लाखोंच्या गर्दीत हिटलरला सॅल्युट न करणाऱ्याचं पुढे काय झालं….

विद्रोह, बंडखोरी नेहमी मोठ्या गोष्टीतून साध्य होते अस नाही. कधीकधी खूप छोट्या वाटणाऱ्या गोष्टी इतिहासाच्या पानावर वेगळ अस्तित्व निर्माण करतात. येणाऱ्या पिढ्यांना संदेश देत राहतात. जगाच्या इतिहासात २० व्या शतकातील सर्वात दुर्देवी घटना कोणती विचारली तर हिटलरचा उदय हेच उत्तर मिळतं. लाखों ज्यू लोकांची कत्तल, वंशश्रेष्ठत्वाचा दावा ठोकून एक वंशच निर्मुलन करण्याचा उचलेला विडा आणि लाखों लोकांच्या भविष्याची केलेली राखरांगोळी म्हणूनच आज हिटलरची ओळख इतिहासात आहे.

पण इतिहास काळावर अवलंबुन असतो. आज हिटलरची ओळख अशी असली तरी एक काळ होता तेव्हा हिटलर हा लोकांसाठी दैवी अवतार होता. तो आपल्याला सर्व गोष्टीतून बाहेर काढेल एका नव्या जगात घेवून जाईल अशी आशा हिटलरने दाखवली होती.

त्या वेळी हिटलरला एका व्यक्तीने सॅल्यूट करणं नाकारलं होतं. हिटलरला मानवंदना देणं नाकारण म्हणजे स्वत:हून मृत्यूच्या खाईत जाणं. पण त्याने हे धाडस दाखवलं म्हणूनच त्यांची नोंद इतिहासत घेतली गेली. 

पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी पुर्णपणे बुडाला होता. आर्थिकस्थिती डबघाईला आली होती. अशा काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज पुकारणाऱ्या नेत्याचा जन्म झालं त्याच नाव ॲडाल्फ हिटलर. हिटलरचा सुरवातीचा काळ प्रचंड आशादायी होता. आपल्या भाषणातून तो तरुणाईला नव्या जर्मनीची स्वप्न दाखवत होता. बेरोजगारी ग्रस्त असणारे हजारो तरुण त्याच्या सोबत येत होती. याच तरुणांमधलं दूसर नाव होतं ते म्हणजे ऑगस्ट लॅण्डमेसर.

हिटलर सारख कणखर नेतृत्व त्याला नोकरी मिळवून देईल म्हणून हा तरूण नाझी पक्षात सामिल झाला होता. 

इकडे जर्मनीत हिटलर राज्य सुरू झालं होतं.

हजारो लाखो तरुण हिटलर सोबत होते त्याच वेळी ऑगस्ट लॅण्डमेसर देखील या गर्दीचा एक भाग होता. ऑगस्ट लॅण्डमेसरच्या खाजगी आयुष्यात त्यावेळी काय चालू होतं तर तो एका ज्यू मुलीच्या प्रेमात पडला होता. ते साल होतं १९३४ चं. इर्मा एक्लरची आणि ऑगस्ट लॅण्डमेसरची ओळख झाली. मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

Screenshot 2019 05 25 at 2.29.04 PM

इकडे हिटलरचा ज्यू विरोध वाढू लागला. ज्यू लोकांच्या कत्तली घडवून आणण्यासाठी गॅस चेंबर उभारण्यात आले. इर्मा आणि ऑगस्टच्या लग्नाची माहिती नाझी पक्षाच्या लोकांना समजली. तात्काळ ऑगस्टची नाझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या काळात त्या दोघांना एक मुलगी देखील झाली. आपल्या मुलीला आणि पत्नीला घेवून जर्मन सोडून पळून जाण्याची योजना ऑगस्टने आखली. पण डेन्मार्कच्या सीमेवर नाझी सैनिकांनी त्यांना पकडलं. ऑगस्टचा हा गुन्हा म्हणजे थेट वंशाचा अपमान होता.

याच गुन्ह्यासाठी त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. 

दोघांना न्यायालयात उभा करण्यात आलं. ऑगस्टने सांगितलं की, ती ज्यू आहे हे त्याला माहिती नव्हतं. इर्माच्या आईने दुसरे लग्न केल होतं. त्यानंतर इर्माने ख्रिश्चन धर्माचा बप्तिस्मा स्वीकारला होता. १९३८ साली कोणताच पुरावा नसलेल्या न्यायालयातून दोघांची सुटका करण्यात आली. पण हि सुटका करत असताना न्यायालयाने दोघांपुढे एक अट ठेवली ती म्हणजे, दोघांनी पुन्हा संबध ठेवल्यास त्यांच्यावर पुन्हा गुन्हा नोंदवला जाईल. झालं देखील तसच. पुढच्या दोन तीन महिन्यातच न्यायालयाने ऑगस्टला पत्नीसोबत संबध ठेवल्यामुळे अटक केली. ३० महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. 

ऑगस्ट लॅण्डमेसर जेलमध्ये गेला. इकडे ज्यू महिलेशी संबध ठेवले तर महिलेला देखील शिक्षा करण्याचा आदेश निघाला आणि एर्मा एक्लरला देखील अटक करून तिला कारावासची शिक्षा ठोठवण्यात आली.

त्यांच्या दोन्ही मुलींना अनाथआश्रमात टाकण्यात आलं. तिकडे ऑगस्ट लॅण्डमेसर जेलमध्येच होता. आपल्या पत्नीसोबत, आपल्या मुलींसोबत काय झालं याची त्याला कल्पनादेखील नव्हती. हिटलरने उभा केलेल्या गॅस चेंबरमध्येच तिच्या पत्नीचा शेवट करण्यात आला. 

या सर्व घडामोडींमध्ये त्याने हिटलरला सॅल्यूट देणं कधी नाकारल होतं हा प्रश्न उरतोच.

ती तारिख होती, १३ जून १९३६. हिटरलने त्या वेळी नौदल सैन्य प्रशिक्षण शिबीर आयोजित केलं होतं. ऑगस्ट लॅण्डमेसर तेव्हा हिटलरच्या नौदलात सहभागी झाला होता. नाझी सैन्यात सहभागी होणं हे प्रत्येकासाठी कम्पलसरी होतं.  एर्मा एक्लरसोबत लग्न करुन दोन वर्ष झाली होती. त्यावेळी त्याला एक मुलगी होती व वाढता ज्यू विरोध पाहून तो पळून जाण्याच्या तयारीत होता. याच वातावरणात त्याने हिटलरला सॅल्यूट करण्याच नाकारलं होतं. 

Screenshot 2019 05 25 at 2.28.54 PM

त्याचं पुढे काय झालं ?

१९४१ साली तो कारावासातून बाहेर पडला. बाहेर पडल्या पडल्या त्याला नाझी सैन्यात पुन्हा भरती व्हावं लागलं. यादरम्यान एकीकडे त्याच्या पत्नीला गॅस चेंबरमध्ये मृत्यू देण्यात आला तर दूसरीकडे क्रोएशिया येथील युद्धात तो हिटरलकडूनच लढताना मारला गेला. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.