शेवटी मराठी माणसानेच ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाला राष्ट्रपती हा प्रतिशब्द दिला

मराठी पार्श्वभूमी असणाऱ्या एका व्यक्तीने हिंदी पत्रकरिता गाजवली आहे. केवळ गाजवली असं नसून आजही हिंदी पत्रकारितेतील अग्रगण्य विख्यात संपादक म्हणून त्यांचे नाव देशभर घेण्यात येते. त्यांनीच भारतात ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाला राष्ट्रपती हा प्रतिशब्द दिला आहे.

त्यांची गणना महात्मा गांधी, गणेश शंकर विद्यार्थी, माखनलाल चतुर्वेदी, महर्षी चतुर्वेदी आदी दिग्गज पत्रकार व्यक्तींबरोबर करण्यात येते.

तर ही व्यक्ती मराठमोळी असूनही त्यांनी हिंदी पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल भरभरून बोलण्यात येते. हिंदी पत्रकारितेत बाबुराव पराडकर यांना पितामह म्हणून ओळखले जाते.

बाबुराव पराडकर यांचा जन्म हा १६ नोव्हेंबर १९१८ मध्ये वाराणसी येथे झाला. त्यांचे वडील हे विष्णू पराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पराड गावातील होते.

सुरुवातील बाबुराव पारड यांनी काही दिवस टपालखात्यात नोकरी केली होती. मात्र येथे त्यांनी जास्त दिवस नोकरी केली नाही. त्यांचे मामा सखाराम गणेश देऊस्कर हे कोलकत्ता येथे होते आणि त्यांनी पत्रकारितेत चांगला जम बसविला होता.

बाबुराव पराडकर मामाकडे म्हणजेच कोलकत्याला गेले. असा त्यांचा पहिल्यांदा पत्रकारितेशी संबंध आला. तेथील हिन्दी वृत्तपत्र ‘बंगवासी’त नोकरी सुरू केली. नंतर ते ‘बांगला हितवार्ता’त गेले. त्याचे संपादक देऊस्कर होते. त्या नंतर ‘भारत मित्र’ या वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणादायी लिखाण केले.
त्यानंतर त्यांनी आपले बस्तान वाराणसी येथे हलविले आणि आपली हिंदी पत्रकारीतेतील एक वेगळी ओळख निर्माण केली. 

‘आज’ या वाराणसीच्या व हिंदी प्रदेशात गाजलेल्या वृत्तपत्राचे संपादक म्हणूनच पराडकर विख्यात होते.
१९२० ते १९४२ आणि त्या नंतर १९४७ ते १९५५ असे शेवटपर्यंत बाबुराव पराडकर हे ‘आज’ मध्येच होते. ‘हिन्दी पत्रकारितेतील शिखर पुरुष’ म्हणून त्यांचा गौरव केला जातो. हिंदी ही त्यांची मातृभाषा नव्हती. तरीही त्यांनी आपल्या कामाने त्यांनी हिंदी पत्रकारिता एका उंचीवर नेऊन ठेवली होती.

बाबूराव पराडकर केवळ पत्रकार नव्हते. स्वातंत्र्याचा लढा, साहित्य क्षेत्र, हिन्दी भाषेची शब्दसंपदा समृद्ध करणे ही त्यांची कामे हिंदी भागांमध्ये इतिहास घडविणारी ठरली. आजही हिंदी वृत्तपत्रक्षेत्रात ‘हिंदी परिभाषा’ म्हटली की त्यांचे नाव घेतले जाते. ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाला भारतीय प्रतिशब्द हवा होता. तो हिंदीसह सर्व भाषांना समान वाटावा असा पाहिजे होता. त्या वेळचे राजकीय व अन्य ज्येष्ठ व्यक्ती प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाला भारतीय प्रतिशब्द शोधत होते. त्यानंतर काहींनी हा मोर्चा बाबूराव पराडकर यांच्याकडे वळविला.

बाबुराव पराडकर यांनी जो शब्द दिला, तो अजरामर झाला आहे, ‘राष्ट्रपती’.

आज ‘राष्ट्रपती’, हा शब्द साऱ्या देशवासियांचा बनला आहे. तो केवळ बाबुराव पराडकर यांच्यामुळे.

बाबूराव पराडकरांनी हिन्दी क्षेत्रात त्या ध्येयवादाने स्वत:चे स्वतंत्र व उच्च स्थान निर्माण केले. काही महिन्यांपूर्वी मी वाराणसीत जाऊन त्यांचे भव्य स्मारक पाहिले. काशी पत्रकार संघाने तीन मजली पत्रकार भवन बांधले आहे. ते पराडकरांना समर्पित केले आहे. तेथे साधारणपणे २०० जण बसतील असे सभागृह बांधले आहे. बाहेरगावाहून येणारांसाठी पाहुण्यांसाठी वातानुकुलीत खोल्या बांधल्या आहेत. या इमारला  ‘पराडकर स्मृति भवन’ असे दिलेआहे.

बाबुराव पराडकर यांनी संपादक या नात्याने त्यांनी हिंदी साहित्याचीही सेवा केली. भाषाक्षेत्रातील त्यांचे शब्दांचे योगदान तर मोठे आहेच, पण त्यांनी जशी हिन्दी साहित्यिकांना प्रेरणा दिली, तसे हिन्दी साहित्यकारही पुढे आणले.

सिमला येथे सत्ताविसावे अखिल भारतीय हिन्दी साहित्य संमेलन झाले त्याचे ते अध्यक्ष होते. आजही हिंदी पत्रकारितेत त्यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.