कोरोनाच्या काळाला संधी मानली आणि स्वतः च हेल्थकेअर स्टार्टअप सुरू केल

गेल्या काही वर्षांपासून स्टार्टअपचा एक ट्रेंड सुरू झालाय. म्हणजे कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या छोट्या गुंतवणूकीतून का असेना पण स्टार्टअप सुरू करायचा आणि एकदा का बेस बसला तर आपल्याला वर जायची जशी काय सिडीचं मिळते.

त्यात जेव्हापासून कोरोनाने एन्ट्री मारली तेव्हापासून लोकांनी भविष्यात नोकरी जाण्याच्या भितीने स्टार्टअपमध्येच डोकं घातलयं. रोज आपण सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये आणि लांब कशाला आपल्या बोल भिडूवर रोज एखाद्या तरी स्टार्टअपची स्टोरी वाचतोच. त्यातचं आजची ही स्टोरी विकल्प साहनी यांची.

आता जसे की आपण आधी पाहिलं कोरोनानंतर स्टार्टअपची मागणी वाढली त्यातल्यात्यात हेल्थ केअर स्टार्टअपचा तर चांगलाच भाव वाढला. म्हणजे तो असा काळ होता ना दवाखान्यात जागा होती ना कोणी डॉक्टरांना भेटायला तयार होत होतं. यासोबतच लोक त्यांच्या तब्येतीची काळजी करत इकडे तिकडे ऑनलाइन डॉक्टर शोधत होते. घरबसल्या डॉक्टर, औषध, प्रिस्क्रिप्शन सर्च करणाऱ्यांची संख्या वाढली. आणि त्याचाच फायदा घेतला विकल्प यांनी.

३६ वर्षांचा विकल्प हे मिटलक्लास फॅमिलीमधले. इंदौरमधून शिक्षण घेतलेल्या विकास यांना लहानपणापासूनच कम्प्युटर आणि प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे बारावीनंतर त्यांनी इंजिनीअरिंग केले. बराच काळ त्यांनी गोबीबो’सोबत काम केले. तिथे ते मोठमोठे टेक्निकल प्रोजेक्ट हाताळायचे. ४०० पेक्षा जास्त लोकांच्या टीमला लीड केलेल्या विकल्प यांनी गोबीबोला एका सक्सेसच्या पॉईंटवर नेऊन ठेवलं.

या दरम्यान बराच काळ वेगवेगळ्या क्षेत्रात काम केल्यानंतर आता काहीतरी नवीन करायला हवे, असा विचार विकल्पच्या डोक्यात आला. आणि वेगवेगळ्या डिजिटल स्टार्टअप्सबद्दल अभ्यास सुरू केला. त्यानंतर मार्च २०२० मध्ये नेमकी कोरोनाची एंट्री झाली. यामुळे विकासच्या प्लॅनमध्ये बदल झाला आणि डिजिटल आरोग्य सेवेच्या क्षेत्रात का काम करू नये, असा विचार मनात आला.

त्यामुळे २०२० मध्ये, विकल्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी Aarogya Setu अॅपसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात मोठी भूमिका बजावली. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही मिळाले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांना डिजिटल इंडिया पुरस्काराने सन्मानित केले.

यातूनचं पूढे जात त्यांच्या हेल्थ केअर स्टार्टअपची सुरुवात २०२१ मध्ये झाली. मोठ्या रिसर्चनंतर त्यांनी eka.care नावाचा स्टार्टअप सुरू केला. यासाठी बजेटची गरज होती जी काही सेव्हिंग आणि मित्रांच्या मदतीने झाली.

त्यानंतर दोन अॅप लाँच केले. एक डॉक्टरांसाठी आणि दुसरा यूजर्ससाठी म्हणजे रुग्णांसाठी. कमीतकमी चार्जेसमध्ये कोणतेही डॉक्टर यावर जोडले जाऊ शकतात. त्यानंतर जून २०२१ पासून कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा कोविन अॅपवरून मान्यता घेतली आणि लसीकरणाची सुविधा सुरू केली. जिथून लोक लसीसाठी स्लॉट बुक करू शकतात आणि वॅक्सीन सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करू शकतात.

विकल्प यांच्या या स्टार्टअपला युजर्सचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. अनेकांनी लसीकरणासाठी त्यांचे अॅप वापरायला सुरुवात केली. माहितीनुसार आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त लोकांनी अॅपवरून लसीकरण आणि सर्टिफिकेट डाउनलोड केलीत. त्याचप्रमाणे, आरोग्य सेवांच्या उर्वरित गरजांसाठी लाखो वापरकर्ते या अॅपशी जोडले गेलेत.

विकल्प यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की,

हे अॅप AI आहे, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे. वापरकर्ता किंवा रुग्ण चौकशी करतो, तो त्याचा प्री-चेकअप रिपोर्ट तयार करतो. त्यांच्या बेसिक डिटेल्समध्ये, कोणत्या समस्या आहेत, कोणता रोग आहे, ते आधी कोणती औषधे घेत आहेत याची माहिती मिळते. त्यामुळे डॉक्टरांचा वेळ वाचतो आणि पेशंटला सुद्धा त्या गोष्टी परत सांगायला लागत नाही.

विकल्प पुढे सांगतात की, याशिवाय डॉक्टर आमच्या अॅपद्वारे प्रिस्क्रिप्शनही लिहू शकतात. यासाठी आम्ही आमचे अॅप मेडिकली अवेयर केले आहे. म्हणजेच पेशंटच्या लक्षणांनुसार किंवा जसा त्यांचा रिपोर्ट असेल, तशी औषधांची यादीही डॉक्टरांकडे उपलब्ध असेल. त्यामुळे त्यांना प्रिस्क्रिप्शन लिहिणं सोपे जाईल. आतापर्यंत या ॲपवर दोन हजार पेक्षा जास्त डॉक्टरांनी रजिस्ट्रेशन केलेयं

आता डॉक्टरांना अॅपवर रजिस्ट्रेशनसाठी जरी चार्ज करायला लागत असले तरी पेटंटसाठी मात्र हे फ्री आहे. यूजर फक्त आपला मोबाईल नंबर टाकून अकाऊंट तयार करू शकतो. तसेच या अॅपद्वारे तो त्याचा मेडिकल रिपोर्ट डिजिटली सेव्ह करू शकतो. आणि पुढच्या कोणत्या उपचारासाठी जर त्याला गरज भासली तर त्याचा रिपोर्ट आधीच अॅपवर उपलब्ध असेल. त्यामुळे पेशंटला फक्त डॉक्टरांची फी भरावी लागते.

तसेच, अॅपद्वारे पेशंट नियमितपणे त्याचे बीपी आणि पल्स रेट तपासू शकतो. आणि स्वत:चे डिजिटल हेल्थ कार्डही बनवू शकतो. महत्त्वाचं म्हणजे यात सुरक्षेची १०० टक्के खात्री आहे. म्हणजे कोणत्याही पेशंटची त्यांच्या परवानगीशिवाय माहिती किंवा कागदपत्रे शेअर करत नाही.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.