मल्लिकार्जुन खर्गे Vs शशी थरूर : आज पार पडलेली निवडणूक १० खास गोष्टींमधून समजून घ्या

गेल्या ७५ वर्षांतली ३ री निवडणूक. २ तगडे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी थरूर. ९ हजार मतदार….आज मतदान आणि परवा निकाल !!!

गेल्या २४ वर्षांपासून कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड करण्याचे फक्त सोपस्कार पार पाडले जात होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत खरी रंगत दिसणार आहे. 

मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी थरूर या अचहया सामान्यातले १० फॅक्टस आज आपण जाणून घेऊयात..

१) मागील ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला, यासह विविध नेत्यांकडून संघटनात्मक फेरबदलाचे आवाहन करण्यात आले. उदयपूर चिंतन शिबिरात दोन मोठ्या फेरबदलाचे निर्णय घेण्यात आले एक म्हणजे भारत जोडो यात्रा आणि दुसरी म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडणे.

२) १९९८ पासून कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर सोनिया गांधी विराजमान होत्या. २०१७ मध्ये राहूल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले पण निवडणूकीतल्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर पुन्हा सोनिया गांधीकडे अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रत्येक निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.

३) आजच्या निवडणुकीत देशभरातल्या प्रदेश काँग्रेसकमिटीच्या ऑफिसेस मध्ये ९ हजार मतदान करत आलस्याची माहिती. या निवडणुकीत टोटल ३६ मतदान केंद्रे आहेत तर ६७ बूथ आहेत. प्रत्येकी २०० प्रतिनिधींसाठी एक बूथ तयार करण्यात आलेला आहे. तर सद्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत असलेले राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतचे ४७ प्रतिनिधी कर्नाटकातल्या बेल्लारी येथे मतदान पार पडलं आहे. 

४) मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर आज पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीत आमनेसामने आल्याने काँग्रेसला २४ वर्षांनंतर अधिक काळातील पहिला नॉन -गांधी प्रमुख मिळणार आहे.

५) मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘स्वीकृत’ उमेदवार म्हणून पाहिले जाते. तर शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले मात्र ते गांधी घराण्याचे उमेदवार नाहीत. 

६)  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत जे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यात सुरुवातीला आघाडीवर होते मात्र ते मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर त्या ११ तासात मल्लिकार्जुन खर्गेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गेहलोत यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी ही घोषणा केली. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांना राजस्थानमधील सर्वोच्च पदावर येण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या निष्ठावंत आमदारांनी उघड बंडखोरी केल्यानंतर सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांचा हा निर्णय घेण्यात आला.

७) गेहलोत यांना राजस्थानचं मुख्यमंत्री पदही हवं होतं आणि अध्यक्ष पदाची निवडणूकही लढवायची होती, तशी सुचक विधानही त्यांनी केलेलं कि,”एक व्यक्ती २-३ पदं सांभाळू शकते”, मात्र राहुल गांधींनी आणलेल्या ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमात अशोक गेहलोत फिट बसत नव्हते मग त्यांनी हा विचार सोडून दिला.

८) त्यानंतर शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे या दोघांच्याही निमित्ताने नॉन-गांधी नेतृत्वासाठीचे पर्याय फिक्स झाले. परंतु या निवडणूक प्रक्रियेत शशी थरूर यांनी दोन्ही उमेदवारांना देत असलेली वागणूक ही पक्षपाती असल्याचं मत जाहीररीत्या व्यक्त केलेलं. पण त्यांचा हा मार्ग सोपा नव्हता.

९) शशी थरूर यांनी पक्षावरच टीका करत म्हणालेले कि, ते जेव्हा ते प्रचारासाठी राज्यांना भेट देत होते तेव्हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्यासाठी उपलब्ध नसायचे. पण अनेक ठिकाणी जेंव्हा मल्लिकार्जुन खरगे प्रचारासाठी जात असत तेंव्हा त्यांचे स्वागत होत असत…याबाबत माझी तक्रार नाही पण पक्षातर्फे मला आणि त्यांना पक्षाने वेगळी वागणूक दिली. थोडक्यात त्यांना गांधी कुटुंबाचा थेट पाठिंबा नाही.

१०) एकीकडे शशी थरूर पक्षाला गांधी घराण्याच्या बाहेरचं नेतृत्व आवश्यक असण्याचा मुद्दा पुढं करत आलेत तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टरित्या सांगितलं आहे कि, “सामूहिक निर्णय घेण्यावर” विश्वास आहे आणि गांधी कुटुंबाचे मार्गदर्शन घेत राहतील. गांधी कुटुंबाने देशासाठी चांगले काम केले आहे. त्यांच्या सल्ल्याचा पक्षाला फायदा होईल… त्यामुळे मी त्यांचा सल्ला आणि पाठिंबा नक्कीच घेईन. यात लाज वाटण्याचे कारण नाही,” असे ते म्हणाले होते. शिवाय खर्गे दलित चेहरा आहे ज्याचा फायदा काँग्रेस ला येत्या काळात दलित मतदार वर्ग खेचण्यासाठी होईल.

शशी थरूर निवडून आले तर काँग्रेसचं नेतृत्व गांधी घराण्याबाहेर जाईल अन् जर का खर्गे निवडून आले तर अप्रत्यक्षरित्या काँग्रेस गांधी कुटुंबाच्या च हाती राहील.

थोडक्यात आज किती एकूण मतदान पार पडलं आहे याची आकडेवारी अद्याप माध्यमांना मिळालेली नाही, मात्र आज पार पडलेल्या ऐतिहासिक ठरली गेलेली निवडणूकीचा निकाल परवा म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी कळेलच.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.