनेक आहार, पावडर इत्यादी उपलब्ध आहेत, परंतु त्यासाठी वैद्यकीय आधार नसल्यामुळे यावर विश्वास ठेवला जाऊ नये.

तर पुरुष रजोनिवृत्ती ही खरी समस्या आहे. जर तुम्हाला अशी काही लक्षणे दिसली तर नक्कीच डॉक्टरकडे जा.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.