भाजप जाऊ दे ममता दीदींनी काँग्रेसला देखील सुरुंग लावलाय.

काँग्रेस मधून सध्या इतर पक्षात आऊटगोईंग जोरदार सुरुय. आणि पक्ष सोडण्यामध्ये वयस्क नेत्यांपेक्षा तरुण नेते आघाडीवर आहेत. आजच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महिला काँग्रेसमधील सर्वात मोठा चेहरा सुष्मिता देव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्राद्वारे पाठवला आहे.

आता सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला ही गोष्ट नक्कीच महत्वाची आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश. म्हणजे ममता दीदींचा पक्ष. पश्चिम बंगालच्या निवडणूकांनंतर दीदींनी भाजपाचे नेते गळाला लावले होते. आता त्यांचा डोळा काँग्रेसवर दिसतोय.

सुष्मिता देव यांचं राजकीय महत्व काय आहे हे बघायला पाहिजे. 

आसाममधील काँग्रेसचा एक अतिशय मजबूत चेहरा आणि एक अनुभवी काँग्रेस युवानेती म्हणून देव यांची ओळख आहे. आसामच्या गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच त्यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु नंतर या प्रकरणावर काँग्रेसने सारवासारव केली. थोडक्यात हे  प्रकरण कसे तरी पुढे ढकलण्यात आले. पण, शेवटी व्हायचे तेच झाले. देव यांनी सर्वात जुन्या पक्षाचा राजीनामा दिलाच.

२५ सप्टेंबर १९७२ रोजी सिलचर, आसाम येथे जन्मलेल्या सुष्मिता देव सात वेळा खासदार राहिलेल्या संतोष मोहन देव आणि बिथिका देव यांच्या कन्या आहेत. सिलचरमधून लोकसभा सदस्य होण्यापूर्वी त्या काँग्रेसकडून त्याच ठिकाणाहून विधानसभेच्या सदस्याही राहिल्या होत्या. सुष्मिता देव मूळच्या आसामच्या बराक व्हॅलीतील आहेत. त्यांना आसामच्या बंगाली भाषिक बराक प्रदेशातील प्रमुख चेहरा मानले जाते.

त्यांचे वडील आसामचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत. त्यांना आसाम मधले प्रभावी बंगाली नेते मानले जात होते. सुष्मिता देव यांनी सिल्चरला आपली कर्मभूमी बनवली, जो पूर्वी त्यांच्या वडिलांचा गड मानला जायचा. 

सुष्मिता देव काँग्रेसच्या तरुण फळीतल्या आघाडीच्या नेत्या होत्या. पण त्यांनी मध्यन्तरी काँग्रेसविरोधी भूमिका घेतली होती. त्यांनी भाजपने आणलेल्या नागरिकता संशोधन कायदा थोडक्यात सीएए ला आपलं समर्थन दिल होत. आणि ज्यावेळी सीएएला विरोध म्हणून काँग्रेसने जो मफलर आणला होता तो घालायला त्यांनी नकार दिला होता. त्यांनी म्हंटल होत कि माझ्या भागातले म्हणजेच बाराक व्हॅलीतले लोक या कायद्याच्या सपोर्ट मध्ये आहेत.

यावरून काँग्रेस मध्येच अंतर्गत भूकंप आला होता. 

यावर देव यांनी सप्ष्टीकरण दिल होत की, माझ्या भागातल्या लोकांना फाळणीच्या दुःखद यातनेतून जावं लागलं होत. सीएएमुळे बांग्लादेशी हिंदु लोकांची नागरिकता सुनिश्चित होणार आहे. मी पूर्णपणे या कायद्याला सपोर्ट करेन असं ही नाही.

देव यांच्या नाराजीचा अचूक अंदाज बांधत तृणमूलने त्यांना आपल्या गोटात सामील करून घेतलं. खरं तृणमूलला याचा फायदा आहे का?

तर होय, तृणमूलला या सुश्मिता देव यांचा फायदा आहे. तृणमूल मध्ये सामील झाल्यानंतर आता त्यांना त्रिपुरा पार्टीचे प्रभारी पद मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण पुढच्या वर्षी त्रिपुराच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. आसामच्या मूळ निवासी असलेल्या सुष्मिता देव यांचे स्वर्गीय वडील मोहन देव हे पाच वेळा सिलचर मधून तर दोन वेळा त्रिपुराच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

त्यामुळे ममता दीदींनी मोठा डाव साधलाय असं म्हणायला हरकत नाही. दीदी काय आता काँग्रेसला पण सोडत नाहीत वाटत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.