जीव वाचवण्यासाठी भारतात आला, आणि ऑल इंडिया रेडिओची आयकॉनिक ट्यून देवून गेला. 

रेडिओ सुरू होण्याअगोदर एक ट्यून ऐकू यायची. आत्ता त्याचा आवाज कसा असायचा हे लिहून दाखवणं अशक्य असलं तरी ती ट्यून तुमच्या लक्षात असेलच, नाही तर खाली त्या ट्यूनची लिंक दिलीच आहे. कित्येक दिवस ऑल इंडिया रेडिओची ती ट्यून आणि रेडिओ यांच समीकरण पक्क राहिलं. तंबोऱ्याच्या साथीला असणारा व्हायोलीन आवाज हा शिवारंजिनी वर आधारित असल्याचं सांगितलं जातं. 

आत्ता त्या धूनसोबत तुमच्या किती आठवण असतील हे तुम्हीच ठरवू शकता पण आम्ही सांगणार आहोत या धून पाठीमागे असणाऱ्या माणसाबद्दल. संपुर्ण भारताला जोडणाऱ्या या ट्यूनला एका युरोपीयन व्यक्तीने बनवलं होतं हे तुम्हाला सांगितलं तर सहज पटणं अवघड होईल,

आपला जीव वाचवण्यासाठी तो भारतात शरणार्थी म्हणून आला होता. आणि याच वेळी तो ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करू लागला व त्याचकाळात हि ऐतिहासिक ट्यून तयार करण्यात आली. 

चेक देशातला वॉल्टर कॉफमैन हा एक ज्यू होता. १९०७ मध्ये कार्ल्सबाद येथे त्याचा जन्म झाला, आज त्या शहराच नाव कार्लोवी वारी आहे. वाल्टरचे वडिल ज्यूलियस कॉफमैन यांनी एका इतर धर्मीय मुलीसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर ती मुलगी ज्यू झाली होती. 

हिटलर आणि हिटलरची नाझी सैन्याने मोठ्या प्रमाणात ज्यू लोकांची कत्तल करण्यास सुरवात केल्यानंतर त्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी चेक प्रजासत्ताक मधून त्यांनी पलायन केलं. याचदरम्यान वाल्टर यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. 

१९३४ साली जेव्हा हिटलरने प्राग देशावर आक्रमण केलं तेव्हा वॉल्टर हा २७ वर्षांचा तरुण हिटलरच्या तावडीतून वाचण्यासाठी भारतात आला.

युद्ध समाप्त झाल्यानंतर आपल्या देशात जाण्याच स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. अस कुठल्या देशात जीव वाचवण्यासाठी शरणार्थी रहावं लागण वॉल्टरला नको वाटतं होतं, पण मुंबईत आलेला वॉल्टर मुंबईच्या प्रेमात पडला. मुंबईत आल्यानंतर त्यांना बॉम्बे चेंबर म्युझिक सोसायची बद्दल समजलं होतं.ते या संस्थेत दाखल झाले. एक संगीतकार म्हणून प्रवास घडवण्यासाठी त्यांना या सोसायटीची मदत झाली अस सांगितल जातं की या सोसाय़टीने एका वर्षात १३० कार्यक्रम केले होते. 

त्यानंतर वॉल्टर यांनी भारतीय संगीताच्या क्षेत्रात प्रवेश घेतला त्यांच अस मत होतं की एखाद्या देशातलं संगीत कोठून आलं त्या देशातील संगीताची उगमस्थान शोधता यायला हवं. हाच विचार घेवून त्यांनी भारत फिरून काढलां आणि शेवटी ते दिल्ली येथे ऑल इंडिया रेडिओसाठी संगीतकार म्हणून नियुक्त झालं. 

१९३६ ते १९४६ या काळात ते आकाशवाणीसाठी संगीतकार म्हणून काम करत होते.

याच काळात भारतात तेव्हा आपल्या ऑर्केस्ट्रामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या महली मेहता देखील रुजू झाल्या होत्या. त्यांच्या सोबत मिळून ऑल इंडिया रेडिओसाठी धून तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी एक धून तयार केली. तंबोऱ्याच्या साथीवर व्हायोलिनचा आवाज असणाऱ्या या धूनमध्ये त्यांनी स्वत: व्हायोलिन देखील वाजवलं होतं. 

या दरम्यानच्या काळात त्यांनी भारतीय चित्रपटांसाठी देखील काम केलं. मुकपटातून बोलपटाकडे जाणारा तो काळ होता अशा काळात आपलां मित्र मोहन भवनानी यांच्या एक दोस्त सिनेमासाठी त्यांनी संगीत दिलं होतं. 

१९४६ नंतर BBC मध्ये काम करण्यासाठी ते लंडनला गेले. पुढे १९४८ ते १९५७ दरम्यान ते कॅनडा येथे संगीत डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्यानंतर ते अमेरिकेत गेले व तिथेच स्थायिक झाले. हजारो भारतीयांना जोडणाऱ्या, त्यांच्या आठवणी जपणाऱ्या या ट्यूनचा निर्माता एक विदेशी होता हेच विशेष. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.