लिपस्टिकमुळे वडिलांचा बेदम मार खाणारी रिमा लांबा किसिंग क्विन मल्लिका शेरावत बनली..

‘जैकी चैन ने अपनी कुंग फू स्किल्स और आर्नोल्ड श्वॉट्नेगर ने अपने मसल्स दिखाए. हर एक्टर खुद को स्थापित करने के लिए अपनी यूएसपी का इस्तेमाल करता है. अगर मेरी यूएसपी सेक्स अपील है, जो इसमें गलत क्या है?’

हे कुणी म्हणलय माहितीय का ? मल्लिका शेरावत. मल्लिका शेरावत म्हणजे माहितीय ना कोण ? भिगे होंट तेरे ,प्यासा दिल मेरा या गाण्यातली अभिनेत्री. मल्लिका शेरावत काय साधीसुधी अभिनेत्री नाही तर तिने आपल्या पहिल्याच सिनेमात तब्बल 17 किसिंग सीन दिले होते आणि सगळा भारत हादरवला होता. अनेक टीका मल्लिकावर झाल्या पण तीही तितकीच सडेतोडपणे उत्तर देत राहिली.

पहिल्या सिनेमात केलेल्या किसिंग प्रकरणातून ट्रोलर्स सावरतच होते की लगेच मर्डर सिनेमा आला आणि मल्लिका शेरावतने बाजार उठवला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचा दुष्काळ संपवला. 24 ऑक्टोबर 1976 साली हरियाणात मल्लिका शेरावतचा जन्म झाला. घरचे जरा स्ट्रिक्ट होते. एकदा लिपीस्टिक लावली म्हणून घरच्यांनी बेदम मार मल्लिकाला दिला होता. पोरांपासून दूर राहावं म्हणून तिच्या वडिलांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये तीच ऍडमिशन केलं.

पण मल्लिकाला हिरोईन व्हायचं होतं. दिल्लीत ती लपून छपून मॉडेलिंग करू लागली, घरी सांगितलं तर तिच्या वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले पण याचा खासा फरक तिला पडला नाही, वयाच्या 18 व्या वर्षी आजीचे दागिने विकून ती मुंबईत आली. मल्लिका शेरावत हे तिचं मूळ नाव नव्हतं तर रिमा लांबा हे तिचं मूळ नाव होतं. जुहूत छोटं घर तिला मिळालं. नाव बदलण्याचा तेव्हा तिचा विचार नव्हता पण त्याकाळात रिमा, रामका वैगरे नावाच्या बऱ्याच हिरोईन होत्या तेव्हा दिग्दर्शक गोविंद मेनन यांनी तिचं नाव मल्लिका शेरावत केलं.

17 किसिंग सीन दिलेला तो सिनेमा होता ख्वाईश. पिच्चर तितका चालला नाही पण मल्लिका भाव खाऊन गेली. मर्डर सिनेमामुळे खऱ्या अर्थाने मल्लिका शेरावत स्टार बनली तिला महेश भट्ट यांनी कास्ट केलं होतं. मर्डर रिलीज झाला आणि एकाच दिवशी 70 इंटरव्ह्यू देण्याचा रेकॉर्ड मल्लिका शेरावतच्या नावावर झाला. इथून बऱ्याच सिनेमांच्या ऑफर तिला आल्या. बिपाशा, करीना, अमिषा या तेव्हाच्या आघाडीच्या हिरॉइन्सना मागे टाकत मल्लिकाने थेट जॅकी चॅनच्या हॉलीवूड सिनेमात पदार्पण केलं तो सिनेमा होता द मिथ नावाचा. या सिनेमाने भारतातून थेट इंटरनॅशनल लेव्हलला मल्लिका शेरावतला पोहचवलं.

अनेक कोन्ट्रोव्हर्सि आणि कौतुकास्पद कामगिरीच्या घेऱ्यात मल्लिका राहिली. पण आजकाल ती टिव्हीवरून गायब झाल्याचं चित्र आहे. 2017 साली एका हॉलीवूड प्रोजेक्ट साठी ती लॉस एंजेलीसला गेल्याचं बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं होतं पण सध्या ती मुंबईत आहे आणि ती लवकरच तिच्या एका नवीन सिनेमावर काम करत आहे आणि त्याची घोषणाही ती करणार आहे.

17 किसिंग सीन, हॉलीवूड एन्ट्री असा प्रवास करणाऱ्या मल्लिका शेरावतचे जगभरात फॅन आहे, तिच्या फॅन्समध्ये ती यासाठी लोकप्रिय आहे की ती स्पष्टवक्ती आहे आणि तिची हीच अदा तिच्या प्रसिद्धीचं कारण मानलं जातं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.