विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी कोण ठरवतं ? आणि कसं ?
यंदाच्या विठ्ठलाच्या पुजेचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे भाविक विठ्ठल चव्हाण आणि प्रयागाबाई चव्हाण या दाम्पत्याला मिळाला.
मागील वर्षी मराठा आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर विठ्ठलाची पूजा करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा हा मान हिंगोलिच्या वर्षा आणि अनिल जाधव यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत मागील वर्षी पूजा पार पडली होती.
यंदा मुख्यमंत्र्यांच्या सोबत चव्हाण दाम्पत्याला हा मान मिळाला. पण प्रश्न पडतो की,
तर मुद्दा असा आहे की, हे मानाचे वारकरी ठरवतं कोण ? आणि कस ?
मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पुर्णपणे मंदिर समितीला आहे. शासकिय पुजेचा प्रकार हा समिती अस्तित्वात आल्यानंतर आला. १९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा केली जाते तर त्यांच्यासोबत मानाचे वारकरी पुजेस उपस्थित असतात. आणि ते निवडण्याचा अधिकार मंदिर समितीकडे देण्यात आला आहे.
मानाचे वारकरी कसे निवडले जातात ?
विठ्ठलाची पुजा हि पहाटे पार पडते. मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पुजेची तयारी चालू होते. अशा वेळी दर्शनरांगेत पुढे उपस्थित असणाऱ्या दांपत्याला हा मान दिला जातो. जे दांपत्य दर्शनरांगेत समोर असेल त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पुजा करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर त्या दांपत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील केला जातो.
हे ही वाच भिडू.
- मुख्यमंत्र्यांची वारी ! किस्से लय भारी !!
- शेतकऱ्यांच्या अगणित पिढ्यांनि समृद्ध केलाला मार्गय हा वारीचा..